Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > "काळ्या मातीत ठिबक सिंचनातून पांढरे सोने अंकुरले..."

"काळ्या मातीत ठिबक सिंचनातून पांढरे सोने अंकुरले..."

काळ्या मातीत ठिबक सिंचनातून पांढरे सोने अंकुरले...
X

'शेतकऱ्यांची धुळपेरणीला पसंती.पेरणीची घाई न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन.'

त-हाडी :- कॉटनबेल्टची ओळख असलेल्या शिरपूर तालुक्यात यावर्षी 69090,हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरणीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला असून मका,तूर,ज्वारी व कापूस पिकाची पेरणी शेतकरी करणार असला तरी मागील वर्षी कांदा काढण्याच्या अवस्थेत पावसाने हाहाकार केल्याने कांदाचा पेरा कमी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे सद्या ज्या शेतकऱ्याकडे ओलिताची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कपाशीची लागवड जवळपास 69090 हजार हेक्टरवर केली असून ही कपाशी उगविल्याने अनेक हेक्टरवर हिरवा शालू नेसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

शिरपूर तालुक्याचे वाहितीखालील क्षेत्र 70 हजार हेक्टर असून सर्वाधिक पेरा हा कपाशीचा होत आला आहे.कॉटनबेल्टची किनार लाभलेल्या या तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाच्या पीक पेरणी अहवालानुसार 69090 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होणार असून त्याखालोखाल सोयाबीन 8720 हेक्टर,तूर 1836 ,मका 8030 ज्वारी 4590,72 ,उडीद - 1472,92,मूग 4301,69बाजरी -4811,35भुईमूग -,1028,70 सुर्यफुल, 11,50 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असल्याचे पीक पेरणी अहवालावरून स्पष्ट होत आहे.सद्या मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात हवामान खात्याने मान्सुम दाखल होण्याची शक्यता वर्तविल्याने शेतकऱ्यांनी धुळपेरणीला अनेक ठिकाणी सुरुवात केली आहे.पूर्व हंगामी कपाशीला सद्या ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्याची कसरत शेतकऱ्यांना रात्री बेरात्री करावी लागत असून हे पीक जोमात असून अनेक ठिकाणी त्यामुळे हिरवळ निर्माण झाली आहे.कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता शहरात जातांना शेतकरी बांधवांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल तसेच सुरक्षित अंतर ठेवून शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी कराव्यात अशा सूचना कृषी विभागाकडून करण्यात आल्या आहे.

"शेतकरी गटांना बांधावर बियाणे व खतांचे वितरण."

शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटांच्या माध्यमातून बियाणे व खते घेण्यावर भर दिला आहे.आतापर्यंत 2906 क्विंटल सोयाबीन बियाणे तर 2863 मेट्रिक टन रासायनिक खते कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर पोच देण्यात आले असून याला शेतकऱ्यांचा ऊत्तम प्रतिसाद मिळत आहे.

"जमिनीत योग्य ओलावा किंवा कमीत कमी 75 मि मि पाऊस झाल्यावर पेरणी शेतकऱ्यांनी करावी.खते व बियाण्यांची बिले जपून ठेवावी.घरचे सोयाबीन बियाणे वापरतांना बुरशीनाशकाची व ट्रायकोडर्माची प्रक्रिया करून व उगवणक्षमता तपासून हे बियाणे वापरावे.काही अडचण असल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा."

अनिल निकुंभ,तालुका कृषी अधिकारी,शिरपूर

Updated : 13 Jun 2020 2:03 PM GMT
Next Story
Share it
Top