कारंजा येथे मॅथेमॅटिक्स स्टडी अंड रिसर्च सेंटर चा शुभारंभ
X
वाशिम(फुलचंद भगत)-15 ऑगस्ट 2020 शनिवार रोजी दुपारी दोन वाजता कारंजा येथे mathematics study and research centre चा ऑनलाइन उद्घाटन सोहळा प्राची साठे मॅडम शैक्षणिक सल्लागार पुणे, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला
संस्थेच्या संचालिका सौ प्रतीक्षा पापळकर यांनी आपल्या वैचारिक गणित पिठावर सर्व गणितींचे स्वागत केले आणि प्रास्ताविकेतून संस्थेचे मुख्य उद्दिष्ट प्रमुख्याने जैन व वैदिक गणिताचे महत्व, त्याची व्याप्ती आणि गणित रसिकांनी किंवा विद्यार्थ्यांनी ते का शिकावे याबद्दल थोडक्यात विवेचन केले, त्यासोबतच विद्यार्थ्यांना गणित शिकताना येणाऱ्या अडचणी साठी गणितीय समुपदेशन आणि गणितीय करमणूक या संकल्पनांवर प्रकाश टाकला त्याप्रसंगीप्रामुख्याने उपस्थित असलेले विद्याभारती महाविद्यालयाचे श्री डोंगरे सरांनी यासंदर्भात बोलताना कारंजा हे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचे शहर असून त्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी अशा केंद्रांची गरज खूप आधीपासून होती असे मत प्रतिपादन केले आणि पापळकर मॅडम संस्थांची जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकतील असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमास महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील गणिततज्ञ उपस्थित होते या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून नाशिक येथील सुप्रसिद्ध गणिततज्ञ लेखक व गणित छंद आनंद चे संपादक श्री दिलीप जी गोटखिंडीकर सर उपस्थित होते आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी अशा केंद्राचे महत्त्व व आवश्यकता पटवून दिली.
प्राचीन जैन व वैदिक गणिताचे महत्व विशद करतानाच केंद्रासाठी सहकार्य व मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शवली यासंदर्भात बोलताना डॉक्टर पोहेकर यांनी गणित सोडवुन देणे किंवा सोडवणे यापेक्षाही फॉर्मुलेशन वर विशेष भर दिल्यास विद्यार्थ्यांच्या यशासाठी गणित हे प्रभावी माध्यम ठरू शकेल असे मत व्यक्त केले तर नागपूर येथील जिल्हा गणित मंडळाचे अध्यक्ष श्री पंचभाई सरांनी अशा संस्थांनी जर शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे कार्य हाती घेतल्यास गणित शिक्षणात क्रांती घडून येईल असा विश्वास व्यक्त केला याप्रसंगी महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे अध्यक्ष श्री सुनील श्रीवास्तव गोंदिया उपस्थित होते त्यांनाही पापळकर मॅडमच्या नव कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या याप्रसंगी आंतरराष्ट्रीय गणित शिक्षण मंडळाचे सदस्य श्री उमेश रेळ सर यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले आणि जैन गणित हे किती विस्तृत आणि प्राचीन आहे यावर प्रकाश टाकला या प्रसंगी बोलताना श्रीपाद देशपांडे गणित अभ्यास मंडळ सदस्य बालभारती पुणे, यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या नवनवीन पद्धती संबंधी संशोधनात्मक लेख प्रकाशित करावे अशी इच्छा व्यक्त केली त्यासंदर्भात संपूर्ण सहकार्याची त्यांनी तयारी दर्शवली नाशिक येथील सुप्रसिद्ध गणिततज्ञ वसंत बर्वे सर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते याप्रसंगी त्यांनी जिओजेब्रा चा गणितातील प्रभावी वापर याबद्दल मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची रंजकता वाढवली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याभरती महाविद्यालय चे श्री डोंगरे सर यांनी केले त्यावेळेस हा गणिती मेळावाच आहे असे वाटत आहे असे मत व्यक्त केले.
अतिशय उत्साहाने चाललेला हा उद्घाटन सोहळ्याच्या प्रत्यक्ष साक्षीदार चाललेला हा उद्घाटन सोहळ्याच्या प्रत्यक्ष साक्षीदार व दिपप्रज्वलन यासाठी लाभलेल्या श्रीमती शांता ताई चवरे आणि सौ भारतीताई भोरे यांनी शुभेच्छा देतानाच पापळकर मॅडम यांनी काही गणिती क्लुप्त्यांचे वर्ग महिलांसाठी सुद्धा घ्यावेत अशी इच्छा व्यक्त केली तर आभार प्रदर्शन सौ पापळकर मॅडम यांनी केले.
फुलचंद भगत,वाशिम
मो.8459273206,9763007835