Home > विदर्भ > कर्तव्यशील कर्मचाऱ्यांना शिक्षक समिती राळेगाव कडुन निरोप

कर्तव्यशील कर्मचाऱ्यांना शिक्षक समिती राळेगाव कडुन निरोप

कर्तव्यशील कर्मचाऱ्यांना शिक्षक समिती राळेगाव कडुन निरोप
X

..कर्तव्यशील कर्मचाऱ्यांना शिक्षक समिती राळेगाव कडुन निरोप..."""

म मराठी न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी/संजय कारवटकर

यवतमाळ/राळेगाव : पंचायत समिती राळेगाव येथील शिक्षण विभागातील कर्मचारी सचिन बोपटे (वरिष्ठ सहाय्यक ) यांचे राळेगाव येथून पांढरकवडा येथे स्थानांतरण झाले त्यांनी राळेगाव येथील शिक्षण विभागात शिक्षकांशी संबंधित सर्व प्रकरणे झिरो पेंडन्सी ने पूर्णत्वास नेले .

त्यांनी आपल्या कामाचा कर्तव्यशीलपणा ,कर्तव्यतत्परता शिक्षण विभागाला कायम ठेवला. अशा व्यक्तिमत्वाला निरोप समारंभ दिनांक 3 नोव्हेंबर 2020 दुपारी तीन वाजता पंचायत समिती राळेगाव च्या सभागृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती 448 राळेगाव च्या वतीने माननीय गटशिक्षणाधिकारी मा.अनिल राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. के यु वन्नलवार सहाय्यक प्रशासन अधिकारी, अनिल वानखेडे अधिक्षक ,बबन नगराळे केंद्रप्रमुख यांच्या उपस्थितीत शाल ,श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन त्यांना निरोप देण्यात आला. सोबतच शिक्षक समितीचे निष्ठावान केंद्रप्रमुख उत्तम अंडरस्कर सर यांना सेवापुर्ती निमित्त शाल-श्रीफळ सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला . प्रसंगी शाखाध्यक्ष महेश सोनेकर सचिव संदीप क्षिरसागर,गजानन यादव,हेमंत निंबुलकर, विजय दुर्गे, किसन चौधरी, मनोज मानकर,विनोद क्षिरसागर, प्रवीण थुल,भूमन्ना कसरेवार,विनायक एकोणकर,संजय एकोणकर,अशोक खेकडे,भगवान ठावरी,योगेश गलाट, हनुमान जुमनाके, विशाल किनाके, अमोल पोहनकर, राजू झलके,प्रतीक खडसे,मनोज कडू,संदिप टुले समिती चे कार्यकर्ते तथा कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्तावित महेश सोनेकर, मनोगत के यु वन्नलवार गजानन यादव विजय दुर्गे, सचिन बोपटे सूत्रसंचालक संदिप क्षिरसागर आभार प्रदर्शन मनोज मानकर यांनी केले.

Updated : 5 Nov 2020 2:28 AM GMT
Next Story
Share it
Top