कमलापुर येथे विजयादशमी दसरा महोत्सव उत्साहाने साजरा
X
"कमलापुर येथे विजयादशमी दसरा महोत्सव उत्साहाने साजरा"
स्वप्नील गोलेटिवार
अहेरी विशेष तालुका प्रतिनिधी
मो. ८३९०८७९१५२
माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते सप्तरंगी ध्वजारोहण
कमलापुर - परिसरातील आदिवासी बांधवांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी मुध्द्रा दसरा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला असुन सप्तरंगी ध्वजारोहण विजयादशमी दसरा महोत्सवाचे उदघाटीका माजी जि.प.अध्यक्ष तथा विध्यमान सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते पार पाडला.
कोडसेलगुडम आणि कमलापुर परिसरातील आदिवासी बांधवांनी कमलापुर येथे एकत्र येऊन निसर्ग देवपूजा आणि सप्तरंगी ध्वजारोहण तथा रावणाचा प्रतिमेला पूजाअर्चा करून मोठ्या उत्साहाने विजयादशमी दसरा महोत्सव साजरी केली त्यानंतर सभा घेण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी कमलापूरचे उपसरपंच शंकर आत्राम. माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम .भुमक मलय्या साकटी .आनंदराव आत्राम. नगारा वादक शंकर कुसराम. गंगाराम कुसराम. पेट्या मडावी. आयोजक माजी सरपंच सांबय्या करपेत. येरमनारचे सरपंच बालाजी गावडे . सुलभा सिडाम .नीलिमा करपेत. सुगंधा साकटी. अशोक सिडाम. बापू कुळमेथे .येर्रय्या मडावी. रामशाही आलाम .सोमय्या साकटी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण.