Home > विदर्भ > ओबीसी समाजाचा राष्ट्रव्यापी आंदोलनाचा एल्गार.

ओबीसी समाजाचा राष्ट्रव्यापी आंदोलनाचा एल्गार.

ओबीसी समाजाचा राष्ट्रव्यापी आंदोलनाचा एल्गार.
X

ओबीसी समाजाचा राष्ट्रव्यापी आंदोलनाचा एल्गार.

म मराठी न्यूज नेटवर्क

जयंता कामडी/चिमूर प्रतिनिधी

मो.7620747005

चिमूर :- राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका चिमूर च्या वतीने विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी हुतात्मा स्मारक ते तहसील ऑफिस या ठिकाणी दि 3 नोव्हेंबर ला आंदोलन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.

ओबीसी समाजाची २०२१ मध्ये होऊ घातलेली जनगणना केंद्र सरकार करीत नसेल तर राज्य शासनाच्या माध्यमातून जातिनिहाय करण्यात यावी ,

मराठा समाजास आरक्षण देण्यास विरोध नसून ओबीसींच्या १९ टक्के आरक्षणतून देण्यात येऊ नये, ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृह निर्माण करणे, महाज्योती संस्थेस एक हजार कोटीचे अनुदान देण्यात यावे ओबीसी समाजाचा रिक्त अनुशेष पूर्ण भरण्यात यावा, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती आरक्षण लागू करण्यात यावे राज्यातील सर्व जिल्ह्यात ओबीसी कार्यालय सुरू करण्यात यावे एससी एसटी प्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना शंभर टक्के सवलतीवर योजना लागू करण्यात याव्या आदी मागण्या निवेदनात नमूद होत्या

राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली समनव्यक डॉ अशोक जीवतोडे व महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका चिमूर च्या वतीने हुतात्मा स्मारक चिमूर येथून आंदोलनास सुरवात होऊन मुख्य मार्गाने आंदोलन करण्यात आले.

तसेच एसडीओ यांचे मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात गजाननजी अगडे, प्रकाश झाडे, अरुण लोहकरे राजू लोणारे ,ईश्वर डुकरे, प.स. सभापती लता पिसे पस.सदस्य भावना बावनकर नगरसेविका उषा हिवरकर नरेंद्र राजूरकर कीर्ती रोकडे, किशोर मुंगले कवडू लोहकरे व अन्य ओबीसी महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

Updated : 5 Nov 2020 4:42 PM GMT
Next Story
Share it
Top