Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > एस.एम.न्युज संपादक तथा समाजसेवक सुकांत वंजारी यांचा कोरोना योध्दा म्हणुन सन्मान

एस.एम.न्युज संपादक तथा समाजसेवक सुकांत वंजारी यांचा कोरोना योध्दा म्हणुन सन्मान

एस.एम.न्युज संपादक तथा समाजसेवक सुकांत वंजारी यांचा कोरोना योध्दा म्हणुन सन्मान
X

यवतमाळ-:दि १७. भारतीय नारी रक्षा संघटनेचे सचिव तथा संकल्प फाउंडेशनचे प्रसिद्धी प्रमुख एस.एम.न्युजचे संपादक सुकांत प्रकाश वंजारी यांनी लाॅकडाऊनच्या काळात कोरोणा विषाणुचा प्रादुर्भावाने प्रभावित झालेल्या नागरिकांना जिवनावश्यक वस्तुची मदत केली,यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी राहुल गांधी विचार मंच यवतमाळच्या वतिने त्यांना सन्मानित करण्यात आले.सुकांत वंजारी यांनी भारतीय नारी रक्षा संघटना व संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून अनेकांना वेळोवेळी मदत केली त्यामध्ये ज्यांचे लाॅकडाऊनमुळे व्यवसाय,मजुरी बंद असलेल्यांना जिवनावश्यक वस्तु,जेवण पुरविले तसेच बाहेर गावच्या व्यक्तींना रक्त मिळणे कठीण असतांना त्या स्वतः व त्यांचा पत्नीसह रक्तदान करणे,लाॅकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकुन असलेल्याच्या जाण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे,यासह त्यांनी भारतीय नारी रक्षा संघटना तसेच संकल्प फाउंडेशनच्या वतिने आदर्श विवाह घडवुन आणले,सुकांत वंजारी हे १५ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असुन त्यांनी आपले सामाजिक कार्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान प्रबोधन समितीच्या माध्यमातून सुरु केले,तर भिम बिरसा फाउंडेशन,भारतीय नारी रक्षा संघटनेच्या माध्यमातून विवीध उपक्रम राबवण्यात यांचे मोलाचे योगदान आहे.अशा विवीध कार्याची व सेवेची दखल घेत राहुल गांधी विचार मंच यवतमाळच्या वतिने त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले,या प्रसंगी जेष्ठ नगर सेवक जावेद अन्सारी,शाकिर अहेमद,मकसुद अली,वसीम मवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

Updated : 18 Jun 2020 5:52 PM GMT
Next Story
Share it
Top