Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > एम पि एस सीच्या नियुक्त्या लवकर द्या-संभाजी ब्रिगेड

एम पि एस सीच्या नियुक्त्या लवकर द्या-संभाजी ब्रिगेड

एम पि एस सीच्या नियुक्त्या लवकर द्या-संभाजी ब्रिगेड
X

नांदेड-हैद्राबाद महामार्गावर नायगाव येथे गुरुवारी संभाजी ब्रिगेडचा रास्ता रोको

जिल्हा प्रतिनिधी नांदेड

नांदेड :- एम पि एस सी च्या सन २०१९ मधे झालेल्या परिक्षेचे निकाल लागले पण आणखीही पाञ विद्यार्थ्यांना नियुक्त्या दिल्या नाहीत त्या तात्काळ द्याव्यात, पंचनाम्याची सोंगे बंद करुन सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा व मराठा समाजाचा ओबिसीत समावेश करावा या व इतर मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्यावतीने नांदेड ते हैद्राबाद महामार्गावर नायगाव येथे हेडगेवार चौकात 11 ते 12 च्या दरम्यान रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

संभाजी ब्रिगेड नायगाव तालुक्याच्यावतीने करण्यात आलेले रास्ता रोको आंदोलन पंचनाम्याची (सोंगे) नाटके बंद करुन सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५०,०००रूपये नुकसान भरपाई द्यावी,मराठा समाजाचा ओबिसीत समावेश करुन आरक्षणाचा प्रश्न लवकर मिटवावा,२०१९ मधे झालेल्या एम पि एस सी परिक्षेतील पाञ विद्यार्थ्यांना त्वरित नियुक्त्या द्याव्यात,पिकविमा मंजुर करावा,कर्जमाफी झालेल्या शेतकर्यांच्या याद्या लवकरात लवकर प्रसिद्ध करुन तात्काळ त्यांना पिककर्ज द्यावे,शेतकर्यांकडुन आडत दुकानामार्फत होणारी लुट थांबवावी आडत दुकानात इलेक्ट्रानिक वजनकाटे बसवावेत,पाचवर्षाच्या सरासरी उत्पनावर आधारीत पिकाचा विमा काढण्याची अट रद्द करावी,उत्तरप्रदेशातील हाथरस येथील बलात्कार्यांना फाशीची शिक्षा द्यावी .या मागण्यांसाठी हा रास्ता रोको करण्यात आला.

निसर्गाने शेतकर्यांकडे पाठ फिरवली मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याकारणाने शेतकर्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले असतांना पंचनाम्याची सोंगे शासन का करत आहे,सत्ताधार्यांना आपण विरोधी पक्षात आहोत असे वाटते काय ते गावोगाव जाऊन ओला दुष्काळ दौरे करत आहेत.शेतकर्यांची तुम्हाला तळमळ असेल तर शरद पवारांनी व इतर महाराष्ट्र सरकारमधील मंञ्यांनी ओला दुष्काळाचे पॅकेज घेऊनच नांदेड जिल्ह्यात पाऊल ठेवावे.शासनाने जलद गतीने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांना हेक्टरी ५०,०००रूपये नुकसानभरपाई द्यावी तसेच २०१९ मधे पाञ झालेल्या एम पि एस सी विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात असे लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांनी मत मांडले.पिककर्ज माफ केले म्हणुन शासनाने पिककर्जाएवढे पैसे कर्जमाफीच्या जाहिरातीत घाटले पण आणखी काय कर्जमाफीच्या याद्याच पुर्ण आल्या नाहीत काही शेतकर्याचे माफ झाले तर काहीचे झाले नाही सरसकट पिककर्ज माफ करून नविन पिककर्ज लवकर द्यावे, पिकविमाही मंजुर करावा तसेच सरसखट मराठा समाजाचा ओबिसीत समावेश करावा असे मत जिल्हाध्यक्ष शाम पाटील यांनी व्यक्त केले.एका राञीत ३७० कलम रद्द होवु शकते,राम मंदीर बांधल्याजाऊ शकते तर बलात्कार्यांना फाशी देण्याचे कलम लागु करायला वेळ का लागत आहे उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील मुलीवर झालेल्या बलातकार्यांना फाशीची शीक्षा द्यावी का तिचा अंतिमसंस्कार राञीच्या अंधारात कुटुंबांच्या अनुपस्थित का केला असा सवालही नायगाव विधानसभा नेते अनिकेत शिंदे यांनी उपस्थित केला.

या वेळी तालुकाध्यक्ष अंकुश शिंदे यांनी सर्वांचे आभार मांडले.जय जिजाऊ जय शिवराय,मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे,ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे,२०१९ मधील एम पि एस सी पाञ विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळाल्याच पाहिजेत ,हाथरस येथील बलाताकार्यांना फाशी झाली पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणुन गेला होता.यावेळी दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.प्रचंड पोलिस बदोबस्तही या रास्तारोको साठी होता.

सपोनि पाटेकर साहेब यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील,जिल्हाध्यक्ष शाम पाटील,जिल्हाउपाध्यक्ष अभिजीत टाकळे,विधानसभा नेते अनिकेत शिंदे,नायगाव तालुकाध्यक्ष आंकुश शिंदे,नांदेड दक्षिण तालुकाध्यक्ष दत्ता येवले,बालाजी देशमुख,सोपान शिंदे,जेजेराव करडखेडवाडीकर,माधव शिंदे,बालाजी वडजे,वैभव शिंदे,सुरज शिंदे,सुनील येलेवाड,मोहन कदम,शिवाजी शिंदे,हणमंत शिंदे,संतोष डोंगरे,रामेश्वर चिंचोले,परमेश्वर शिंदे,प्रधुम्न पाटील,माधव हिप्परगेकर,साई कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी

सय्यद अजिम नरसीकर

मो ९९६०४८४८८६

Updated : 23 Oct 2020 3:41 AM GMT
Next Story
Share it
Top