Home > विदर्भ > एक हाथ मदतीचा, बंधुभाव फाऊंडेशनचा उपक्रम

एक हाथ मदतीचा, बंधुभाव फाऊंडेशनचा उपक्रम

एक हाथ मदतीचा, बंधुभाव फाऊंडेशनचा उपक्रम
X

एक हाथ मदतीचा, बंधुभाव फाऊंडेशनचा उपक्रम..

प्रतिनिधी/आनंदराव देठे

चंद्रपुर : जोडलेल्या हातापेक्षा मदतीचे हात केव्हाही चांगले. जवळजवळ थंडीची लाट चांगलीच ओसरत आहे. आपण छान नवीन स्वेटर घेऊन, छान उबदार कपड्यात गुंडाळून राहतो. पण कधी विचार केलाय का त्या गरीब, झोपडपट्टी, रस्त्यावर राहणाऱ्या लोकांचा. हो ते पण मनुष्यच आहेत, त्यांनाही वेदना आहेत. पण समजून घेणार कुणी नाही. पण माणुसकी आजही जिवंत आहे तुमच्यात आणि माझ्यात.

त्याबरोबरच दिवाळीही जवळ आली आहे. आता नवीन कपळे घेणार, नवीन चप्पल, नवीन बूट, आणि मस्त थाटात साजरी करणार. पण त्या गरीब लोकांनाही वाटतो ना आपणही साजरी करावी. तर मग बघता काय ? या आपण सारे मिळून करूया ही दिवाळी साजरी. ते तुमचे हात कोणत्या कामाचे जर ते कुणाच्या कामात येत नसतील तर.

तर दानविरांनो तुमचे जुने स्वेटर , कपडे, बूट, चप्पल, ब्लँकेट, चादर इत्यादी तुमच्या वापरत नसलेली तुम्ही त्यांना स्वच्छ धुऊन आम्हाला देऊ शकता ते आम्ही "एक हाथ मदतीचा" या उपक्रमाअंतर्गत गरजवंतांना देऊ. तसेच तुम्ही आर्थिक मदतही करू शकता. तुमच्याकडे काही नवीन कल्पना असतील तर तेही तुम्ही आमच्याशी बोलू शकता, आम्ही तुमचा व तुमच्या विचारांचा स्वागत करतो.

"अधिक माहितीसाठी संपर्क - (संस्थापक अध्यक्ष) अंकुश नागुलवार -9860285936, (कार्याध्यक्ष) मोहित मडावी ""

7263862597

Updated : 8 Nov 2020 2:47 PM GMT
Next Story
Share it
Top