Home > विदर्भ > "एक क्षण सुखाचा"-यंग सिटीझन टीम चा उपक्रम

"एक क्षण सुखाचा"-यंग सिटीझन टीम चा उपक्रम

एक क्षण सुखाचा-यंग सिटीझन टीम चा उपक्रम
X

फुलचंद भगत/मंगरूळपीर

मंगरुळपीर शहरात सतत काही वर्षांपासून कार्यरत व सर्वांच्या परिचयातील असलेली संस्था यंग सिटीझन टीम, मंगरुळपीर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दुवाळीच्या शुभ पर्वा वर वरुड येथील चित्रऋषी महाराज वृद्धाश्रम व मूक बधिर विद्यालय , वरुड, मं.पीर येते शनिवारी वृद्धाश्रमात वृद्धांसोबत दिवाळीचा सुंदर सण साजरा केला या वेळी वृद्धांसोबत गप्पा गोष्टी करून त्यांच्या आनंद द्विगुणित केला. त्याच बरोबर सूचित देशमुख यांनी "आई" विषयावरील कविता सादर करून वृद्धानचा आनंदात भर पडली, त्याच बरोबर मंगरुळपीर शहरातील झोपड पट्टीत निवास करणाऱ्या लहान गरजू मुलांना दीपावलीच्या फराळाची कमी भासू नये म्हणून फराळाचे वाटप केले आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठेवून दर्ग्या वरील मुस्लिम बांधवाना दिवाळीच्या फराळाचे वाटप केले. या "एक क्षण सुखाचा .." हा उपक्रम मोठ्या जोरठावत पार पडला. हा कॉरोनाचा काळ संघर्षाचा आहे तरी आपण आपल्या सभोवतालच्या गरजू लोकांची साथ सोडू नये हा विशेष संदेश यांनी दिला.

वृद्ध व्यक्तीच्या एकोपाच्या भावनेला दूर करायचा हा एक छोटासा प्रयत्न दिवाळीला दरवर्षी यंग सिटीझन टीम तर्फे केला जातो. वृद्धांना कधी असं वाटू नये कि आपलं कुणी नाही म्हणून हा त्यांचा मनातला विचार दूर करण्याचा प्रयत्न असतो . आनंद हा वाटल्यानेच वाढतो हि भवना मणी ठेवत उपक्रम राबवला जातो .

आपल्या दैनंदिन जीवनातील आपण गरजूंना एक क्षण देखील आनंद वाटला तर त्या व्यक्तीच्या आनंदाला पारा राहत नाही. दर वेळेस च्या येण्या जाण्या मूळे तेथील वृद्धाश्रम वरील वृद्धांचे व तेथील मुलांचे संस्थेचे एक प्रेमाचे नाते जुळले आहे ज्यामुळे दर वेळेस वृद्ध दिवाळीच्या या सणाला आतुरतेने या आनंदी क्षणांची वाट पाहतात. हे आनंदाचे क्षण एकवटण्यासाठी या कार्यक्रमाला क्रीडा विभागातील छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार पुरस्कृत सागर गुल्हाने यांनी सुद्धा आपली उपस्तीथी दर्शवली. अशा प्रकारे या शुभ पर्वावर लहान तथा वृद्धांच्या चेहऱ्यावरचे हास्य टिपण्यासाठी यंग सिटीझन टीम चे अध्यक्ष सूचित देशमुख, मयूर पाटील, सागर गुल्हाने, दीपक खांबलकर, करण मुंधरे, आकाश चौधरी, पुरूषोत्तम शर्मा, श्रीजित देशमुख, भूषण सोनटक्के, ऋशिकेष इंगोले, शुभम राठोड,योगेश व्यवहारे, अभय सोनटक्के, भागेश ठाकरे, प्रतिक सुर्वे आदींनीे विशेष परिश्रम केले.

Updated : 15 Nov 2020 3:39 PM GMT
Next Story
Share it
Top