उर्दू टीचर्स असोसिएशन (यूटीए) ची यवतमाळ जिल्हा नविन कार्यकारिणी घोषित...
X
म-मराठी न्यूज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी/ वासीक शेख
यवतमाळ,दी.२५ : रविवार दिनांक २५ आँक्टोबर २०२० रोजी उर्दू टीचर्स असोसिएशन (यूटीए) अमरावती विभागा च्या वतीने यवतमाळ जिल्हा आणि यवतमाळ शहराची गतिविधि वर चर्चा करुण आणि नविन कार्यकारनी गठित करण्यासाठी यूटीए चे विभागीय अध्यक्ष गाजी जा़हेरोश सर यांचे अध्यक्षतेखाली हाजी अख्तर खान न. प. उर्दू हाय स्कूल,पुसद यथे सर्व उर्दू टीचर्स असोसिएशन (यूटीए) यवतमाळ जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांची एका महत्त्वाची सभा घेण्यात आली.आपल्या तीन वर्षाचे सफलतापुर्वक कार्यकाल समाप्त करून सध्याचे जिल्हा अध्यक्ष डा. इरशाद सर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. फलस्वरूप याच सभेत नवीन जिल्हा आणि शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.या महत्वपूर्ण सभेत प्रमुख अतिथीचे स्वरूपने जियाउद्दीन काजी सर पुसद, काझी सलाहुद्दीन सर अमरावती, वसिम पटेल सर यवतमाळ, निसार सर दारव्हा, सइद सर दारव्हा उपस्थित होते. सभेला संबोधित करताना गाजी जहेरोश सरनी सर्व यूटीए पदाधिकाऱ्यांना संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.तसेच सर्व शिक्षकांना सांगितले त्यांनी या लॉकडाउन च्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे नुकसान होणार नाही. शिक्षकांचे निवडी साठी सर्वजण आपली प्रतिक्रिया नोंदवू शकतात आणि यावर सहमती झालेला निर्णय अमरावती येथे होणारी विभागीय अधिवेशनात मांडण्यात येईल. यूटीएनी नेहमी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अधिकाऱ्यांची गोष्ट केली. त्यांनी कटाक्ष करताना शासन द्वारा घेतलेले ऊर्दु विरोधी निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्व एकत्रित येणार ? अशी घोषणा गाजी ज़ाहेरोश सर ज्यांनी आपले भाषणाच्या द्वारे सभेला संबोधित करताना केली.
यावेळेस सय्यद निसार सर आणि मुसद्दिक सरांनी आपल्या भाषणाद्वारे उर्दू टीचर्स असोसिएशन (यू टी ए ) ला मजबूत करून सहकार्य करण्याचे आवाहन केले करने. अंततः एकमताने सलीम खान सर अध्यापक हाजी अख्तर खान न. प. उर्दू हाय स्कूल,पुसद यांची जिला अध्यक्ष पदावर निवड झाली. तसेच मो. अयाज खान सर रुई वाई यांची यवतमाळ जिल्हा कार्यअध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. नदिम सर सहायक शिक्षक उमर फारुख उर्दु हाय स्कूल पुसद यांची पुसद शहर अध्यक्ष तसेच तारीक सर जामबाजार यांची पुसद तालुका अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. याच बरोबर यवतमाळ जिल्हा सचिव शेख अकरम सर पुसद, उपाध्यक्ष सय्यद मोइन महागाव कस्बा, समिर सर उमरखेड, अ. समद सर फुलसावंगी, अतिक सर दिग्रस, इरफान पटेल यवतमाळ, कोषाध्यक्ष अशफाक सर दारव्हा, संघटक मुसद्दिक सर फुलसावंगी, प्रसिद्धि प्रमुख मोहम्मद खालिद तगाले सदोबा सावळी, सह-सचिव फहिमोद्दिन सर पुसद, खुबैब सर नेर परसोपंत, कार्यकारनी सदस्य मुख्तार सर मुलावा, नासिर सर बोरी अरब, नजीर सर महागांव कस्बा, खालीद सर आर्णी, तसेच यवतमाळ शहर अध्यक्ष पदावर सैय्यद मुजफ्फर सर यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. तसेच रहमत सर यवतमाळ, काझी जिया सर पुसद आणि डा. इरशाद खान यांची निवड विभागीय सदस्य पदी निवड करण्यात आली. या कार्यक्रमात संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे शंभरहून अधिक अधिक यु. टि. ए पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सफल संचालन सलिम खान सरांनी तसेच आभार प्रदर्शन अतिक सर यांनी केले. असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्धि प्रमुख मोहम्मद खालिद तगाले सर यांनी कळविले.