Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > उपाध्यक्षांनी आपल्या मुलाला नगराध्यक्षांच्या खुर्चीवर बसवून शहरातील जनतेचा अपमान केला

उपाध्यक्षांनी आपल्या मुलाला नगराध्यक्षांच्या खुर्चीवर बसवून शहरातील जनतेचा अपमान केला

उपाध्यक्षांनी आपल्या मुलाला नगराध्यक्षांच्या खुर्चीवर बसवून शहरातील जनतेचा अपमान केला
X

"नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांची टीका"

(बिलोली/ता. प्रतिनीधी,एक.जी.कुरेशी)

बिलोरी :- नगरपालिकेच्या उपाध्यक्षांनी आपल्या मुलाला नगराध्यक्षांच्या खुर्चीवर बसवून शहरातील जनतेचा घोर अपमान केला आहे. यातून उपाध्यक्ष यांनी आपल्यातील बालिशपणा व पोरकटपणा दाखवून दिला आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवू नये. अशी घाणाघती टीका नगराध्यक्षा सुरेखा नरेंद्र जिठ्ठावार यांनी पत्रकार परिषदेत केली.

कुंडलवाडी नगरपरिषदेत भाजप सत्तेतून पायउतार होऊन महाविकास आघाडीची सत्ता आली. न.प.उपाध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत काही आरोप केले होते. त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी नगराध्यक्ष दालनात दि.२६ आँक्टोबर रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. पुढे बोलताना नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार म्हणाले की, उपाध्यक्ष यांनी आपल्या मुलाला नगराध्यक्ष खुर्चीवर बसवून शहरातील जनतेचा अपमान केला.याबाबत आम्ही कायदेशीर बाबी तपासून कारवाई करू.पालिकेत उपाध्यक्ष यांचे दालन वेगळे असल्याने अध्यक्षांच्या दालनात उपाध्यक्ष यांच्या खुर्चीवर माझे पती बसले असे उपाध्यक्ष यांनी केलेले आरोप तथ्थहीन आहेत. असे आरोप केल्याने उपाध्यक्ष यांच्यातील पोरकटपणा व बालिशपणा दिसून येत आहे. यातून लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अशी उपाध्यक्ष यांची परिस्थिती आहे.

शहराचा विकास मीच केला अशा अविर्भात उपाध्यक्ष वागत आहेत.मग आजपर्यतच्या १८ नगराध्यक्षांनी विकासच केला नाही का ? शासकीय नौकरीनंतर सेवानिवृत्त होऊन शहरात येऊन उपाध्यक्षांना मागच्या काळातील नगराध्यक्षांनी केलेले विकास कामे दिसत नाहीत. विकासाबाबतीत उपाध्यक्ष यांनी केलेल्या विधानाने मागच्या काळातील नगराध्यक्षांचा घोर अपमान झाला आहे. उपाध्यक्ष यांच्या हिटलरशाही व हुकुमशाही प्रवृत्तीला कंटाळून त्यांच्याच पक्षातील काही नगरसेवकांनी मला नगराध्यक्ष निवडणुकीत नगराध्यक्ष पदी निवडून दिले. यापूर्वी च्या नगराध्यक्षा फक्त मिटींग, सभा,राष्ट्रीय कार्यक्रमासच नगरपरिषदेत यायचे.पण मी शहरातच राहत असल्याने नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध आहे.नगरपरिषदेच्या निवडणूक वेळी सत्ता आणण्यासाठी उपाध्यक्ष यांच्याबरोबर अनेकांनी मेहनत घेतली.पण आजघडीला त्यातील एकही व्यक्ती त्यांच्यासोबत नाही .त्याचे त्यांनी आत्मचिंतन करावे असा सल्ला नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यानी दिला आहे.

यावेळी नरेंद्र जिठ्ठावार, नगरसेवक सुरेश कोंडावार, सचिन कोटलावार, शैलेश -याकावार,शेख मुखतार,माजी नगरसेवक राजु पोतनकर, पोशट्टी पडकुटलावार, व्यंकट श्रीरामे, संजय गोनेलवार,नरेश सब्बनवार, प्रकाश पाशावार, यांच्या सह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 26 Oct 2020 11:55 AM GMT
Next Story
Share it
Top