उपमुख्यत्रयां विषयी अभद्र भाषेत वक्त्य करणा-यांवर गुन्हे दाखल करा राष्ट्रवादी काँग्रेस ची निवेदनाव्दारे मागणी
X
मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी (भुषण महाजन):-:- राष्ट्रवादी काँग्रेस चे उपमुख्यमंती्र पदावर आरुढ असलेले अजित पवार यांच्या विरुध्द लोकमेथ काळमेघ यांनी अभद्र भाषेत केलेल्या वक्त्याबाबत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका व शहर च्या वतीने मुर्तिजापुर शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
त्यांनी निवेदनामध्ये नमुद केले आहे की, लोकनाथ काळमेघ नांवाच्या फेसबुक अकाऊंटवरुन राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा बददल अत्यंत अर्वाच्च व आक्षेप्रिय भाषेत पोष्ट करण्यात आली असनू त्यामुळे राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. तसेच विधान परिषदेचे सदस्य आमदार अमोल मिटकरी यांच्या बददलही या पोष्ट मध्ये आक्षेपार्ह मजकुर लिहला गेला आहे. सामाजिक माध्यमांमध्ये केले जाणारे लिखाण म्हणजे स्वैराचार नव्हे त्यामुळे अशा पोष्ट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावे. तसेच या पोष्ट मुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रशन निर्माण होवून शकतो. म्हणून त्वरीत कारवाई करावी. अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी रा.काँ. तालुका अध्यक्ष जगदीश मारोटकर, श्रीकृष्ण बोळे, राम कोरडे, श्रीधर कांबे, विष्णू लोडम, एल.डी.सरोदे, अतुल गावंडे, निजामुददीन इंजिनिअर, इब्राहीम घाणीवाला, सचिन ठाकरे, निखील ठाकरे, प्रकाश पाटील मुळे, अब्दुल जावेद, सिध्दार्थ तायडे, सुनिल पवार व पदाधिकारी व कार्यकर्त्य उपस्थित होते.
भुषण महाजन मो.नं. – 9850024474 / 9156273113