Home > विदर्भ > उपजिल्हा रुग्णालय मध्ये  शिक्षकांच्या स्वॅब तपासणीचा फज्जा

उपजिल्हा रुग्णालय मध्ये  शिक्षकांच्या स्वॅब तपासणीचा फज्जा

उपजिल्हा रुग्णालय मध्ये  शिक्षकांच्या स्वॅब तपासणीचा फज्जा
X

म मराठी न्यूज टीम

मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन

23 नोव्हेंबर पासून सर्व शाळा उघडणार आहे म्हणून शिक्षकांच्या स्वॅब तपासणी केली जात आहे याठिकाणी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय मध्ये शिक्षकांच्या स्वॅब तपासणीचा फज्जा उडतांना दिसत आहे. मुर्तीजापुर उपजिल्हा रुग्णालय स्वॅब केंद्रावर मात्र नियोजनाचा अभाव असल्याने शिक्षकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. मूर्तिजापुर शहरातील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात शिक्षकांच्या स्वॅब नमुने तपासण्यासाठी गुरुवार दिनांक 19 ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता पासून सुरुवात झाली केंद्रावर शिक्षक व शिक्षकांच्या रांगा लागल्या परंतू याठिकाणी सुविधा व नियोजनाचा अभाव दिसून आला शिक्षकांना उन्हात उभे रहावे लागले त्याच्यासाठी पाण्याची व प्रसाधनगृहाची होती तर बाजूलाच सांडपाणी व पाण्याचे टाके होते. शिक्षकांना दुर्गंधीचा सामना करत उभे रहावे लागले. अत्यंत संथ गतीने नमुने घेतले जात असताना अनेक शिक्षकांना ताटकळत उभे राहावे विशेष म्हणजे यावेळी सोशल डिस्टन्स व सॅनिटायझर याचा अभाव दिसून आला अशा ठिकाणी नियोजनाचा फज्जा उडून आला उडाला यासंदर्भात उपविभागीय अधिकारी अभय सिंह मोहिते पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संबंधित विभागाला सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश देतो असे सांगितले मात्र या ठिकाणी अनेक घाबरलेल्या शिक्षकांनी सुद्धा प्रतिक्रिया देण्यास नकार दिला तरीपण त्यांनी नाराजगी व्यक्त केली उपजिल्हा रुग्णालय मध्ये नव्याने रुजू झालेले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सोनवणे यांनी अशा विषयाकडे आवर्जून लक्ष देणे आवश्यक असतो परंतु या ठिकाणी एकच खिडकीच्या माध्यमातून स्वॅब तपासणी ला दहा मिनिटाची वेळ लागतो म्हणून या ठिकाणी दोन तपासणी केंद्र करणे आवश्यक आहे उपजिल्हा रुग्णालयाच्या संबंधित डॉक्टरांना सुद्धा शिक्षकांविषयी काळजी घेऊन त्यांना तपासणीसाठी आपल्या परीने सहकार्य करावे अशीही मागणी केली जात आहे

मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन

Updated : 20 Nov 2020 7:22 PM GMT
Next Story
Share it
Top