Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > उंच झोक्याचा आनंद देणारा नागपंचमी सण.....

उंच झोक्याचा आनंद देणारा नागपंचमी सण.....

उंच झोक्याचा आनंद देणारा नागपंचमी सण.....
X

श्रावण महिन्यातील पहिलाच नागपंचमी सण....

----------------------------------------

आधुनिक काळातहि सणाचे महत्व कायम....

----------------------------------------

त-हाडी (प्रतिनिधी)

महेंद्र खोंडे

----------------------------------------

श्रावणाची चाहुल लागताच उंच झोक्याचा आनंद देणारा "नागपंचमी" हा पहिला सण.या सणाला नववधु माहेरी येतात.झिम्या-फुगडीसह झाडाला झोके बांधुन झोके खेळतात.या दिवशी वारुळाची म्हणजे नागसापांची पुजा करण्याची प्रथा आहे हा सण वेदकाळापासुन सुरु झाला आहे.

भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करुन यमुना नदीच्या पात्रातुन सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुध्द पंचमी होता.तेव्हापासुन नागपुजा प्रचारात आली असे म्हणतात या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही,कोणीही भाज्या चिरायच्या नाही,तवा वापरायचा नाही हे नियम पाळत असतात.

नागदेवताची पुजा करुन त्याला दुध लाह्यांचा नैवेद्य दाखविला जातो व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात मात्र साप शेतकर्‍याचा खरा मित्र असुन अंधश्रध्देतुन सापाला दुध पाजले जाते.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सापांचे बळी जातात.साप हा बेडुक,उंदरासारख्या उपद्रवी प्राण्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचे काम करीत असल्याने एक प्रकारे शेतकर्‍यांचा मित्रच आहे.त्याच्याविषयी कृतज्ञता दाखविण्यासाठी नागपंचमीच्या सणाची प्रथा सुरु झाली जिल्ह्यात सुमारे २७ जातींचे साप आढळतात त्यापैकी नाग,मन्यार,फुरसे,रातसर्प,या प्रजाती विषारी आहेत तर धामण,तस्कर,कवड्या,कुकरी,दिवड,धुळनागीन,डुरक्या,महांडुळे,अजगर,रुका,मांजर्‍या,गजरा,वाळा प्रजातीसह २२ प्रकारचे साप बिनविषारी आहेत.दुध हे सापाचे उत्पन्न नाहीत परंतु अंधश्रध्देतुन सापाला दुध पाजले जाते.या प्रकारामुळे दरवर्षी असंख्य सापाचे बळी जात आहे त्यामुळे चिटक्वलाच्या किंवा चित्रातील सापांचीच पुजन केले जाण्याची गरज आहे.

----------------------------------------

प्रतिक्रिया

---------------------------------------

गारुड्यांजवळ असलेल्या सापांचे दात काढुन टाकलेले असतात व सात ते आठ दिवसापासुन अन्नपाण्याविना उपाशीच ठेवलेले असतात त्यामुळे जेव्हा जेव्हा भाविक सापाला दुध पाजतात तेव्हा उपाशी साप नाईलाजाने दुध प्राशन करतो.

---------------------------------

रावसाहेब चव्हाण ( शिरपुर तालुका अध्यक्ष निसर्ग मित्र समिती)

----------------------------------------

चौकट

----------------------------------------

आधुनिक युगात हि सणाचे महत्व.....

आजकालच्या धावपळीच्या युगात हे सर्व सण जरी मोठ्या प्रमाणात साजरे होत नसले. तरी देखील या सणाचे महत्व अद्यापि कायम आहे. त्यामुळे आजची तरुण पिढी या सणाचे महत्त्व समजून घेऊन हे सण साजरे करण्यासाठी पुढाकार घेताना आहे.

----------------------------------------

Updated : 23 July 2020 6:59 PM GMT
Next Story
Share it
Top