इथे मरणाचे ही भय वाटे... अशी मुडाणा स्मशानभूमीची परिस्थिती
X
इथे मरणाचे ही भय वाटे... अशी मुडाणा स्मशानभूमीची परिस्थिती
शरद गोभे/ प्रतिनिधी महागांव
यवतमाळ/ महागाव :- नजीकच्या मुडाणा येथील स्मशानभूमीत गांजर गवतानी विळखा घातला असून सर्वत्र चिखलमय वातावरण दिसून येत आहे त्याचबरोबर स्मशानभूमी वरील टिन पत्रे जीर्ण झाले व सरण रचण्याकरीता खांबाची आवश्यकता असून याकडे संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे
मुडाणा हे गांव एकनाथ महाराजांच्या पावनस्पर्शाने पुनीत झाले असून स्मशानभूमी सध्या अंत्यविधीला अनंत अडचणी येत आहेत, स्मशानभूमीची अवस्था अतिशय वाईट झाली असून पाणी, विद्युत पुरवठा ,स्वच्छता साफसफाई अशा प्राथमिक सुविधाही तिथे मिळत नाहीत त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांसह नागरिकांना देखील संताप व्यक्त करावा लागत आहे दुसरीकडे ग्रामपंचायत प्रशासनासह पदाधिकारी या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे मुडाणा येथील स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार कसे करावे असा प्रश्न नागरिकांच्या मनात घुटमळत आहे .या परिस्थितीबाबत ग्रामपंचायत सचिव व प्रशासक, सदस्यांना माहिती देण्यात आली मात्र त्यांचे या स्मशानभूमीकडे दुर्लक्ष होत असल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईक आणि नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे . किमान सुविधा स्मशानभूमीत गेल्यावर अनेक वेळा सुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती आहे . त्यामुळे अंत्यविधी साठी लागणारे साहित्य त्याचबरोबर पाणी पुरवठा, स्वच्छता आणि साफसफाई विद्युतपुरवठा किमान एक तरी कर्मचारी कामगार स्मशानभूमीत असायला हवा अशी मागणी मुडाणा वासियांच्या वतीने करण्यात येत आहे त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून मुडाणा गावात सुविधांचा अभाव दिसून येत आहे याकडे ग्रा.पं.सचिव व प्रशासक , पं .स. सदस्य, जि .प. सदस्य यांनी लक्ष देण्याची गरज आहे .पं. सं . गटविकास अधिकारी या गंभीर बाबीची दखल घेतील का?
पाणीपुरवठा स्वच्छता आणि साफसफाई विद्युतपुरवठा किमान एक तरी कर्मचारी कामगार स्मशानभूमीत असायला हवा अशी मागणी मुडाणा वासियांच्या वतीने करण्यात येत आहे .