इतना सन्नाटा क्यू है भाई! | Why is there so much silence, brother!
X
लेखक : श्री. तानाजी सखाराम कांबळे.
.........................................................
जग हे पृथ्वीच्या 29% इतक्या, भूपृष्ठावर विस्तारलेल आहे.
तर,पाणी हे जगाच्या 71 टक्के आधिक सभोवताली व्यापले आहे. काही संकटे ही अस्मानी असतात. तर, काही भौगोलिक परिस्थिती वरती विसंबलेल असतात. अशावेळी संकटाच्या गंभीर चक्रविवात सापडल्यास, मानवालाच मानवी जीवनाचे सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्या लागतात. जगभर थैमान घालत असलेला, covid-19 कोरूना नावाचा आजार वाढतच, चालल्याने नाविलाज प्रशासनाला लोक डाऊन सारखा गंभीर पर्याय वारंवार स्वीकारावा लागत आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने मार्गदर्शित केलेल्या सूचनेनुसार लॉक डाऊन ची अंमलबजावणी राज्य सरकारच्या वतीने जिल्हास्तरावर ती जिल्हादंडाधिकारी आपल्या कलम 188 नुसार, जिल्हा बर कङक लॉकडाऊन ची अंमलबजावणी करणे करता, सुधारित आदेश पारित करून, गेले अनेक महिने लोक डाऊन ला मुदतवाडी वरती मुदतवाढ मिळत आहे. या लॉकडाऊन मुळे निर्माण झालेली बंद सदृश्य परिस्थिती ही,जुन्या काळातील हिंदी चित्रपटातील, शोले चित्रपटातील शेख चाचा चा एक ओळीचा डायलॉग आठवल्याशिवाय राहत नाही.
इतना सन्नाटा क्यू है, भाई ! हाच तो शेख चाचा डायलॉग,या डायलॉग मुळे भल्या भल्या हसती ना घाम फोडला आहे.
या डायलॉगमुळे माणूस माणसापासून लांबला आहे.
कुटुंब, कुटुंबापासून विरक्त झाले आहेत.मेव्हणा, पावन, रावळे सारे काही बंद दाराआड संशयाने घरात दडून बसले आहेत. बाजारपेठेच्या वरती रस्त्याकडेला, नेहमीच पिऊन फुल्ल असलेला त्रंबक पांड्या, घरा पाठच्या परसदारातील, खाटेवर ती निपचित पडून राहिला आहे. त्याच्या मनसोक्त जगण्यावर ती काळाने बंदी आणली आहे. यामुळे,तो एकटक आभाळाकडे नजर लावून पहात आहे.गुरुवाच्या दामुअण्णा ला देवळात लई दिवस कौल लावायला कोणी भक्त न सापडल्याने, कुलूप बंद असलेल्या देवाच्या मूर्ती कडे तो रागाने डोळे वटारून पाहत आहे. गावातला खबरी म्हणून ओळख असणाऱ्या, नाव्ही याची वस्तारा ची धार नाव,नाव, बोथट होत चालली आहे. पारंपारिक मातीच्या मुर्त्या विकून, धान्याने तट्टे भरलेल्या घरातील कुंभाराचा सदा, त्याच घरातील धान्य चे तट्टे आता ओस पडू लागल्याने बेचैन झाला आहे. दुकानातील चपलाचे होणारी विक्री कमी झाल्याने,चांभाराच्या बाळुमामाची रापी, थंडगार झाली आहे. कांबळेच्या भाऊमाच मुंबईहून रिकामे हाती आलेले पोरगं, बर्मुडा आणि टी-शर्ट घालून गल्लीत, आलो ना, बघू ना करो ना, सांगू ना,असा काही बाई नन्नाचा पाढा मिरवत असलें, ने समाजाच्या तरुण वर्गाची थोडीफार करमणूक होताना दिसून येते,मात्र पोराला शिकवायसाठी भाऊमान काढलेलं कर्ज, आणि वाढत चाललेल्या डोक्या वरच्या व्याजाचा पसारा पाहून, भाऊमाने घरातील आंथरुन पकडून धरले आहे. सहा महिने सासुरवाशीन झालेली, सुताराच्या गणा ची पोरगी, सहा महिन्याच्या आतच कायमची माहेरवाशिन झाले आहे. तिच्यासाठी समजुतीच्या बोलणी करण्यासाठी जाणे करिता, सासरचे कडील सर्व वाटा बंद झाल्याने,सुताराचा गणा, लोक डाऊन उठायची वाट बघत आहे.
काळाबरोबर पाटील की मानधनी झाल्यामुळे,पाटील वाड्यातले दौलतराव, गावात कोणी आपल्याला 'रिकामे पाटील' म्हणू नये यासाठी लोक डाऊन चे काळात, त्यांचे वडील स्वर्गीय बाबासाहेब पाटलांनी फुलवलेल्या शेत मळ्यातच आपला कायमचा डोलारा व राबता ठेवला आहे. मांगाच्या बापूमाची हलगी आता गावभर दौंडी करता हाकाटे म्हणून पिटू लागली आहे. लग्न बारसे मुंज अशावेळी, कलगीतुरा भेदिक शाहिरी ची शे पाचशे हजाराची सुपारी घेणारा, शाहीर रंगराव आणि पार्टी, आपली शाहिरी कला घरातच तास तास भर सायंकाळच्या वेळी आळवित बसला आहे. शिंद्याच्या बापून,व्याजाच्या हप्त्यावर घेतलेली बँकेकडून, वडापची चार चाकी गाडी, सध्या थकबाकीसाठी दारात येणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्याकडे डोळे टवकारून बघत आहे. देसायच्या हनुमानाच्या पानपट्टीत, पडद्याआड सुरू असणारा तीन पत्तीचा गर्दी खेचणारा डाव, कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे पांगला आहे.पंचायत ला दहा वेळा पडून देखील,भागातील परिसरात "मिनी आमदार" अशी ओळख असणाऱ्या सर्जेराव तात्याने तालुक्याच्या साहेबाच्या वशिल्या वरती अत्यावश्यक सेवेचा पास आपल्या जीप गाडीला चिकटवल्याने,
सर्जेराव तात्या जीप गाडीचा राबता तालुक्यापासून आपल्या गावापर्यंत नेहमीचा उगाचच सुरू आहे.सरपंचांना वाडीव, पदाची मुदतवाढ न मिळाल्याने, सरपंचाने शेतमळ्याचा रस्ता पकडला आहे. पंचायतीचा मिनी कलेक्टर असणारा ग्रामसेवक आता साऱ्या गावाला असं करा, तसं करा, तसं करा, म्हणून धमकावताना दिसून येत आहे. तर,ग्रामपंचायत चा महादेव शिपाई, देखील साहेबाचा तोरा बघून साहेबांच्या आविर्भावात, साहेबांच्या माघारी गल्लोगल्लीत दटावणी देताना दिसून येत आहे.गावातल्या सेवा संस्थेच्या सोसायटीचा हलमा सेक्रेटरी, उगाचच काखला चामडी ब्याग अडकवून, कर्ज मंजुरी अर्थात क.म. मंजुरी च्या नावाखाली जिल्हा बँकेच्या डायरेक्टर च्या गाडीत मागे पुढे मागे पुढे करत आहे. गावातल्या दूध डेरी चा आंदू सेक्रेटरी, दूध डेरी फायद्यात आणण्यासाठी, मापा पेक्षा जास्त दूध टेस्ट च्या नावाखाली, घेत लोक डाऊन चा फायदा उठवताना दिसून येत आहे. गावात माजी आमदाराचे कार्यकर्ते पुढच्या वेळी आणखीन मतदान कमी पडू नये म्हणून, माजी आमदाराने गावातील नागरिकांची काळजी घेतल्याचा, आव आणल्याचा भास करून दाखवत आहेत. तर विद्यमान आमदार यांनी मंत्रालय स्तरावरून कोरोना संसर्गाचा घेतलेला धसका, जास्तीचा मनाला लावून घेतल्याने प्रत्यक्ष भेट देण्याचे त्यांनी टाळले याने अनेक गावातील कार्यकर्त्यांची पंचायत झालेली आहे. तरी पण कार्यकर्ते न राहून साहेबांनी कायद्याची, अंमलबजावणी करून घरातच रहा असा वर उपरी सल्ला देत, विद्यमान आमदार साहेबांचे अब्रू झाकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंद्याच्या आळीच्या धरणातील पावसाळी उड्या आता, थंड पडल्या आहेत. पावसाळ्यातील नदी नाल्यावरचे खेकडे व मासे पकडणारा शंकर, पकडलेले खेकडे व मासे विकता येत नसल्याने, आपल्या घरात व भावकीत, मेव्हणे, पाहुणे,रावळे यांना वाटून स्वतःचा मान-सन्मान वाढवत आहे. मांग वाड्यावरचा सत्तू आता गावठी, शिष्याला पन्नास रुपये घेत आहे तर देशी कॉटर पाठीमागे दीडशे रुपये, इतके तीन पटीने उचलताना दिसून येत आहे. रोगराईच्या काळात 50 रुपये किलोने चिकन विकणारा, बंडा खाटकी आता तेच चिकन, 250 रुपये किलो इतक्या वाजवी दराने विकत आहे. तीट्ट्यावरच्या बाजारातील होलसेल किराणा च्या दुकानात, तसेच आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांच्या कडील दुकानात, खरेदी करण्याची गाव वाल्याची सवय मोडल्याने, गावातील किराणा मालाचे दुकानदार, अत्यावश्यक सेवे खाली, देवदूत असल्याचे भासवून जादा दराने विक्री करतायेत. जास्तीच शिकून आलेली पोरं आता गावाकडे रोप लागणीचे भाताचे कार्यक्रमात, व्यस्त झाल्याचे दिसून येत आहेत. तर, काहीजण आपल्या कामाची आठवण म्हणून, सेल्फी काढताना दिसून येत आहेत. बचत गटाच्या अनेक महिला सरकारच्या नादाला लागून, वाढलेले अनेक महिन्याच्या हप्ते एकदम देता येत नसल्याने, बँकेचा साहेब पुढच्या दाराने आल्यास मागच्या दाराने पलायन करताना दिसून येत आहेत. एखाद्या मराठी पेपरचा गावातला बातमीदार आता, घेतलेल्या जाहिरातीची बिल देखील थकू लागल्याने, पुरता काळवंडून गेला आहे.
या सर्वांच्या चेहऱ्यावर,पाठीमागं दडलेले एक, अनिर्वार्य असं एक दुःख आहे.जे, सरकारच्या कलेक्टरच्या, आदेशाने चिडी चुप शांत झाले आहे. साध्या राहणीमानात गावभर बोंबलत हिंडायची सवय लागली असल्याने अनेकांची, झालेली गोची देखील याला अपवाद राहिलेली नाही.
अशा प्रसंगाला शोले चित्रपटातील शेख चाचा याचा खास डायलॉग, आठवले शिवाय राहत नाही.
इतना सन्नाटा क्यू है भाई!
..........................................................................