Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > आ. रत्नाकर गुट्टे यांच्या इशाऱ्यानंतर एकता कपूर यांची जाहीर माफी

आ. रत्नाकर गुट्टे यांच्या इशाऱ्यानंतर एकता कपूर यांची जाहीर माफी

आ. रत्नाकर गुट्टे यांच्या इशाऱ्यानंतर एकता कपूर यांची जाहीर माफी
X

एकता कपूरच्या विरोधात आमदार गुट्टे यांनी दिली होती पोलिसात तक्रार

परभणी शांतीलाल शर्मा

बालाजी टेलीफील्मच्या माध्यमातून विविध मालिका, वेब सिरीज तयार करुन गृहिणींना आपल्याशी खिळवून ठेवणार्‍या एकता कपूरनं यांनी महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वस्तीगृहाला नामोल्लेख करणाऱ्या अभिनेत्री च्या विरोधात कारवाई करत माफी मागण्याचे गंगाखेड विधानसभा चे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आव्हान केले होते या आव्हानाला प्रतिसाद देऊन अभिनेत्री कपूर यांनी माफी मागितल्यामुळे कार्यकर्त्यात नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे काही दिवसपूर्वी व्हर्जीन भास्कर ही वेब सिरीज तयार केली होती.

या वेबसिरीजध्ये दाखविण्यात आलेल्या एका इमारतीवर अवघ्या महाराष्ट्राच दैवत असलेल्या पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर मुलींचं वस्तीगृह असं नामकरण करण्यात आलेलं दाखविण्यात आल होत वास्तविक या वेब सिरीजमध्ये राजामाता आहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा संदर्भ देवून एकता कपूर आणि बालाजी टेलीफील्मच्या वतीनं आहिल्यादेवी होळकर यांचा घोर अपमान केलाय त्याच बरोबर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचली . या बाबत गंगाखेड विधानसभा मतदारसघाचे आ.डाँ.रत्नाकर गुट्टे यांनी एकता कपूर अणि बालाजी टेलीफील्म यांच्यावर कठोर कारवाई करावी आशयाची फिर्याद अंबोली पोलीसात दिली होती. त्याच बरोबर बालाजी टेलीफील्मनं संपूर्ण महाराष्ट्राची जाहिर माफी मागावी अन्यथा परिणामाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला होता.त्यावरुन बालाजी टेलीफील्मच्या वतीनं एकता कपूर यांनी जाहिर माफी मागितली आहे.आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे सर्व समाजाच्या वतीने अभिनंदन केले जात आहे.

Updated : 9 Sep 2020 5:52 PM GMT
Next Story
Share it
Top