आ. भिमराव केराम यांनी घेतली शोकाकुल बेहेरे कुटूंबियांची सदिच्छा भेट
X
श्रीक्षेत्र माहूर/ता.प्र.पदमा गिर्हे
दि. २८ माहूर तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले आमदार भिमराव केराम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वाई (बाजार) येथे दिवंगत शंकरराव बेहेरे पाटील यांच्या कुटूंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले व एका पारिवारीक सदस्याप्रमाणे हिंदू प्रथेनुसार सारे सोपस्कार पुर्ण करून शोकाकुल कुटूंबियांचे दु:ख दूर करण्याचा प्रयत्न केला.
नुकतेच स्वर्गवासी झालेले वाई (बाजार) चे माजी सरपंच शंकरराव बेहेरे पाटील यांच्या कुटूंबियांची भेट राज्यसभा खासदार मा.राजीव सातव यांनी मागील आठवड्यात घेतली तदनंतर लगेचच आमदार भिमराव केराम यांनी शोकाकुल बेहेरे परिवाराची भेट घेतली. भेटीदरम्यान मृतात्म्याचे फोटोचे यथाविधी पुजन केले व हिंदू प्रथेप्रमाणे चहा अर्जीत करून पुत्र गणेश बेहेरे व पत्रकार कैलाश बेहेरे यांना दुखावेग आवरण्यासाठी धिर दिला. यावेळी त्यांचे समवेत आलेले भाजपा नेते धरमसिंग राठोड, अनील तिरमनवार, विष्णू पडलवार, गोपू महामुने, देवराव कुडमेथे, सरपंच देवजी आत्राम, प्रकाश कुडमेथे यांनी सुद्धा मृतात्म्याबद्दल सदभावना व्यक्त करीत कुटूंबियांना धिर दिला.