Home > विदर्भ > आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी केले किरणचे सत्कार:किरणचे इंडिया बुक ऑफ रेकोर्ड मध्ये नोंद!

आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी केले किरणचे सत्कार:किरणचे इंडिया बुक ऑफ रेकोर्ड मध्ये नोंद!

आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी केले किरणचे सत्कार:किरणचे इंडिया बुक ऑफ रेकोर्ड मध्ये नोंद!
X

किरण टॅक्सी चालवून शिरपेचात मानाचा तुरा रोवली.

अहेरी विशेष तालुका

प्रतिनिधी/स्वप्नील गोलेटिवार

मो. ८३९०८७९१५२

अहेरी:- सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा येथील किरण कुर्मावार हिचे नुकतेच "इंडिया बुक ऑफ रेकोर्ड" मध्ये नावाची नोंद झाल्याने माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी शुक्रवारी किरण कुर्मावार हिच्या गळ्यात पुष्पहार घालून व शाल, श्रीफळ देऊन भावपूर्ण सत्कार करून गौरविले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, किरणचे वडील रमेश कुर्मावार उपस्थित होते.

आणि तसेच रेगुंठा येथील माजी उपसरपंच श्रीनिवास कडार्लावार, सत्यनारायण परपटलावार, पदमा परपटलावार सुद्धा उपस्थित होते.

किरण कुर्मावार उच्च शिक्षित असून नौकरीच्या मागे न लागता प्रवासी वाहतूक करणारी टॅक्सी चालवून कुटुंबाचा गाढा समोर हाकलीत असून किरणची "इंडिया बुक ऑफ रेकोर्ड" मध्ये नावाची नोंद झाली.

किरणला आई-वडील व दोन विवाहित बहिणी आहेत. मोठी बहीण स्वाती उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान शाखेतुन रसायनशास्त्रात एमएससी केली तर दुसरी बहीण दिव्या बायोटेक्नॉलॉजी केली असून सर्वात लहान 24 वर्षीय किरण अर्थशास्त्रात एम.ए. झाली आहे.

किरण नौकरीच्या मागे न लागता प्रवासी वाहतूक करण्याचा व्यवसाय करणारे वडील रमेश कुर्मावार यांना साथ देऊन स्वतः ड्रायव्हिंग शिकली. त्याच दरम्यान वडिलांचे एका अपघातात पायाला दुःखापत झाल्याने घरच्या गाडीची (बोलेरो) प्रवासी वाहतुकीसाठी रोजच्या रोज रेगुंठा ते सिरोंचा असा अप-डाऊन 140 किलोमीटरचा अंतर किरण स्टेअरिंगवर बसून गाडी सोबतच घरच्या कुटुंबाचा गाढाही हाकत आहे. म्हणूनच किरणच्या या महान कार्यासाठी

"इंडिया बुक ऑफ रेकोर्ड" मध्ये नावाची नोंद घेण्यात आली असून नुकतेच ऑनलाईन समारंभात किरणच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवण्यात आला.

किरण ही अन्य युवतींसाठी आशेचा किरण ठरणार!

24 वर्षीय किरण कुर्मावार या मुलीने स्वतःच्या कर्तृत्वाने शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याने अन्य युवतींसाठीही अभिमानाची बाब आहे, किरण युवती व महिलांसाठी आशेचा किरण ठरणारी असून आता युवतींनी न लाजता न घाबरता व न डगमगता निर्भीडपणे पुढे येऊन स्वतःच्या पायावर उभी राहून स्वावलंबी बनावे. आता मुली व युवतींनी कोणत्याही क्षेत्रात उंच भरारीसाठी सज्ज होऊन स्वयंस्फूर्तीने पुढे यावे आम्ही सदैव पाठीशी असणार..


Updated : 19 Oct 2020 1:35 AM GMT
Next Story
Share it
Top