Home > महाराष्ट्र राज्य > आषाढी एकादशीला `देवशयनी' (देवांच्या निद्रेची) एकादशी' असे म्हणतात

आषाढी एकादशीला `देवशयनी' (देवांच्या निद्रेची) एकादशी' असे म्हणतात

आषाढी एकादशीला `देवशयनी (देवांच्या निद्रेची) एकादशी असे म्हणतात
X

जाकीर हुसैन

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवसांनंतर देव चार महिन्यांसाठी झोपी जातात असा विश्वास आहे. देवशयनी एकादशी असे नाव का पडले ?

आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला 'देवशयनी' (देवांच्या निद्रेची) एकादशी' असे म्हणतात. यानंतर चार महिने, म्हणजेच आषाढाचे 20 दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस देव झोपी जातात. या चार महिन्याच्या झोपेत ठीक दोन महिन्यांनी ते कुशीवर वळतात म्हणून भाद्रपदातील एकादशीला 'परिवर्तनी एकादशी' असे म्हणतात. चार महिन्यानंतर त्यांना जाग येणार म्हणून कार्तिकी एकादशीला 'प्रबोधिनी एकादशी' असे म्हणतात.

Updated : 12 July 2020 2:33 PM GMT
Next Story
Share it
Top