आशा सेविकेचा गौरव यवतमाळ अर्बन बँकेचा स्तुत्य उपक्रम . जिल्हा संघचालक गोविंद हातगांवकर
X
पांढरकवडा :-
यवतमाळ अर्बन बँक शाखा पांढरकवडा द्वारा कोरोना महामारीच्या कालखंडात कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार नुकताच घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक गोविंदराव हातगावकर हे होते तर व्यासपीठावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय मडावी ,शाखा व्यवस्थापक अशोक पार्लावार, अधिकारी दयानंद कांबळे,विभागीय मार्केटिंग अधिकारी प्रसाद नावलेकर आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गोविंदराव हातगावकर यावेळेस विचार व्यक्त करताना म्हणाले ,कोरोना महामारीत आशा सेवेकाचे कार्य अतुलनीय आहे .त्यांनी जी सेवा दिली त्या सर्व आशा सेविकांचा गुणगौरव यवतमाळ अर्बन बँकेने केला ही महत्त्वाची घटना असून अर्बन बँकेने सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य प्रशंसनीय आहे. बँकेचे अध्यक्ष अजय मूधंडा तसेच संचालक मंडळाने हा उपक्रम सर्व शाखांत राबविला व आशा सेविकांना कोरोना योद्धा म्हणून जो गुणगौरव केला हे कार्य आशा सेविकांना अधिक चांगले कार्य करण्यास प्रोत्साहन देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच कोरोना काळात बँक कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे आहे त्या सर्वांचे अभिनंदन त्यांनी केले.
आशा सेविका मेघा देशाट्टीवार ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करून बँकेच्या या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मडावी यांनी बँकेने केलेल्या कार्याच्या संदर्भात आभार व्यक्त करून आर्थिक क्षेत्रासह बँकेने सामाजिक क्षेत्राकडे ही लक्ष द्यावे असा विचार व्यक्त केला. शाखा व्यवस्थापक अशोक पार्लावार यांनी आशा सेविका रुग्णाची काळजी घेतात तसेच त्यांनी स्वतः बचत करण्याची सवय लावायला हवी यासाठी आपली बँक यवतमाळ अर्बन बँक आहे हे आपल्याला सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन त्यांनी दिले.
प्रास्ताविक व संचलन करतांना बँकेचे विभागीय अधिकारी ( विपणन ) प्रसाद नावलेकर म्हणाले की सामान्य माणसाला बँकिंग शिकविणारी आदिवासी भागातील जुनी बँक असून प्रत्येक घरात व गावात यवतमाळ अर्बन बँक पोचली आहे. नोटबंदी असो की कोरोना महामारी बँकेने ग्राहकांची गैरसोय होऊ दिली नाही .त्यामुळे बँकेबद्दल आपलेपणा वाढतच आहे असे सांगून बँकेच्या योजनांची माहीती सांगितली.आर्थिक कार्याबरोबर संस्था विविध सामाजिक कार्य करत असलेल्या मदतीची यावेळी त्यांनी सर्वांना माहिती दिली. आभार बँकेचे अधिकारी दयानंद कांबळे ह्यांनी मानले .कार्यक्रमाला आशासेविका ,बँकेचे कर्मचारी ,सुरेश रिठे,विनोद पेरकावार, विवेक कोशनमवार, ज्योती कुलसंगे,खुशाल खडसे,प्रदीप बोलेवार, दिलीप जक्कावार दैनिक ठेव प्रतिनिधी उपस्थित होते .
प्रसाद नावलेकर