Home > विदर्भ > आलापल्ली येथे ''64 वा धम्मचक्र प्रवर्तनदिन कार्यक्रम संपन्न. "

आलापल्ली येथे ''64 वा धम्मचक्र प्रवर्तनदिन कार्यक्रम संपन्न. "

आलापल्ली येथे 64 वा धम्मचक्र प्रवर्तनदिन कार्यक्रम संपन्न.
X

"आलापल्ली येथे ''64 वा धम्मचक्र प्रवर्तनदिन कार्यक्रम संपन्न. "

म मराठी न्यूज नेटवर्क

( सिरोंचा विशेष/प्रतिनिधी,रवि बारसागडी)

गडचिरोली/सिरोंचा :- संघमित्रा बुद्ध विहार आलापल्ली येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोली( दक्षिण) आणि तालुका शाखा अहेरी तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आलापल्ली याच्या संयुक्त विद्यमाने.

" 64 वा धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा "कार्यक्रम

साजरा करण्यात आला. आदरनिय नारायणजी दूर्गे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . आदरणीय दूर्गम सर,आदरनिय नारायणजी दूर्गे, आयु. दादाजी फूलझेले,आयुष्यमती शारदाताई चालूरकर ,आयनिु. सुमन निमसरकार ,आयु. भीमराव झाडे यांच्या हस्ते महाकारुनिक तथागत भगवान बुद्ध, बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलित करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आले व सामुहिक बुध्दवंदना घेण्यात आली. त्यानंतर सर्व उपासक उपासिकांकडुन बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आल्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन आयु .बी. दूर्गम सर ,आयु.लैजा मँडम , आयु. दामोधर राऊत सर यांनी अशोका विजयादशमी तथा धम्मचक्रप्रवर्तन दिनाचे महत्व, धम्माची शिकवण यावर मार्गदर्शन केले. शेवटी आयु. भीमराव झाडे साहेब यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्वाचे आभार मानले.

Updated : 25 Oct 2020 1:41 PM GMT
Next Story
Share it
Top