## आर्जव ##

## आर्जव ##
X

##आर्जव##

दे ज्ञानियाची बुद्धी मजला

दे तुकोबा सम वाणी,

दे गोऱ्या कुंभाराची तल्लीनता

दे जनाबाईंची गाणी ।।

दे अभंग चोखामेळ्याचे

दे भक्ती, जशी सावता माळी,

दे नाम्याचे बोल अमृतासम

दे निश्चय, रामदासी आभाळी ।।

दे एकनाथांच्या ओव्या मजला

दे संकल्प, नरहरी वारकरी,

दे साधना मुक्ताईची,

दे गाडगे बाबांची शिदोरी ।।

दे प्राणप्रिय विठू तू मजला

दे तुझे नाम श्वासासी,

दे सर्व संत गुण मजलासी

दे भक्ती निश्चल अविलासी ।।

शब्दरचना

पराग पिंगळे

यवतमाळ

Updated : 13 July 2020 5:44 AM GMT
Next Story
Share it
Top