Home > About Us... > दमदार परिचयाचा माणूस ! भगवान बापू पाटील.

दमदार परिचयाचा माणूस ! भगवान बापू पाटील.

Strong acquaintance man! Bhagwan Bapu Patil.

दमदार परिचयाचा माणूस ! भगवान बापू पाटील.
X

......................... ...........................

जिल्हा परिषद कोल्हापूर व नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर चे सदस्य

......................... ...........................

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा वरती

सदस्य नियुक्ती झाल्याबद्दल विशेष अभिनंदन.

......................... ...........................

लेखक : श्री तानाजी सखाराम कांबळे.

8080532937.

......................... ...........................

खरं तर, प्रत्येक माणसामध्ये स्वाभिमानी

आणि आत्मसन्मान या गोष्टी नक्कीच दडलेले असतात. जिल्हा परिषद कोल्हापूर व नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर चे सदस्य,श्री. भगवान बापू पाटील यांना वरील बाब लागू पडते.

एक शिपाई, अध्यापक, त्याच गावचा अनेक वर्षे सरपंच, त्याच तालुक्यातील राजकारणाचा मोटिवेशन करणारा डिझास्टर मॅनेजमेंट, पॉलिटिकल कसं असायला हवं याची

पी.जी.शिंदे या गटाच्या माध्यमातून" चूनुक " दाखवणारा अवलिया मिनी मंत्रालय ओळख म्हणून असणाऱ्या जिल्हा परिषद कोल्हापूरला तब्बल दोन वेळा भरगोस मतांनी निवडून जाणारा सच्चा लोकप्रतिनिधी म्हणून

श्री.भगवान बापू पाटील सरांकडे बघितले जाते.विद्यार्थी, समाजकारण राजकारण प्रशासन चतुर्थश्रेणी कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी राजपत्रित अधिकारी, उद्योजक व्यापारी व्यावसायिक,शेती व सहकारी क्षेत्रातील तज्ञ कर्मचारी, या सर्व क्षेत्रातील लोकांना हा माणूस हवाहवासा वाटतो आहे.त्यांचे वडील

बापू पाटील तिसंगी गावातील एक प्रमुख नेते होते.घरी वडिलांच्या कडे अनेक लोक त्या वेळी समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत. घरातील त्या होणाऱ्या गावाशी संबंधित चर्चा श्री. पाटील यांच्या डोळ्यातून सुटल्या नाहीत.या गोष्टीची त्यांनी नीट निरीक्षण करून लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आपणही काहीतरी अशा पद्धतीने काम केले पाहिजे समाजासाठी समाजाच्या विकासासाठी बारा बलुतेदारांना सोबत घेऊन आपण त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत हा ध्यास त्याने शेवटपर्यंत बाळगला आहे.श्री पाटील यांनी आयटीआय वेल्डर हा कोर्स केलेला आहे. नोकरीच्या कामानिमित्ताने पुण्यामध्ये अनेक वर्ष विविध कंपनीमध्ये काम केलेला आहे .श्री.पाटील यांची काम करण्याची तळमळ धडपडण्याची तळमळ वेगळा विषय हाताळण्याची चिकाटी आणि ओटावर साखर आणि डोक्यावर बर्फ घेण्याची लहानपणापासूनची पद्धत अनेकांना

भावणारी होती आणि आज अखेर ठरत आहे.

पुण्यामध्ये काम करत असताना

श्री.पाटील यांचा स्वभाव तरुणपणीचा व त्यांची काम करण्याची चिकाटी ची पद्धत बघता अनेक श्रीमंत दाम्पत्याचा कडून त्यांना लग्नासाठी मुलगी देणेबाबत ची ऑफर आली होती.

मात्र श्री.पाटील यांनी व्यक्तिगत स्वार्थ न बघता आपल्या गावाकडे आपले कुटुंब आणि एकत्रित असलेले फॅमिली या सर्वांचा विचार करता सामुदायिक पद्धतीने घरातील सर्वांचा जो जो निर्णय ठरेल त्याला अनुसरूनच त्यांनी निर्णय घेतला.

आंतरजातीय विवाहाला समाजातून मिळणारा प्रतिसाद पाहता श्री पाटील यांनी केलेला आंतरजातीय विवाह हा कौतुकास्पद ठरणार आहे!

भाग 1

........................ ........................

लेखक : श्री तानाजी सखाराम कांबळे.

8080532937.

Updated : 4 Sep 2021 1:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top