Home > About Us... > पोलीस खात्यातील संवेदनशील मनाचा,दृढनिश्चयी माणूस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल.

पोलीस खात्यातील संवेदनशील मनाचा,दृढनिश्चयी माणूस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल.

Sensitive in the police department A man of mind, a determined man, senior police inspector Sitaram Dubal.

म.मराठी वृत्तसेवा,मुंबई.

शनिवार दि.12; तानाजी कांबळे


म.मराठीच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांची मुलाखत घेतलेली आहे.दिनांक 12/ 6/2021 रोजी "शनिवार विशेष" म्हणून सदरची प्रसिद्ध मुलाखत

--------------------------------------------

राजारामपुरी,ज्याला महालक्ष्मी नगर देखील म्हटले जाते. भारताच्या दक्षिण महाराष्ट्रातील दक्षिण कोल्हापूर शहरात एक उपनगर आहे. ऐतिहासिक शहराचे संस्थापक छत्रपती राजाराम महाराज यांच्या नंतर हे नाव ठेवले गेले.तो ई वॉर्ड अंतर्गत येतो. हे एक सामान्य निवासी क्षेत्र आहे.ज्यात कपड्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत आणि किराणा ते दागदागिनेपर्यंत सर्व काही व्यापते.हे विविध अभ्यासक्रम आणि अभियांत्रिकी वर्गांच्या शिकवणीसाठी देखील ओळखले जाते.


येथे विविध प्राचीन बाग, ग्रंथालय आणि मंदिरे देखील आहेत. जिल्हा.न्यायाधीश शामराव गणपतराव मंडलिक पार्क,श्री दत्त मंदिर"अग्णे मुखी हनुमान मंदिर, राजारामपुरी तालीम मंडळ


भाजीपाला बाजार,एकूण 14 गल्ली आहेत.राजर्षी शाहू जलतरण तलाव, राजारामपुरी येथे एक ऑलिम्पिक आकाराचा एक छान स्विमिंग पूल आहे.


राजारामपुरीस,आणखीन एक दुसरी ओळख आहे जी सतत जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात चर्चेला राहिली आहे. राजारामपुरी पोलीस स्टेशन असे त्याचे नाव आहे. राजारामपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील 14 गल्ली व निवासी असणारा परिसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत या ठिकाणी दिवसाढवळ्या तलवारी चाकू,सुरा तळपतात.


सराईत गुंड संदीप उर्फ चिकन्या हळदणकर, एसटी गॅंग चा सूत्रधार,स्वप्निल तहसीलदार


गुंड साईराज जाधव,चर्चेतील अवधूत माळवी खून प्रकरणातील मुख्य आरोपी तिवडे व त्याची टोळी, कवाळे गॅंग, वास्कर गॅंग,यांच्यासह अनेक छोट्या मोठ्या नव्याने तयार झालेल्या टोळ्या, राजारामपुरीतील नेहमीची शांतता भंग करणारे ठरतात.


येथील वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसावा याकरता वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सिताराम लक्ष्मण डुबल यांनी, नुकतीच गुंड स्वप्निल तहसीलदार व त्याच्या बारा साथीदारांना हद्दपारीची कारवाई करून जेरबंद केले होते.


अशा संवेदनशील अशा राजारामपुरी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सिताराम दुखल यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह, एकूण 80 पोलीस कर्मचारी वर्ग यांचा राबता कायम आहे.

Updated : 2021-06-12T15:00:24+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top