Home > About Us... > पत्रकार ते आमदार व खासदार इम्तियाज जलील

पत्रकार ते आमदार व खासदार इम्तियाज जलील

Journalist turned MLA and MP Imtiaz Jalil

पत्रकार ते आमदार व खासदार इम्तियाज जलील
X

झाकीर हुसैन- 9421302699


औरंगाबाद : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व खासदार सैय्यद इम्तियाज जलील यांचा जन्म १० ऑगस्ट १९६८ रोजी झाला. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या सैय्यद इम्तियाज जलील यांनी होली क्रोस इंग्लिश हायस्कूल, मौलाना आजाद कॉलेज ऑफ आर्ट्स एंड साइंस, एमजीएम ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूशन मैनिजमेंट व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारितेत पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लोकमत टाइम्समधून पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली.

पुढे त्यांना टी. व्ही न्यूज चॅनेलमध्ये संधी मिळाली आणि पुण्यात एन. डी. टीव्हीचे ब्यूरो चीफ म्हणून त्यांनी काम केलं. सैय्यद इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद आणि पुण्यात लोकमत आणि एनडीटीव्ही मध्ये अनेक वर्ष पत्रकारिता केली. मात्र ही वाट सोडून त्यांनी राजकारणाची कास धरली. एम. आय. एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांनी इम्तियाज जलील यांना एम. आय. एम. पक्षामध्ये प्रवेश करून अनेकांना धक्का बसला. पक्षाने त्यांना विधानसभेसाठी औरंगाबाद मध्य मधून उमेदवारी दिली. पहिल्याच प्रयत्नात शिवसेनेच्या प्रदीप जयस्वाल यांचा पराभव करत ते विधानसभेवर निवडून आले. पुढे २०१९ मध्ये देखील लोकसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात खासदारही झाले. ऑल इंडिया मजलिस-ए इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाची स्थापना १९२७ साली झाली. या पक्षाने नांदेड महापालिकेत २०१२ मध्ये प्रवेश केला आणि पुढे २०१४ इम्तियाज जलील विधानसभेवर निवडून गेले. आजपर्यंत अनेक पत्रकार विधानसभा सदस्य व लोकसभा सदस्य झाले मात्र जनतेतून निवडून लोकसभेत जाणाऱ्या अतिशय थोड्या पत्रकारांमध्ये सैय्यद इम्तियाज जलील यांची गणना होते. पहिल्याच प्रयत्नात आमदार आणि पहिल्याच प्रयत्नात खासदार ही सैय्यद इम्तियाज जलील यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली. इम्तियाज जलील यांनी आपल्या प्रचारात केवळ औरंगाबाद शहराच्या विकासाच्या मुद्दयावर खैरेंवर टीका केली व विजय मिळवला. २३ मे २०१९ जेव्हा लोकसभेच्या निकालांची मतमोजणी सुरू होती. चंद्रकांत खैरे आणि सैय्यद इम्तियाज जलील यांच्यात चुरशीची लढत सुरू असताना. मात्र सगळ्यात लक्षवेधी लढत ठरली ती औरंगाबादची. चार वेळा लोकसभेत निवडून गेलेल्या चंद्रकांत खैरेंचा एमआयएमचे सैय्यद इम्तियाज जलील यांनी चुरशीच्या लढतीत पराभव केला. २०१४ मध्ये पत्रकारितेची नोकरी सोडून राजकारणात येणाऱ्या सैय्यद इम्तियाज जलील हे लोकसभा सदस्य झाले. आजपर्यंत अनेक पत्रकार विधानसभा सदस्य व लोकसभा सदस्य झाले मात्र जनतेतून निवडून लोकसभेत जाणाऱ्या अतिशय थोड्या पत्रकारांमध्ये सैय्यद इम्तियाज जलील यांची गणना होते. आणि सध्या खा. जलील हे महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डचे सदस्य व नुकत्याच भारतातील प्रसिध्द विश्व विद्यालय जामिया मिलिया इस्लामियाच्या कोर्ट मेंबरपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज त्यांचा वाढदिवस. या वाढदिवस दिनी ईश्वर त्यांना निरोगी व दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना! -

फिरोज खान, एम.ए. समाजशास्त्र

पुसद. मो.नं. ९८५०५२५५५७

Updated : 10 Aug 2022 11:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top