Home > About Us... > " प्रशासनातील आयडॉल, आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे " ! ...

" प्रशासनातील आयडॉल, आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे " ! ...

"Idol in administration, Commissioner Dr. Prashant Naranware"! ...

लेखक : तानाजी सखाराम कांबळे ; मुंबई


एखाद्या व्यक्तीने इछाशक्तीच्या जोरावर एखादी गोष्ट करायची ठरविले तर अशक्य असे काहीही नसते. सद्या राज्याच्या समाज कल्याण विभागात असेच महत्वपुर्ण बदद्ल घडवुन प्रशासकिय कामकाजात गतिमानता निर्माण झाली आहे. विभागाला मंत्री धनंजय मुंडे यांच्यासारखे कृतीशील नेतृत्व लाभाले असुन त्यांच्याजोडीला समाज कल्याण आयुक्त म्हणून डॉ.प्रशांत नारनवरे यांची कारकिर्द देखील मह्त्वाची आहे. डॉ.नारनवरे यांनी आयुक्त पदाचा दि.१० सप्टेंबर २०२० रोजी कार्यभार स्विकारला होता त्याच्या कार्यकाळास १ वर्ष पुर्ण झाले असुन योगायोग म्हणजे दि.११ सप्टेंबर रोजी डॉ.नारनवरे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमीत समाज कल्याण विभागातील त्यांच्या कामकाजाचा डॉ नारनवरे पॅटर्नचा घेतलेला आढावा.

१. उस्मानाबादचे एक तरुण जिल्हाधिकारी या नात्याने डॉ.प्रशांत नारनवरे यांना शेतीच्या संकटातून शेतकरी आत्महत्यांचा वाढत्या घटना स्वस्त बसु देत नव्ह्त्या. त्यांनी ठरवले शेतकर्यां शी मनःपूर्वक चर्चा केली, थेट बाधावर जाऊन संवाद साधला व त्यादृष्टीने उपाययोजना प्रांरभ केला. जास्त प्रमाणात पाणी सेवन करणार्याथ ऊसाची लागवड कमी झाली व त्यातुन अनेक प्रश्न सुटण्यास मदत होऊ लागली.! शेतक-याना आव्हानांना सामोरे जाण्यास तयार केले आणि स्वत:चा जीव घेण्याचा विचार करू नका. अशी भावना नुसती निर्माण केली नाही तर शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतक-यांना करुन देत सक्षम बनविले.

२. उस्मानाबाद जिल्ह्यातील लिंग विषमता चे प्रमाण बाबत चिंतेचा विषय केंद्र शासनाने जिल्हाधिकारी यांना कळविला. डॉ.प्रशांत नारनवरे ह्या संवेदनशील जिल्हाधिकारी यांनी हे लक्षात घेतले आणि उस्मानाबादमधील सर्व वैद्यकीय केंद्रांना भेट दिली, वैद्यकीय अधिकारी व इतरांशी बोलताना त्यांनी महिलांना स्त्री भ्रूणहत्येपासून वंचित ठेवण्यापासून रोखण्यासाठी दबाव आणला. पुढच्या जनगणनेत, लिंग गुणोत्तरात नाटकीय सुधारणा झाली आणि प्रत्यक्षात त्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले गेले. केंद्राच्या वतीने गौरव देखिल करण्यात आला. हे प्रयत्न म्हणजे एका अधिका-याचा पुढाकार ,गतिशीलता आणि कर्तव्य करण्याची त्यांची वचनबद्धता हे त्याचे कार्य चिन्हांकित करते. अश्या अधिका-यांचा उत्कृष्ठ जिल्हाधिकारी म्हणुन शासनाने गौरव करणे ही त्यांच्या कार्यावर मोहरच म्हणवी लागेल.

३. ग्रामीण भागातील लोकांची, विशेषत: महिलांच्या रोजीरोटीची संभावना वाढविण्याकरिता आणि कृषी उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चितपणे कश्यापध्दतीने केली जाते हे पहावयाचे असेल तर पालघरच्या आदिवासी महिलांना भेटले पाहिजेत. आदिवासी महिलांना चुल, मुल पर्यन्त मर्यादित न ठेवता राष्ट्रिय स्तरापर्यंत त्यांच्या कार्याचे नुसती ओळख करुन दिली नाही तर बाजारपेठ उपल्ब्ध करुन दिली. तत्कालिन जिल्हाधिकारी म्हणुन पालघर जिल्ह्याच्या आदिवासी भागात केले, जिथे त्याचे नाव प्रत्येक घरात आणि प्रत्येक गावात ओळखले जाते. अगदी लहान मुलांनाही त्याच्याबद्दल माहिती आहे. हे फक्त आणी फक्त आपल्या कामाच्या पध्दतीमुळे डॉ.नारनवरे यानी शक्य करुन दाखवले आहे.

वरील तीनही उदाहरणे ही एका भारतीय प्रशासकिय सेवेतील अधिका-राची असुन व्यक्ती म्हणुन जरी त्यांचे नाव घेतले जात असले तरी त्यामागे त्यांचा असलेला विचार, प्रशासकीय गतिमानता व सुधारणांतुन समाज कल्याण हा घ्यास असावा हे निश्चितच ! मग असा अधिकारी कुठेही कार्यरत असो त्यांना त्यांचा घ्यास स्वस्त बसु देत नाही. तसा अनुभव सद्या राज्याच्या सामाजिक न्याय विभागात येत आहे. व त्यातुनच अवघ्या वर्षभराच्या कालावधीत डॉ. नारनवरे यांनी समाज कल्याण विभागात केलेल्या प्रशासकीय सुधारणांची आता सर्वत्र चर्चा होत आहे. कर्मचाऱ्यांमध्ये वर्तणूक, शिस्त व कार्यालयीन कार्यपध्दती रूजावी यासाठी त्यांनी प्रत्येक पदनिहाय कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांच्याकडून ते सांभाळत असलेल्या योजनांच्या कामकाजा विषयी विशिष्ट प्रश्नावलीच्या माध्यमातून माहिती जाणून घेतली. प्रत्येक महसूल विभागानिहाय अधिकाऱ्यांच्या त्या-त्या विभागात जाऊन कामकाजाचा आढावा घेतला.

सध्या समाजकल्याण विभागाच्या राज्यातील कोणत्या कार्यालयात नुसता फेरफटका मारला तर आपणास एकही कागद अस्ताव्यस्त पडलेला दिसणार नाही. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टेबलावर मोजक्याच फाईल, टेबलावर अधिकारी-कर्मचारी नाव असलेली पाटी ,जॉबचार्ट, प्रत्येकाच्या गळ्यात ओळखपत्र, कार्यालयाच्या दर्शनी भागात योजनांचे संक्षिप्त गोषवारा असलेलं फलक, माहिती अधिकार 1 ते 17 मुद्यांची माहिती, नागरिकांची सनद व येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांशी विन्रमतेने वागणारे अधिकारी व कर्मचारी असे चित्र तुम्हाला दिसून येईल. हे सर्व बदल घडवून आणण्याचं श्रेय समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांना जाते.

राज्यातील प्रत्येक कार्यालयातील अभिलेख्यांची अ, ब, क, ड प्रमाणे वर्गवारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रेकॉर्डचे सहा गठ्ठे पध्दतीने वर्गीकरण करणे, त्यासाठी प्रत्येक कार्यालयात रेकॉर्डरूम तयार करणे, त्यासाठी 15 दिवसाची डेडलाईन ठरवून देण्यात आली. रेकॉर्ड रूम झाले आहेत किंवा नाहीत याबाबत आयुक्तांनी स्वत: क्षेत्रिय कार्यालयात जाऊन आढावा घेतला. जेथे जाणे शक्य नसेल अशा ठिकाणी पुणे आयुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या टीम तयार करण्यात आल्या. यामुळे पंधरा दिवसातच राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये रेकॉर्ड रूम उभे राहिले. 'ई-गव्हर्नस' , 'झीरो पेंडन्सी' व 'डेली डिस्पोजल' या संकल्पना राबवतं प्रत्येक कर्मचाऱ्यांला आयुक्तांनी कार्यप्रवण केलं आहे.

ज्या दिवशी पत्र प्राप्त झालं त्याच दिवशी त्या पत्रावर कार्यवाही (डेली डिस्पोजल) करण्याचे आदेश असल्यामुळे 'झीरो पेंडन्सी' ची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी झाली आहे. 'स्वच्छ कार्यालय' या संकल्पनेत कार्यालयातील अभिलेख कक्षातील अभिलेख्यांचे निंदणीकरण, वर्गीकरण व अद्ययावतीकरण करणे ही कामे प्राधान्याने करण्यात आली. डॉ नारनवरे यांच्या कार्यकाळात पुढील गोष्टीचा आवर्जुन उल्लेख केला पाहिजे, कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत विविध संवर्गातील अनेक वर्षापासुन निलंबित असलेले कर्मचारी यांच्या सेवा पुनर्स्थापित केले आहेत. राज्यातील ११ कर्मचाऱ्यांच्या सेवा पुनर्स्थापित करण्यात आलेले आहेत. तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुला-मुलींच्या निवासी शाळेतील विविध संवर्गच्या २१ कर्मचाऱ्यांचा देखील नियमित वेतनश्रेणीचा प्रलबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. राज्यभरातील निलंबित असलेले कर्मचारी यांच्या सेवा लवकरात लवकर पुनर्स्थापित करणेसाठी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील निलंबन आढावा समितीस सुचित केले आहे.

कर्मचा-यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ व्हावी यासाठी सर्व कर्मचा-यांसाठी " कर्मचारी कौशल्य विकास अभियानाची " सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आली. यामध्ये दररोज सकाळी 9.45 ते 10.30 या कार्यालयीन वेळेत कर्मचा-यांना टायपिंग, संगणक व कार्यालयीन कामकाजाचे धडे दिले गेले. प्रशासकीय सुधारणांसोबत प्रशासन अधिक गतिमान व पारदर्शी करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यशाळा, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नेतृत्व विकास मंथन शिबीरासारखे उपक्रम देखील राबविण्यात आले. विभागाच्या योजनांमध्ये सुधारणा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी विशेषता शैक्षणिक योजनामध्ये सुधारणा करण्यासाठी फुले वाडा शैक्षणिक योजना हा उपक्रम हाती घेण्यात आला. राज्यातील जेष्ठ विचारवंत व अभ्यासक यांच्या मार्गदर्शनातुन आवश्यक ते बदल योजनामध्ये करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. कर्माचारी यांना योजना राबविताना येणा-या अडचणी यानिम्मीताने दुर होण्यास मदत होणार आहे. समाज कल्याण विभागातील राज्यातील सर्व कार्यालय व अधिनस्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे मासिक वेतन बाबतच्या वेळेवर होण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. विभागात कार्यरत असलेले सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची मूळ सेवा पुस्तके सर्व नोंदी सह अध्ययावत करणेबाबत मोहिम राबविन्यात आली आहे. विभागांमध्ये प्रशासकीय गतिमानता व सुधारणा करण्यासाठी विविध संवर्गातील अधिकारी कर्मचारी यांच्या साठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यातील २६ जिल्ह्यातील ७२ अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळा मध्ये टाटा ट्रस्ट व सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस सी एल आर च्या मदतीने इंग्रजी भाषा आणि नेतृत्व विकास हा प्रकल्प मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा गुणगौरव समारंभ स्नेहसंमेलन करण्याच्या अनुषंगाने संपुर्ण राज्यातुन गुणवंत कर्मचारी अधिकारी /कर्मचारी यांची नावे मागविण्यात आली आहेत. समाजकल्याण विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे सेवा विषयक बाबींचे काही प्रश्न असतात हे प्रश्न वेळेवर न सुटल्याने अधिकारी-कर्मचारी प्रसंगी चिंतेत तणावाखाली कामकाज करीत असतात त्याचा परिणाम प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर व गतिमान तीव्र होत असतो अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवा विषयक प्रश्न व विशिष्ट कालमर्यादेत सोडण्यासाठी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी कर्मचारी दिन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची मार्गदर्शिका तयार करण्यात येत असून मार्गदर्शकांमुळे कर्मचाऱ्यांना योजना राबविताना त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे व त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे एका विषयाच्या मार्गदर्शिका मध्ये सर्व शासन निर्णय व माहिती / परिपत्रके सहज उपलब्ध झाल्याने कर्मचाऱ्यांना शासन निर्णय व त्या अनुषंगाने असलेल्या आवश्यक माहितीची इतर ठिकाणी शोधाशोध करण्याची आवश्यकता भासणार नाही. सदर योजनांची मार्गदर्शिका अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

कर्मचारी यांना कामकाज करताना अधिक गतिमानता यावी यासाठी विविध योजना राबविताना आवश्यक असणारी माहिती संकलित करण्यासाठी एकाच ठिकाणी उपलब्ध होणे करणे साठी विविध सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे त्यामुळे पेपरलेस काम होण्यास मदत होणार असून कामकाजास अधिक गतिमानता निर्माण होणार आहे व त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा सर्व कार्यालयांना अधिकारी कर्मचारी वर्गाला होणार आहे. हे सर्व नाविण्यपुर्ण उपक्रम राबविताना विभागाच्या योजना देखील तितक्याच गतीमानतेने राबविण्यात येत आहेत. २०२०-२१ मध्ये विभागास प्राप्त झालेला निधी ९९.९२% खर्च विभागाने केला आहे.गेल्या पाच वर्षातील विभागाचा हा उच्चांक आहे. केंद्र शासनाकडे प्रलबित असलेला भारत सरकार मॅटीकोत्तर शिष्यवृतीचा प्रश्न मार्गी लागला आहे. नुकतेच परदेश शिष्यवृतीसाठी ७५ विद्यर्थाची निवड केली असुन अल्पावधीत केलेली ही कामगिरी ही रेकॉर्ड ब्रेक करणारी आहे. असे अनेक उदाहरणे असुन हे सर्व शक्य होत आहे ते डॉ.नारनवरे यांच्या प्रयत्नातुन, अर्थात विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची त्यांना मोलाची साथ लाभत आहे. एखादे कार्य हाती घेतल्यावर ते कोणत्याही परिस्थितीत वेळेत पुर्ण करण्यासाठी तनमनाने झोकुन देण्याबरोबरच तितक्याच चिकाडीने करण्याचा डॉ.नारनवरे यांचा गुण मनाला भावतो. डॉ. नारनवरे यांची ही कामगिरी प्रशासनात निश्चितच अनुकरणीय आहे. म्हणुनच त्यांना प्रशासनातील आयडॉल म्हटल्यास वावगे ठरु नये !

----------------------------------------------------------------------------------

संकलन :- शशिकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी, समाज कल्याण विभाग नाशिक

-------------------------------------------------------------------------------------

Updated : 2021-09-10T22:03:30+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top