Home > About Us... > गगनबावडा तालुक्याचे नायक! श्री.पी.जी.शिंदे! वाढदिन विशेष. पूर्वार्ध.

गगनबावडा तालुक्याचे नायक! श्री.पी.जी.शिंदे! वाढदिन विशेष. पूर्वार्ध.

Hero of Gaganbawda taluka! Mr. PG Shinde! Birthday special. First half

गगनबावडा तालुक्याचे नायक!    श्री.पी.जी.शिंदे! वाढदिन विशेष.    पूर्वार्ध.
X

गगनबावडा तालुक्याचे नायक!

श्री.पी.जी.शिंदे! वाढदिन विशेष.

पूर्वार्ध.

--------------------------------------------------

लेखक.श्री.तानाजी स.कांबळे.

8080532937

दि.22 फेब्रुवारी 2022

------------------------------------------------------

गगनबावडा हा तालुका दोन व्यक्तींच्या मुळे,जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये अग्रेसर म्हणून ओळखला जातो एक म्हणजे परमपूज्य योगीराज गगनगिरी महाराज यांचा किल्ले गगनगड येथील आश्रम व दुसरी महनीय व्यक्ती म्हणजे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक श्री. पी.जी.शिंदे यांच्या नावाने गगनबावडा तालुक्याची सामाजिक व राजकीय ओळख कोल्हापूर जिल्ह्याच्या नकाशा वरती कोरून ठेवलेले आहे!

श्री पी जी शिंदे यांचा 22 फेब्रुवारी रोजी वाढदिवस संपन्न होत आहे!

श्री पी जी शिंदे यांची सामाजिक राजकीय व सहकार क्षेत्रातील असलेली कारकीर्द लक्षवेधी ठरणारी आहे!

तसेच गगनबावडा तालुक्याच्या सहकारी क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेले खूप मोठे योगदान वाखाणण्यासारखे आहे!

आज देखील श्री पी जी शिंदे नावाने शिंदे गट तालुक्यांमध्ये प्रथम क्रमांकावर ती आघाडीवर आहे! शिंदे गटा अंतर्गत स्थापन केलेल्या सहकारी विकास सेवा सहकारी संस्था

सहकारी दूध संस्था अन्य सहकारी संस्था या

पी.जी शिंदे.यांच्या मार्गदर्शनाखाली

आज मोठ्या दिमाखाने उभे आहेत!

श्री.पी.जी शिंदे यांची राजकीय कारकीर्द ही बऱ्यापैकी चढ-उताराची जरी असली तरी, संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला आहे.

आपल्या गटाचे मार्फत अनेक लहान थोर मंडळींना, निवडणुकीमध्ये आणून लोकप्रतिनिधी म्हणून पदावर ती बसवलेल आहे!

श्री.पी.जी शिंदे यांचे गगनबावडा तालुक्यामध्ये सहकाराचं खूप मोठं त्यांचं जाळं आहे!

या सहकारी संस्थांच्या जीवावरती शिंदे यांना मानणारा गगनबावडा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाचा आहे!

श्री पी जी शिंदे हे गेली अनेक वर्ष कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा माजी अध्यक्ष म्हणून प्रतिनिधित्व करीत आहेत!

यांचे चुलते स्वर्गीय म.ह.शिंदे यांचे नावाने

श्री.शिंदे यांनी ज्ञानसाधना प्रसारक मंडळ संचलित तिसंगी येथे महाविद्यालय सुरू करून गगनबावडा तालुक्यातील व शेजारच्या तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे!

श्री शिंदे अभ्यासू वृत्तीचे आहेत वाचन करणं, लिखाण करणं,शेतीविषयक वेगवेगळ्या ठिकाणी भेटी गाठी देणे,विविध प्रदेशातील विविध प्रकारची वेगळ्या पद्धतीची शेती याचा अभ्यास करणे व त्या संदर्भात गगनबावडा तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, यामध्ये श्री शिंदे यांचा चांगला हातखंडा आहे!

श्री.पी.जी शिंदे परिपक्व विचाराचे आहेत. राजकारणात यांच्या वाटेला आलेले अनेक चढ-उतार त्यांनी पाठीशी ठेवून अनेकांना खूप मोठे व मजबूत केले आहे.

शिक्षण पदवीपर्यंत झाले असून श्री शिंदे यांचे बंधू व परिवारातील अनेक जण एकत्र कुटुंब पद्धतीने राहत आहेत!

श्री.शिंदे यांच्या परिवारासह,श्री शिंदे यांना मानणारा शिंदे गटाचा खूप मोठा वर्ग गगनबावडा तालुक्यातून त्यांच्यावर ती प्रेम करणार आहे!

जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये पी.जी

यांचा खूप मोठा परिचय आहे!

माजी मंत्री विद्यमान आमदार विनय रावजी कोरे,विद्यमान मंत्री नामदार हसन मुश्रीफ राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार के पी पाटील,भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी महसूल,

मंत्री चंद्रकांत पाटील या सारख्या दिग्गज नेत्यांना पी.जी शिंदे यांची दखल घ्यावी लागते!कारण गगनबावडा तालुक्याचे नायक म्हणून श्री पी जी शिंदे यांची ओळख आहे! गगनबावडा तालुक्यामध्ये केलेल्या विकासाचे मोजमाप कधीही करता येणार नाही कारण

श्री शिंदे यांनी अनेकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला आहे!

सहकारी विकास सेवा सहकारी संस्था, सहकारी दूध संस्था स्थापन करून देऊन

गाव गाड्या वरच्या शेतकरी गरीब घटकाला आर्थिक साह्य मिळकतीचे साधन उपलब्ध करून दिले आहे!

श्री शिंदे हे परिपक्व दूरदृष्टीचे राजकीय नेते म्हणून ओळखले जातात!

राजकारणातील अनेक चढ-उतार श्री शिंदे यांना नव्याने लढाई करण्यासाठी मजबुती व बळकटी देतात!

कोल्हापूर जिल्ह्याच्या जुन्या राजकारणाच्या गाढे अभ्यासक म्हणून अनेक राजकीय विश्लेषक त्यांच्याकडे बघतात!

स्वर्गीय तत्कालीन दिवंगत खासदार बाळासाहेब माने, उदयसिंहराव गायकवाड,

देशभक्त माजी खासदार स्वर्गीय रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे पासून ते स्वर्गीय माजी आमदार चंदगडचे नरसिंग गुरुनाथ पाटील माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांच्या बरोबरीने त्यांनी जुन्या काळामध्ये काम केलेल आहे!

गगनबावडा तालुक्याचे विविध सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अनेक वेळा सरकार दरबारी आपले राजकीय वजन वापरून

अनेक विकासाची कामे करून घेतलेली आहेत! गगनबावडा तालुक्यामध्ये साळवण या बाजारपेठेला विशेष करून श्री पी जी शिंदे यांच्या राजकीय बैठकीच्या ठिकाणांमुळे खास महत्त्व आले होते!

श्री शिंदे यांनी स्थापन केलेल्या खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयातून श्री शिंदे यांचे राजकीय सामाजिक शैक्षणिक कामे सुरू असतात! विविध लोकांच्या भेटीगाठी घेत असताना

श्री पी.जी शिंदे नेहमी विकास कामावरती चर्चा करत असतात!

श्री शिंदे यांच्या चांगला जनसंपर्क अनेकांना त्यांनी पंचायत समिती जिल्हा परिषदेला प्रतिनिधित्व दिले आहे!

मितभाषी,मृदू स्वभावाचे व शांतताप्रिय

श्री.पी.जी शिंदे यांचा दिनांक 22 फेब्रुवारी 2019 रोजी वाढदिवस संपन्न होत आहे!

मात्र covid-19 च्या वाढत्या प्रसारामुळे व गेल्या वर्षभरामध्ये अनेक शेतकरी वर्गाची झालेले नुकसान लक्षात घेता श्री. शिंदे यांनी वाढदिवस न करण्याचे ठरवले आहे! राजकारणातील अतिमहत्त्वाचा गगनबावडा तालुक्याचा "नायक" म्हणून श्री.पी.जी.शिंदे यांची ओळख हा इतिहासाच्या पानावरती सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवले आहे!

Updated : 21 Feb 2022 4:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top