Home > About Us... > 13 मे -पुण्यतिथी; 13 वर्षे ब्रिटीश तुरुंगात घालवणारे भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी मौलाना मंजूर अहसान एजाजी

13 मे -पुण्यतिथी; 13 वर्षे ब्रिटीश तुरुंगात घालवणारे भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी मौलाना मंजूर अहसान एजाजी

13 मे -पुण्यतिथी; 13 वर्षे ब्रिटीश तुरुंगात घालवणारे भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी मौलाना मंजूर अहसान एजाजी
X

म-मराठी न्युज नेटवर्क : ब्रिटिशांच्या जोखडातून भारताच्या मुक्तते च्या चळवळीच्या वेळी 13 वर्षे तुरूंगात घालवलेल्या मौलाना मंजूर अहसान एजाजी यांचा जन्म 1898 मध्ये बिहारच्या शकरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुजफ्फरपूर जवळच्या दिहूली येथे झाला. त्याचे आईचे नाव महफूझुन्निसा आणि वडील मौलवी हाफिजउद्दीन हुसेन हे होते

वयाच्या 15 व्या वर्षीही त्यांनी 1913 मध्ये ब्रिटीशविरोधी चळवळीत भाग घेतला आणि नंतर त्यांनी विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणून अनेक आंदोलने केली. 1917 मध्ये भारतीय राष्ट्रीय चळवळ मौलवी हसरत मोहनी यांच्यासह महात्मा गांधी यांच्या संदेशावरून ते चंपारण येथे गेले होते.

खिलाफत आणि असहकार चळवळ जोरात सुरू असताना मौलाना मंजूर अहसान एजाजी यांनी मध्ये पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून राष्ट्रीय चळवळीच्या प्रचारात स्वत: ला झोकून देण्यासाठी नोकरी सोडली. बाल्कन युद्धाच्या सैनिकांसाठी निधी जमा करण्याच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे त्यांना भरघोस मान्यता मिळाली.

1921 मध्ये पहिल्यांदा तुरुंगात टाकल्या गेले आणि 1930 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी ब्रिटीशविरोधी कार्यात दीड वर्षासाठी भाग घेतला. दांडी सत्याग्रहात त्यांच्या सक्रिय सहभागासाठी त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या.

1941मध्ये त्यांनी स्वतंत्र सत्याग्रह केला आणि पुन्हा एकदा त्याला तुरूंगात पाठवण्यात आले. 1942 मध्ये ते मुजफ्फरपूर स्थानिक मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. मौलाना मंजूर अहसन एजाजी यांनी त्यांच्या कित्येक कल्याणकारी कार्यांसाठी सार्वजनिक कौतुक जिंकले.

1942 मध्ये त्यांनी भारत छोडो चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटिशविरोधी कार्यकर्त्यांना आणि गांधीजींचा संदेश आणि त्यांचे संघर्ष आणि सामाजिक सुधारणांचे संदेश पोहोचवण्यासाठी त्यांनी बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात दौरा केला. त्याला पुन्हा अटक करण्यात आली आणि चार वर्षांच्या तुरूंगात पाठविण्यात आले. अशा प्रकारे मौलाना अजाजी यांनी अलिपूर, अलिगर, बक्सर, मुजफ्फरपूर आणि इतर तुरूंगात एकूण 13 वर्षे तुरूंगात घालविली.

स्वातंत्र्योत्तर काळात 1957 मध्ये बिहारच्या फतेपूर येथून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले. 1962 पर्यंत त्यांनी आमदार म्हणून जबाबदारी पार पाडल्या. नंतर त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सुधारणांना प्रथम प्राधान्य दिले. मौलाना मंजूर अहसान एजाजी हे 17 मे 1969 पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत सार्वजनिक जीवनात होते.

----------------////-------------

(From : THE IMMORTALS an Album of 155 Muslim Freedom Fighters authored by Syed Naseer Ahamed, published in 2014)

+91 94402 41727

----------------////--------------

मराठी अनुवादक संकलक --- अताउल्ला पठाण सर टूनकी बुलढाणा महाराष्ट्र

9423338726

Updated : 17 May 2021 8:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top