Home > About Us... > शंकरनगर येथे खाजगी डॉक्टरांनी वापरलेली इंजेक्शन नष्ट न करता टाकले उघड्यावरच चौकशीसाठी वरिष्ठाकडे तक्रार.

शंकरनगर येथे खाजगी डॉक्टरांनी वापरलेली इंजेक्शन नष्ट न करता टाकले उघड्यावरच चौकशीसाठी वरिष्ठाकडे तक्रार.

शंकरनगर येथे खाजगी डॉक्टरांनी वापरलेली इंजेक्शन नष्ट न करता टाकले उघड्यावरच चौकशीसाठी वरिष्ठाकडे तक्रार.
X


शंकरनगर

नांदेड जिल्हा :- प्रतिनिधी सय्यद अजिम नरसीकर

खाजगी असो की शासकीय रुग्णालय असो रुग्णालयात रुग्णांसाठी वापरण्यात आलेली इंजेक्शन व मेडिसिन हे कुठेही उघड्यावर न टाकता ती नष्ट केली पाहिजे असे शासनाचे आदेश असताना शासनाच्या या आदेशास केराची टोपली दाखवून शंकर नगर तालुका बिलोली येथे कार्यरत असलेल्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टर हे वापरलेले इंजेक्शन व मेडिसिन उघड्यावर टाकत असल्याने उघड्यावर टाकलेल्या इंजेक्शन व मेडिसिनचा अनेकांना धोका होऊ शकतो यासाठी उघड्यावर वापरण्यात आलेली इंजेक्शन व मेडिसिन टाकणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील वाडेकर यांनी बिलोली तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे केली आहे.

सविस्तर माहिती अशी की प्रत्येक रुग्णालयात रुग्णासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन व मेडिसिन हे कुठेतरी रुग्णालयाबाहेर जाळून किंवा जमिनीत गाडून नष्ट केली पाहिजे असे शासनाचे आदेश असताना शंकरनगर तालुका बिलोली येथे मात्र कोरोना महामारी संकटात भयभीत असलेले नागरिक मोठ्या प्रमाणात खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असताना अशा रुग्णांना वापरलेली इंजेक्शन व मेडिसिन कुठेही नष्ट न करता इंजेक्शन व मेडिसिन वर्दळीच्या ठिकाणी बिनधास्तपणे उघड्यावरच टाकून आपली बेजबाबदारपणा दाखवत असल्याने अशा या वापरलेल्या इंजेक्शन व मेडिसिनचा सामान्य नागरिकांना किंवा जनावरांना धोका होऊ शकतो यासाठी वापरलेली मेडिसिन व इंजेक्शन उघड्यावर टाकणाऱ्या शंकरनगर येथील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी असे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष हनुमंत पाटील वाडेकर यांनी बिलोली येथील तालुका आरोग्य अधिकारी गणपत वाडेकर यांच्याकडे दूरध्वनीद्वारे केले असता या घटनेची नोंद घेऊन रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून उघड्यावर टाकलेल्या मेडिसिन व इंजेक्शनचा रीतसर पंचनामा करून सदरील अहवाल मागवले असल्याने वापरलेले इंजेक्शन व मेडिसिन उघड्यावर टाकणाऱ्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टर विरुद्ध काय कारवाई होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

वापरलेली इंजेक्शन व मेडिसिन उघड्यावर टाकता येत नाही ती नष्ट केलीच पाहिजे त्यासाठी रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगून वापरलेली इंजेक्शन व मेडिसिन उघड्यावर टाकणाऱ्या विरुद्ध ग्रामपंचायतीच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात यावे असे ग्रामपंचायतीस पत्र देणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी गणपत वाडेकर यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी सय्यद अजिम नरसीकर जाहिरात साठी व बातमी साठी संपर्क साधावा मोबाईल नबरः 9960484886

Updated : 25 April 2021 12:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top