Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > आमदार भीमराव केराम यांच्या स्थानिक निधीतुन किनवट व माहुरसाठी दोन रुग्णवाहीकेचे लोकार्पण.....

आमदार भीमराव केराम यांच्या स्थानिक निधीतुन किनवट व माहुरसाठी दोन रुग्णवाहीकेचे लोकार्पण.....

आमदार भीमराव केराम यांच्या स्थानिक निधीतुन किनवट व माहुरसाठी दोन रुग्णवाहीकेचे लोकार्पण.....
X

म मराठी न्यूज नेटवर्क

श्री क्षेत्र माहूर/ ता.प्र.पदमा गिर्हे

माहूर : आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत किनवट,माहुर चे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते गुरुवार (ता.२९) रोजी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा व ग्रामीण रुग्णालय माहुर यांच्या स्थानिक निधीतुन आज दोन रुग्ण वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. माहूर किनवट तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा या उद्देशाने या रुग्ण वाहीकेचे लोकार्पण करण्यात आले.किनवट मतदार संघात आमदार विकास निधी आपल्या मर्जीतील गुत्तेदाराच्या लाड पुरवण्यासाठी खर्च केला जातो असा पूर्वइतिहास आहे. त्यामुळेच की काय मागील पंधरा वर्षातदर्जाहीन विकास कामाचा सपाटा लावून केवळ शासन निधीला चुना लावण्याचे सोयीस्कर काम या मतदारसंघात केले गेले.त्यामुळे इतर नागरी सुविधा सहित आरोग्यसुविधा चा मोठा अनुशेष दोन्ही तालुक्यात निर्माण झाला होता.या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन विकास कामांची दूरदृष्टी व सर्वसामान्यांच्या समस्येंशी नाळ जूडलेल्या आमदार भीमराव केराम यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून सर्वप्रथम तळागळातील रुग्णांना शहराच्या ठिकाणी वेळेत पोहोचून उपचार घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या दोन रुग्णवाहिका रूग्णसेवेला समर्पित करून आमदार भीमराव केराम यांच्या लोकार्पण या जनसंपर्क कार्यालयात दोन्ही रुग्ण वाहीकेचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले या वेळी साने गुरुजी रुग्णालय परीवाराचे प्रमुख डॉ.अशोक बेलखोडे, आरोग्य अधिकारी डॉ.संजय मुरमुरे,उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा चे अधिक्षक डॉ.उत्तम धुमाळे,माजी नगराध्यक्ष इसाखान सरदारखान,किनवट नगरीचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष अजय चाडावार, माजी नगर परिषद उपाध्यक्ष श्रीनीवास नेमान्नीवार,व्यंकट नेमान्नीवार,आदीवासी नेते नारायण सिडाम,अनिल तिरमनवार,गिरीश नेमान्नीवार, दत्ता आडे,बालाजी पावडे, मारोती भरकड,प्रकाश कुडमते, निळकंठ कातले,संतोष मऱ्हसकोले,रामेश्वर गिनगुले आदी उपस्थित होते.....

Updated : 30 Oct 2020 6:27 AM GMT
Next Story
Share it
Top