Home > विदर्भ > आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते.... भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलासोबतच अन्य दोन पुलिया व रस्त्याचे भूमिपूजन

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते.... भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलासोबतच अन्य दोन पुलिया व रस्त्याचे भूमिपूजन

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते.... भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलासोबतच अन्य दोन पुलिया व रस्त्याचे भूमिपूजन
X

महत्वाकांक्षी पुलियाचे भूमिपूजन झाल्याने समस्या कायमचे सुटणार!

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचीही उपस्थिती

आशिष सुनतकर

तालुका प्रतिनिधी अहेरी

मो. 7030081037

भामरागड:- येथील बहुचर्चित व बहुप्रतिक्षेत असलेले पर्लकोटा नदीवरील महत्वाकांक्षी पुलाचे उदघाटन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते बुधवार 9 सप्टेंबर रोजी करण्यात आले.

पर्लकोटा नदीच्या पुलासह याच मार्गावरील बांडीया व पेरमिली येथील पुलाचेही उदघाटन करण्यात आले तसेच भामरागड पासून गुंडेनूर महामार्गाचेही भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, हर्षवर्धनराव बाबा आत्राम, सभापती गोईताई कोडापे, तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, मुख्याधिकारी डॉ.सूरज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी विधिवतपणे पूजन करून भूमिपूजन केले. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी नारळ फोडले.

उदघाटना प्रसंगी आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की,प्रामुख्याने भामरागड येथील पर्लकोटाच्या जुन्या पुलामुळे पावसाळ्यात वारंवार मार्ग बंद पडत होते मागील अनेक वर्षांपासून सदर पुलाची एकमुखी व तीव्र मागणी होती शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्याने पुलाच्या कामाला अखेर मंजुरी मिळाली असून केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांनी नुकतेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (डिजिटल) द्वारे व कामाच्या कोनशीलाचे उदघाटन केले असल्याचे उल्लेख करून आज खऱ्या अर्थाने भामरागड येथे विकास कामांचा मुहूर्तमेढ रोवल्या जात असल्याने आता भामरागड वासीयांचे कायमचे समस्या सुटणार असल्याचे समाधान व्यक्त करून उदभवणारे धोके व नुकसानही टळणार असल्याचे व भामरागड येथील रस्ते आता सुलभ होणार असल्याचेही यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी आवर्जून सांगितले .

पुलाचे व रस्त्यांचे भूमिपूजन करते वेळी, आदिवासी सेवक सबर बेग मोगल, सत्यनारायण येगोलोपवार, बंडू दहागावकर, श्रीकांत मोडक, रामरेड्डी बंडमवार, आसिफ सुफी, रामजी भांडेकर, इंदरशहा मडावी, रमेश बोलमपल्लीवार, सलीम शेख आदी व प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.

Updated : 10 Sep 2020 4:47 AM GMT
Next Story
Share it
Top