Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > आदिवासी युवा संघटनेच्या शाखांचे उद्घाटन

आदिवासी युवा संघटनेच्या शाखांचे उद्घाटन

आदिवासी युवा संघटनेच्या शाखांचे उद्घाटन
X

"आदिवासी युवा संघटनेच्या शाखांचे उद्घाटन"

म-मराठी न्यूज नेटवर्क

(पालघर.जिल्हा/प्रतिनिधी,संजय लांडगे)

पालघर :- विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आदिवासी युवा संघटनेच्या विविध गावांच्या शाखांचे उद्घाटन व फलकांचे अनावरण रविवारी (दि.२५) करण्यात आले. सकाळी १० वाजता खुपरी येथील

पहिल्या शाखेचे उद्घाटन होऊन वाडा पूर्व विभागातील निशेत, कळंभे, सोनाळे येथील शाखांंचे उद्घाटन संतोष विष्णू साठे (प्रवक्ता-आदिवासी युवा संघटना, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते करण्यात आले. तर शेले येथील शाखेचे

उद्घाटन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. तरुणांंना भेडसावणारे प्रश्न सोडवून त्याच्यासाठी रोजगार निमिर्ती करून देणे ही आमची प्रमुख भूमिका असून सामाजिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात त्याची प्रगती व्हावी या साठी संघटनेचे प्रयत्न राहतील असे मत साठे यांनी व्यक्त केले.

या उद्घाटन सोहळ्यासाठी चिंतामण शेंडे, नितीन भोईर, प्रफुल्ल हमरे, पप्पू चौधरी, समीर धुळे, संतोष भोमटे, विकास गायकर, दिलीप पाटील, नितेश नाईक, प्रारब्धा प्रकाश तांडेल, दिनेश कोलेकर, लहू खरपडे, आदेश मरले, रोहन पाडेकर, बाळू मरले ही मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Updated : 25 Oct 2020 1:29 PM GMT
Next Story
Share it
Top