आदिवासी अल्पवयीन मूलीवर मातृत्व लादणार्या नराधमास अटक करा
X
दिवाकर भोयर धानोरा प्रतिनिधी 9421660523
(तालूका यूवक कांग्रेसची मूख्यमंत्र्याकडे मागणी)
कोरची येथील अल्पवयीन आदिवासी मूलीवर लैंगिक अत्याचार करीत मातृत्व लादणार्या नराधमाची तातळीने चौकशी करीत अटक करण्यात यावी व जलदगती न्यायलयात त्याचा खटला चालवत कठोर शिक्षा करा अशी मागणी तालुका यूवक कांग्रेस चा वतीने मूख्यमंत्र्याना निवेदन पाठवत करण्यात आली आहे.
आदिवासी ग्रामीण भागात आदिवासीचां निर्बलता,दारिद्र्य व अज्ञानतेचा गैरफायदा घेत अनेक नराधम आर्थीक बळाचा जोरावर लैंगिक अत्याचार करीत त्यांची अब्रूची धिंडवडे काढतात ही अत्याचाराची साखळी निरंतर सूरू आहे मात्र अनेकदा पिडीता दारिद्र्य अज्ञान राहत असल्याने तक्रार होत नाही तर कधी आर्थीक बळावर प्रकरण दाबण्यात येतात मात्र नूकताच कोरची येथे आदिवासी अल्पवयीन मूलीवर मातृत्व लादण्याचे प्रकरण प्रसिद्धी माध्यमानी उजेडात आणले आहे या प्रकरणात तपास यंत्रणेने कोणतीच हयगय न करता सखोल चौकशी करावी जलदगती न्यायलयात खटला चालवत कठोर शिक्षा करण्यात यावी पिडीताला नामवंत शाशकिय वकील उपलब्ध करून देण्यात यावा तिला शाशकीय नियमाप्रमाणे आर्थीक साहाय्य उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदन स्थानिक तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पाठविण्यात आले आहे यावेळी यूवक कांग्रेसचे तालुका अध्यक्ष गीरीधर तितराम शहर अध्यक्ष जिशान खान सरपंच उमाजी धूर्वे,अरूण उईके कांग्रेस अनूसूचित जाति सेलचे तालुका अध्यक्ष रोहित ढवळे,प्रकाश सदार,सूधिर कोराम अयाज़ सय्यद निलकंठ कोराम नाजूक दखने सिराज पठान नियाज़ हूसैन आरिफ शेख तक्षशिल सहारे व कार्यकर्ते उपस्थितित होते.