Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > "आत्महत्या" "जीवन आपले संपवू नका"

"आत्महत्या" "जीवन आपले संपवू नका"

आत्महत्या जीवन आपले संपवू नका
X

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

महिला आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे..

विशेष करून मुली मुले आत्महत्या करून जगाचा निरोप घेतात.

पण विशेष इथे संपत नाही

स्वतः मरुन आपल्या कुटुंबीयांना कायमचे दुखी करतात..

ज्या मात्या पित्यांनी तुम्हाला जन्माला घातल्यापासून

तुम्ही मोठे तुमच्या हिमतीने किती प्रयत्न करता ?

जगातील सर्व सुखे मिळावित,निरोगी सुंदर असावीत

त्यांच्या साठी रात्र दिवस कबाड कष्ट करतात..

अशा माता पितांना दु:ख देण्याचा प्रयत्न करू नये

जन्माला आपण येतो एकदाच,मरतो सुध्दा एकदाच..

सुंदर जीवन जगण्यासाठी जिवाची.किती धडपड करावी लागते

प्रेमामध्ये धोका झाला म्हणून मरून जायचे नसते.!

मरायचे असेल तर महात्मा गांधी मरुन बघा.!

आदर्श आण्णांचा घेऊन बघा,इंदिरा गांधी चे जीवन बघा..!

थोर नेत्यांचा आशिर्वाद घ्या.!

मरायचे असेल तर भगतसिंग सारखे मरून बघा.!

खासदार, आमदार बना तुम्ही, विषय वासनेच्या जाऊन मागे.

जीवन आपले संपवू नका..!

जिने तुम्हाला जन्म दिला,तीला दु:ख देऊ नका!

आई वडीलांचे स्वप्न तुम्ही अर्धावरती सोडू नका

पळत्या मागे जाऊन तुम्ही जीवन आपले संपवू नका..!

"लेखक"

"मेघा ओतारी".{पिंपरी चिंचवड,पूणे}

Updated : 15 Aug 2020 5:04 PM GMT
Next Story
Share it
Top