Home > विदर्भ > आत्मदहन आंदोलन व ठिय्या आंदोलन

आत्मदहन आंदोलन व ठिय्या आंदोलन

आत्मदहन आंदोलन व ठिय्या आंदोलन
X

आत्मदहन आंदोलन व ठिय्या आंदोलन

म मराठी न्यूज नेटवर्क

(अमरावती जिल्हा/प्रतिनिधी देवेंद्र भोंडे)

अमरावती :- आज दि. 21/10/2020 रोजी.ठिय्या आंदोलन व आत्मदहन आंदोलन करण्याबाबत जात पडताळणी समिती अमरावतीला निवेदन दिले.तेव्हा कुडमेथे साहेबांनी लगेच दोन तीन, दिवसात विद्यार्थ्यांच्या व्हॅलिडिटी देऊ असे ठाम विश्वासाने सांगून तुम्ही हे आंदोलन मागे घ्या असे म्हणाले.

व त्यांनतर सन्मा. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासोबत ठिय्या आंदोलन व आत्मदहन आंदोलन बाबत सुमारे प्रथम 20 मिनिट व नंतर 5 मिनिट चर्चा झाली.

प्रथम सर्व बाबीवर चर्चा झाली व अमरावती विभागात गोंड गोवारी जमातीची कशी अडवणूक होते व सव्वा वर्षांपासून कसा अन्याय होत आहे याबाबत चर्चा झाली.

त्यांनी व्हॅलिडिटी मिळाल्या का....? याबाबत विचारणा केली व व्हॅलिडिटी जवळ नसताना लगेच अर्धा तास वेळ मागून पुन्हा जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेऊन या आधी अमरावती जात पडताळणी समिती व काल नागपूर विभागाने दि 20/10/2020 ला दिलेल्या व्हॅलिडिटीच्या झेरॉक्स देण्यात आल्या. व त्यांनी मार्क करून स्वतःच्या टेबलच्या काचखाली ठेवून घेतल्या.

कुडमेथे साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात व्हॅलिडिटी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पण दोन तीन व्हॅलिडिटी दिल्या म्हणजे प्रश्न सुटला असे होत नाही. 11 वी 12 विचे प्रस्ताव आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी मिळाल्या पाहिजे त्या नाही मिळाल्या तर येत्या 26/10/2020 ला मी रावसाहेब नेवारे अध्यक्ष आदिवासी गोवारी सेवा समिती व सदस्य मंगेश के. राऊत आत्मदहन करणार...

सोबतच कैलाश राऊत अध्यक्ष आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र व हेमराजजी नेवारे याचिकाकर्ते कोर्ट टीम महाराष्ट्र येत्या 26/10/2020 ला ठिय्या आंदोलन करणार...

आदिवासी गोवारी सेवा समिती अमरावती..

"अध्यक्ष रावसाहेब नेवारे"

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

मो.9730683827

Updated : 22 Oct 2020 2:47 AM GMT
Next Story
Share it
Top