Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > आठवडी बाजारातील छोटा व्यावसायिक कोलमडला

आठवडी बाजारातील छोटा व्यावसायिक कोलमडला

आठवडी बाजारातील छोटा व्यावसायिक कोलमडला
X

त-हाडी

आठवडी बाजारातील छोटा व्यावसायिक कोलमडला

ग्रामीण अर्थव्यवस्थेत आर्थिक व्यावहाराचे सर्वात मोठे ठिकाण आठवडी बाजार आहे. यामध्ये शेतमाल, कारागिरी कलाकुसर, जोडव्यावसाय, पाळीव प्राणी पक्षी, खाद्यन्न, कपडे, यांची खरेदी विक्री होते. तसेच आठ दिवसात जो व्यवहार झालेला आहे त्याची देवाण-घेवाण होते. कोविड 19 मुळे मार्च महिण्यापासून ताळेबंदी लगाली आणि ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडते की काय अशी परिस्थीती निर्माण झालेली आहे . हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आघात ग्रामीण अर्थ व समाजव्यावस्थेवर झालेला दिसून येत आहे.

भारतातील बाजाराचा इतिहास पाहिला तर असे दिसते की, जत्रा यात्रा स्वरुपात धार्मिक स्थाळांच्या अवारत बाजार भरत असे. सोळाव्या शतकातील विजयानगरच्या साम्राज्यातील संपन्न बाजारांचे वर्णन दूमिंग पाइश व फर्नाउन नूनिश या पोर्तुगीज प्रवाशांनी केलेले आहे. बिहारमधील सोनपूर येथे नोव्हेंबर महिन्यातील गंगास्नान पर्वकाळी जगातील सर्वांत मोठा गुरांचा बाजार भरत होता; तेथे बैलांपासून हत्तींपर्यंत अनेक प्राणी विक्रीस ठेवलेले असत. धार्मिक उत्सवांच्या व जत्रांच्या निमित्ताने भरणारे बाजार सर्वत्र आढळतात. मध्ययुगाच्या प्रारंभकाळातील आठवड्याचा बाजार व बाराव्या ते पंधराव्या शतकांत विकसित झालेल्या व्यापारी जत्रा यांमधील एक फरक असा की, पूर्वीच्या बाजारांमध्ये स्थानिक वस्तूची, विशेषत: शेतमालाची, विक्री होई; तर जत्रांमध्ये विविध प्रकारचा माल त्यावेळी ज्ञात असलेल्या जगाच्या कानाकोपऱ्यातून येत असे. ह्या व्यापारी जत्रांना स्थानिक सत्ताधीशांचे संरक्षण लाभत असे. दिल्ली येथील मीना बाजार मोघल काळात सुरू झालेला आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर खास बाजाराची व्यावस्था केली होती. या बाजारांचे वैशिष्ट्य म्हणजे वस्तू विनिमय पध्दत, शेतमाल, कलाकुसर कारागिरी व जनावर यांना महत्व होते.

पुढे ब्रिटीश राजवटीत बाजाराचे महत्व होते पण स्वातंत्र्या नंतर ग्रामीण भागात आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरायला लागले. हे बाजार शेती उत्पादन व शेतीशी निगडीत अवजारे, हात्यारे, जनावरे, यांची जास्तीत जास्त खरेदी विक्री होवू लागली. तसेच दैनदिन जीवनात आवश्यक वस्तू विक्री यालाही महत्व आले. त्यामुळे आठवडी बाजार ग्रामीण आर्थव्येवस्थेची नाडी तयार झाली. पुढे यावार अनेक संकट व अघात झाले. त्यातीलच मुक्त अर्थव्यवस्था हा मोठा अघात आहे. तसेच मॉल, शोरूम, ऑनलईन अशा प्रकारच्या बाजारमुळे बराच फरक पडलेला आहे. तरी आठवडी बाजार या संकटाला न जुमानता आजही टिकून आहे.

डिसेंबर 2014 मध्ये इंटरनेशनल जर्नल ऑफ साइंटिफिक एंड इंजीनियरिंग यांनी आभ्यास केला आणि आपल्या शोधपत्रात सांगितले आहे की, देशात जवळपास 7 हाजार नियमित बाजार आहेत. ग्रामीण आठवडी बाजार एक मोठा भाग असून शहरां पेक्षा जास्त वाढत आहेत. कारपोरेट घराने यांनी ग्रामीण आठवडी बाजरावर लक्ष केंद्रित करायला सुरूवात केलेली आहे. यावरून असे दिसते की, लवकरच हे कारपोरेट घराने अधिग्रहण करतील अशी भिती ग्रामीण भागात निर्माण होवू लागली पण तसे काही घडलेले नाही. याच काळात नियोजना आयोगाने एक अहवाल सादर केला व त्या अहवाला नुसार 21,000 ग्रामीण आठवडी बाजारानां पंचायत आणि कृषि उत्पन्न बाजार समिति या सारख्या संस्थांची मदत मिळत नाही असे स्पष्ट उल्लेखित केले. त्यामुळे ग्रामीण आठवडी बाजार कोणत्यही सेवा सुविधा व अधाराविना भरत आहेत असे सांगितले.

मागील चार महिण्यापासून कोविड 19 या महामारीच्या संकटाला तोंड देण्यासाठी बाजार बंद करण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागाच्या आर्थिक व्यावहारची मुख्य नस असलेला आठवडी बाजार बंद झाल्यने ग्रामीण जिवनावर खूप मोठे परिणाम झालेले आहेत. बाजारी दुकान हे त्याचा मुख्य व्यावसाय असणारा छोटा व्यासायिक, व्यापारी, कारागिर, हमाल, दलाल, भटका, कलाकुसर करणारा, मनोरंजन करणारा अक्षरशा: भरडला आहे. विशेषता: हा व्यावसायिक नियमित दुर्लक्षित राहिलेला आहे. तसेच बाजारा सोबतच जत्रा यात्रा, लग्न, सन, समारंभ व धार्मिक कार्यक्रम येथेही त्याचे दुकान असते पण सर्व बंद असल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या व्यावसायिकांचे वर्गिकणानुसार पुढील प्रमाणे आहे.

१. उत्पादित वस्तूंचे विक्रेते – जनरल स्टअर्स, रेडीमेड कपडा, रेडीमेड उलन कपडा विक्रेते, बांगडी व्यवसाय, भांडी दुकानदार, किराणा दुकान, शेती अवजारे, पशुखाद्य विक्रेते, सुया दाबन, बेंटेक्स विक्रेते, खेळणी विक्रेते, चप्पल बूट विक्रेते आणि शालेय साहित्य विक्रेते २. प्रक्रिया व्यावसायिक – गूळ विक्रेते, रसवंती, तेल, तूप विक्रेते, डाळ विक्रेते, ३. शेतमाल विक्रेते – अन्नधान्य, विरण चारा विक्रेते, आडते, भुसार, भाजीपाला, फळ विक्रेते, सुकामेवा. ४. कारागीर – चांभार, कुंभार, लोहार, सुतार, नाव्ही, शिंपी, सोनार, इतर – छ्त्री दुरुस्ती, ५. कलाकुसर – लाकूड व कपडा यावर हस्तकाला करून विकणारे, ६. सांस्कृतिक मनोरंजन – तमाशा, नाटक, मदारी, डोंबारी, नागवाले, रहाट पाळणे, छोटी सर्कस, बहुरूपी, ७. इतर व्यापारी – जनावर व्यापारी, शेळी मेंढी व्यापारी आणि पक्षी ८. इतर व्यासायिक – चहापाणी हॉटेल, खानावळ, अल्पो उपहार व खाद्यपदार्थ विक्रते, तंबाखू पान विक्रेते, मसाला व्यावसायिक, मटण व मासे विक्रेते, पक्षी विक्रेते, अंडी विक्रेते, ९. सेवा देणारे – हमाल, मालवाहतूक छोटी वहाने, रोजंदारी कामगार, दलाल आदि.

यांचे व्यावसाय 10 हजार रुपया पासून ते 2 लाखा पर्यंत भांडवालाचे आहेत. त्यांना हे भांडवल कर्ज स्वरुपात कोणत्याच बँकेत मिळत नाही. तसेच ते सेवा सुविधा व आर्थिक संरक्षाणापासून वंचित आहेत. स्थानिक ग्रामपंचायत व नगरापंचायत आणि नगरापालिका हद्दितील बाजारांच्या मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी नाबार्ड व पणनचे सहकार्य आहे पण त्याचा फायदा तुरळक ठिकाणी झालेला आहे.

आज ज्या परिस्थीत हे व्यावसायिक जगत आहेत त्यांचे अर्थकारण आणि जीवनचक्र जानून घेवू त्यांच्या तोंडून.

1. ) सुनदाबाई साहेबराव पाटील हे त-हाडी ता. शिरपूर जि. धुळे येथील असून पाटील समाजाचे आहेत. कटलरी ,बांगडी व्यावसाय हा त्यांचा पारंपारिक व्यावसाय आहे. ते सांगतात मी, आठवड्यातून चार बाजार करतो (त-हाडी , वरूळ , आर्थे व वडाळी). मार्च महिण्यात मी स्वता:चे 30 हाजार व नातेवाईक यांच्याडून हात उसने 20 हाजार घेवून 50 हाजराचा माल भरला कारण लग्नसराई सुरू झाली होती. पण ताळेबंदी सुरू झाल्यामुळे सर्वच्या सर्व माल घरात पडून आहे. जत्रा यात्रा, धार्मिक कार्यक्रम होत नसल्याने व लग्नकार्य मोठ्या स्वरुपात करण्यास मनाई असल्याने मागील चार महिण्यात 5 हाजाराची सुध्दा विक्री झालेली नाही. खेड्यात जाऊन विक्री करण्याचा प्रयत्न केला तर गावकरी येवू देत नाहीत. जी विक्री झाली ते पाच हजार घर खर्चात गेलेले आहेत. हात उसने घेतलेले पैसे नातेवईक मागत आहेत पण मी देवू शकत नाही. मजूर म्हणुन काम करण्याचे ठरविले पण काम उपलब्ध नाही. आज माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

मी, , महेंद्र राजधर शिंदे त-हाडी ता. शिरपूर जि. धुळे , येथील असून मला 1 एक्कर कोरडवाहु शेती आहे. सन 1992 पासून अल्पोहार हॉटेल चालवत आहेत. शिरपूर तालुक्यातील चार आठवडी बजार करतो व लग्न, धार्मिक कार्यक्रमात स्वायपाकी म्हणून काम करतो. ताळेबंदी झाल्याने घरी बसून आहे. हॉटेलसाठी घेतलेला किराणा माल घरी खाल्ला आहे. मी घर बांधकाम हात उसने व बचत गटचे पैसे घेवून केलेले आहे. महिण्याला 10 हाजर रुपये हप्ता भरना करावा लागतो. बाजार बंद झाल्याने हतबल झालो आहे. मला चिंता आहे बाजार सुरू झाल्यावर भांडवलासाठी कोणाकडून पैसे घ्यावेत. कारण अम्हा बाजारक-यांना बँका दारात उभा रहू देत नाहीत.

चुडामण साहेबराव पाटील यांचा वडिलोपार्जित चड्डी, बनियन व इतर कपडे शिवून विकण्याचा व्यावसाय आहे. शिरपूर व शाहादा तालुक्यातील 5 बाजारात दुकान लावतात. यांनी ताळेबंदी आगोदर 80 हाजार रुपयाचा कपडा 30 हाजार रोखीने व 50 हाजार उधारीवर घेतलेला आहे. ताळेबंदी सुरू झाल्यापासून बाजार बंद झाले त्यामुळे मी उधारीवर घेतलेल्या मालाचे पैसे परत करू शकत नाही. व्यापारी पैशासठी घरी येत आहेत पण एकही रुपया देवू शकलेलो नाही. जी थोडीफार विक्री झालेली आहे ती रक्क्म घर खर्चात खर्च झलेली आहे. माझ्या मुलीचे लग्न 1 वर्षापुर्वी झालेले आहे त्या खर्चातून मी सावरलेलो नाही. बाजार कधी सुरू होतील याचीच वाट पहात आहोत कारण आमचा जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

मनोज भोई रा. तोरखेडा , ता. शाहादा , जि. नदूरबार येथील असून 15 वर्षापासून आठावडी बाजरात फळ विक्रीचा व्यावसाय करत आहे. पुर्वी मी स्वता:च्या 10 व दुसा-याच्या 10 अशा एकूण 20 मेंड्या सांभाळत होतो ते परवडत नव्हते म्हणुन या व्यावसायात आलो.मला कोरडवाहू शेती फक्त 30 गुंटे आहे. आठवड्यातून सहा बजार करतो त्यातून मला प्रती बाजार 500 ते 700 रु. निव्वळ नफा मिळतो. त्यासाठी माझी 50 हाजार रुपयांची गुंतवणूक आहे. ताळेबंदीमुळे मी बँकेत बचत असलेले 70 हाजार रुपयातील 40 हाजार घर खर्चात खर्च केले आहेत. लवकर बाजार सुरु झाले नाहीत तर सर्व बचत संपून जाईल आणि बाजार सुरू झाल्यावर माझ्याकडे भांडवल नसेल. मला त्यावेळी सावकारी कार्ज घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही कारण अम्हाला बँका कर्ज देत नाहीत. थोडक्यात या लोकांचा भांडवल प्रश्न, आर्थिक सुरक्षा, व आपत्ती काळात मदत यावर ठोसपणे काम करणे गरजेचे आहे. आज आपण पाहतो फक्त बजार तळावरील मुलभूत सुविधांचे कुठेतरी काम झालेले आहे. त्याच्याही पुढे अनेक समस्या आहेत त्या सोडविण्यावर भर द्यावा लागेल. सरकारने याकडे लक्ष देवून एक भक्कम धोरण आखून आठवडी बाजर आणि तेथील व्यावसायिक यांना सक्षम केले तर ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुतीकडे वाटचाल करेल.

Updated : 16 Aug 2020 12:45 PM GMT
Next Story
Share it
Top