Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > आंब्याच्या कैरी महाग असल्यामुळे लोणचे घालणे झाले दुर्मिळ जातवंत चांगल्या कैरीची किंमती जास्तच

आंब्याच्या कैरी महाग असल्यामुळे लोणचे घालणे झाले दुर्मिळ जातवंत चांगल्या कैरीची किंमती जास्तच

आंब्याच्या कैरी महाग असल्यामुळे लोणचे घालणे झाले दुर्मिळ जातवंत चांगल्या कैरीची किंमती जास्तच
X

---------------------------------त-हाडी दि.११ ( महेंद्र खोंडे न्युज ) :- सन २०२९- २० या वर्षात नेहमीच पडणाऱ्या अवकाळी गारपीट पाऊस व विविध प्रकारचे वादळे आणि रोगराई धुक्याच्या तडाख्यामुळे शेतपिकांची बरोबर आंबा या फळपिकांचे मो अतोनात नुकसान झालेले आहे. दरम्यान कोव्हिड- १९ या विषाणूजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन झाल्यामुळे जे काही आंब्याचे उत्पादन झाले आहे ते दळणवळण अभावी पडून राहिल्याने मोठे नुकसान झाले. पण त्याचबरोबर कैरीचे लोणच्याच्या कैरी महाग झाल्यामुळे लोणच्यासाठी लागणारी कैरीची आवक कमी झाली आहे. म्हणून यावर्षी चवदार असे लोणचे महाग होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.

फळांचा राजा अर्थात आंबा आहे. आणि उन्हाळा म्हटले की ह्या काळात आंबा हे फळ सर्वत्र उपलब्ध असते. पण यंदाच्या वर्षी सततचा अवकाळी गारपीट पाऊस व विविध प्रकारचे वादळे आणि रोगराई धुक्याच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांची शेतपिकांची अतोनात नुकसान झालेले आहे. यामध्ये आंबा या फळझाडांना मोठा फटका बसला असून झाडांवरील कैरी गळून पडल्याने धुळे जिल्ह्यातील बहुतांश भागातील गावरान आंब्याबरोबर कलमी आंब्याची झाडे कैऱ्या आणि आंब्याविना हंगाम अर्धवट ठरत आहे. त्यात कोव्हिड- १९ या विषाणूजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन झाल्यामुळे जे काही आंब्याचे उत्पादन झाले आहे ते दळणवळण अभावी पडून राहिल्याने मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर मार्च एप्रिल व मे ह्या उन्हाळ्याचा विविध वाळवणीचे पदार्थ बनविण्यासाठी गृहिणीची लगबग सुरू असते. वर्षभर लागणारे विविध खाद्यपदार्थ या दिवसात बनवून ठेवले जातात. त्यानुसारच पहिला पाऊस पडल्यावर वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे बनवले जाते. ग्रामीण भागात जेवणाच्या ताटात अंबट-गोड-तिखट असे चवदार लोणचे असल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही व जेवणाचे ताटही लोणच्याशिवाय अपूर्ण दिसते. पण कैरीचे लोणच्याच्या जातवंत चांगल्या कैरी महाग झाल्यामुळे लागणारी कैरीची आवक कमी झाली आहे. यावर्षी चवदार असे लोणचे महाग होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.

कैरीचा भावही वधारलेला ..

त्यात मान्सून पूर्व पाऊस व वादळी वा-यांमुळे कैरी गळून पडली. याकारणास्तव लोणच्याची कैरी दुरापस्त होऊन आवक घटली आहे. तसेच कैरीचा भावही वाढला आहे. त्यामुळे ज्या घरात कुटुंबकर्ता वर्षभर पुरेल एवढे शंभर कैरीचे लोणचे घातले जाते, तिथे आता पन्नास किरीचे लोणचे घातले जात आहे.

...

आंब्याच्या सिझनमध्ये ग्रामीण भागात कैरीचे लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू झाली असून, पहिला पाऊस पडल्यानंतर हमखास वर्षभर टिकेल अशा पद्धतीने लोणचे तयार केले जात आहे. त्यामुळे घरोघरी लोणच्याचा खाराचा घमघमाट दरवळू लागला आहे. तोंडाला पाणी सुटते. पण कैरीचे आंबे उपलब्ध होत नाही. तसेच शेकड्याना ४०० ते ४०० रुपये मोजावे लागत असल्याने लोणचे बनविण्यासाठी महिला मंडळाची लगबग बंदच दिसत आहे.

Updated : 15 Jun 2020 7:30 AM GMT
Next Story
Share it
Top