- वणी नार्थ एरीया के कोलार पीपरी खनदान में होराह है भ्रष्टचार
- जिल्हा वार्षिक योजना 2021-22 च्या खर्चास जिल्हा नियोजन समितीची मान्यता
- मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील विचित्र अपघातात एक ठार
- उदयपूरला घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो
- ब्रेकिंग न्यूज-: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा...
- यवतमाळ जिल्ह्यात 245 नवीन रेशन दुकान उघडणार
- गेल्या 24 तासात 23 नवीन कोरोना पॉझिटिव्ह
- नरसी चौक ते बस स्थानक बिलोली रोड परिसरात खाजगी वाहने बेशिस्त लावत असलेल्या वाहनेचा बंदोबस्त करावे : मुस्तफा पटेल कुंचेलीकर
- घुग्घुस येथे भाजपातर्फे कुलजारचे वाटप छोट्या व्यवसायिकांची प्रगती हिच देशाची प्रगती- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
- सिरोंचा वनविभाग जगंलो से सागवान की तस्करी कर रहे तस्करों पर वनविभाग द्वारा कारवाई..

अॅड.धनश्री निलेश देव यांच्या अकाली निधनाने अकोल्यातील एक अभ्यासु व्यक्तिमत्व लोप पावले ------ अॅड.प्रकाश आंबेडकर
अकोला :- महापालिकेतील वंचित बहुजन आघाडीच्या गटनेत्या अॅड.धनश्री निलेश देव यांच्या अकाली निधनाने अकोल्यातील एक अभ्यासु व्यक्तिमत्व लोप पावले. लोकाभिमुख कार्याबरोबर, नव विचारांची, योजनांची दिशा देणारे उद्योन्मुख नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. ही पोकळी कधी ही न भरुन निघणारी आहे,असे मत वंचित बहूजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. आज अॅड.धनश्री देव यांच्या श्रध्दांजली सभेत अॅड.आंबेडकर यांचा कंठ दाटून आला होता त्यांना शब्द सुचेनासे झाले होते.
अॅड.धनश्री देव यांच्या निधनाने समाजमन सुन्न आहे. महापालिका नगरसेवक असताना धनश्री यांना एमफिल, पीएच.डी करायचे होते. त्यांच्या अकाली निधनाने शहरातील मौल्यवान व्यक्तिमत्व आपण सर्वांनी गमावल्याची खंत अॅड.आंबेडकर यांनी व्यक्त केली. महापालिका करवाढ विरोधात त्यांचा लढा अकोलेकरांच्या कायम स्मरणात राहील. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न केले. राज्य पातळीवर डॉक्टरांनी पण, या अकोल्यातील डॉक्टरांना मार्गदर्शन केले. पण, नियतीला ते मान्य नव्हते. काळाच्या ओघात हे व्यक्तिमत्व लोप झाले असे म्हणत अॅड. आंबेडकर यांना शब्द सुचेनासे झाले होते व त्यांनी श्रध्दांजली अर्पण करत भाषणाला विराम दिला. यावेळी त्यांनी अॅड.देव यांचे पती निलेश व दहा वर्षीय पुत्र सार्थक यांना धीर देत आपण देव व अभ्यंकर परिवारासोबत असल्याची ग्वाही दिली. रामकृष्ण देव, अरुण अभ्यंकर, श्याम अभ्यंकर, शैलेश देव, भुषण अभ्यंकर, मनिष अभ्यंकर आदींचे आंबेडकर दांपत्याने सांत्वन केले.
आज अॅड.धनश्री देव यांच्या केला प्लॉट स्थित निवासस्थानी झालेल्या छोटेखानी श्रध्दांजली सभेला अॅड.प्रकाश आंबेडकर, प्रा.अंजली आंबेडकर, माजी पालकमंत्री आ.डॉ.रणजीत पाटील, जयंत सरदेशपांडे, डॉ.अशोक ओळंबे, देवानंद टाले, सोनुबाप्पु देशमुख, महेश गणगणे, डॉ.धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, ज्ञानेश्वर सुलताने,प्रमोद देंडवे, दिलीप देशपांडे, स्वानंद कोंडोलीकर, शंशाक जोशी, अजय शर्मा, सागर शेगोकार,हरिभाऊ काळे, पंकज कोठारी, मालाणी, चौधरी, गोपाल कोल्हे, धनंजय दांदळे, डॉ. प्रशांत मुळावकर, डॉ. संजय खडक्कार, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय डांगे, मनोज भिवगडे, सचिन देशपांडे, मिलिंद गायकवाड, योगेश फरपट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींची उपस्थिती होती