अहेरी शहरात भाजपा तर्फे राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जंतुनाशक फवारणी.
X
म मराठी न्यूज टीम
प्रतिनिधी/राहुल दिपक येनप्रेडीवार
अहेरी दि.१७ : अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काल भारतीय जनता पार्टी, अहेरी शहर तर्फे शहरातील प्रमुख भागात सोडीयम हायपो-क्लोराॅईडने जंतुनाशक फवारणी (निर्जंतुकीकरण) करण्यात आले, शहरात सद्या कोरोना महामारी दिवसेंदिवस वाढत आहे, दररोज नवीन कोरोना पोजीटिव्ह रुग्ण निघत आहे, ह्याची दखल घेत अहेरी शहरातील जनतेचे आरोग्य लक्षात घेऊन शहरात काल भाजपा तर्फे ही जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे.
ह्यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री पप्पु मद्दीवार, मुकेश नामेंवार,नगर पंचायत आरोग्य व स्वच्छता सभापती नारायण सिडाम, नगरसेवक श्रीनिवास चटारे, शँकर मगडीवार,भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय अलोने,गुड्डू ठाकरे, दिलीप पडगेलवार, राकेश गुडेल्लीवार, संतोष येमुलवार सह अहेरी शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.