अहेरी प्रसिद्ध दसरा महोत्सव यावर्षी साध्या पध्दतीने साजरा होणार.
X
"कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेनी गर्दी करु नये:राजे अम्ब्रिशराव महाराज"
म मराठी न्यूज नेटवर्क
स्वप्नील गोलेटिवार
अहेरी विशेष तालुका प्रतिनिधी
मो. ८३९०८७९१५२
गडचिरोली/अहेरी :-२०० वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या अहेरी इस्टेटचा प्रसिद्ध महोत्सव"यावर्षी कोरोना संकटाचा पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने साजरा केले जानार आहे. परंपरेप्रमाणे शस्त्रपूजा व दसराच्या दिवसी अहेरी राजनगरीत निगणार " राजेची पालखी" यावर्षी निघणार नाही. त्याऐवजी वाहनाने जाऊन सिमोल्लंघन करून गडअहेरी येतील गडीदेवीचे व शमीव्क्षाचे पुजन केले जानार असल्याची माहिती अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी दिली आहे. परंपरेप्रमाणे दसराच्या दिवशी सीमोल्लंघन झाल्यावर राजे साहेबांचे राजमहाल समोर अहेरी इस्टेटचा आदिवासी बांधवांना होनारे मार्गदर्शन ही यावर्षी होणार नाही. तसेच सकाळी निघणारी " साईबाबांची पालखी" ही यावर्षी अहेरी शहरात न फिरविता राजमहालातच पूजन करून दर्शनासाठी ठेवले जानार असल्याची माहिती ही राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी दिली आहे. दसराच्या दिवशी जनतेनी अहेरी शहरात गर्दी न करता आपले आणि आपल्या कुटुंबाचे या कोरोना संकटातून बचाव करण्याचे आवाहन तथा हे संकट लवकरात लवकर दुर व्हावे अशी गडीदेवीच्या चरणी प्रार्थना ही राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी केले आहे तसेच अहेरी इस्टेटच्या सर्व जनतेला नवरात्र आणि दसराच्या शुभेच्छा ही राजे अम्ब्रिशराव महाराज मोहदयांनी दिल्या आहे...