अहेरी च्या बौद्ध विहाराच्या पटांगणात 64 धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
M Marathi News Network | 25 Oct 2020 10:51 AM GMT
X
X
"अहेरी च्या बौद्ध विहाराच्या पटांगणात 64 धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा"
राहुल गर्गम
शहर प्रतिनिधी अहेरी
मो.7620133350
गडचिरोली/अहेरी:- 25 ऑक्टोबर. सकाळी दहा वाजता पंचशील ध्वजाचे माजी अध्यक्ष आयु. रामचंद्र ढोलगे साहेब यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सामूहिक पंचशील त्रिशरण ग्रहण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी एकनाथ चांदेकर साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून सुरेंद्र अलोने, मारुती ओंडरे, करमे बाबू साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरेंद्रभाऊ अलोणे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या महत्त्व पटवून सांगितले, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गर्गम यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत भिमटे यांनी मानले...
Updated : 25 Oct 2020 10:51 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire