Home > विदर्भ > अहेरीत भिक मागुण डास प्रतिबंधात्मक फवारणी करणार

अहेरीत भिक मागुण डास प्रतिबंधात्मक फवारणी करणार

अहेरीत भिक मागुण डास प्रतिबंधात्मक फवारणी करणार
X

"अहेरीत भिक मागुण डास प्रतिबंधात्मक फवारणी करणार"

आशिष सुनतकर

उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

मो. ७०३००८१०३७

गडचिरोली/अहेरी :- वृत्त असे की अहेरी नगर पंचायतीने सन २०१६-२०१७ च्या निधितून ६४.१० लक्ष इतकी मोठी रक्कम खर्च करून डास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात फवारणी करण्यासाठी फोग मशिन खरेदी केले परंतु शहरात नगर पंचायतच्या चुकीच्या नियोजनामुळे घाणीच्या साम्राज्य वाढले परिणामी शहरात डासांचे प्रमाण वाढून अहेरी शहरात डेंगु आजारचे प्रमाण देखिल खुप मोठ्या प्रमाणात वाढले असुन अहेरीतील जनतेचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. त्यामुळे मागील बर्‍याच दिवसा पासुन अहेरीतील जनता आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नगर पंचायतीला फवारणी करण्यासाठी साठी वारंवार सुचना वजा मागणी केली परंतु स्थानिक नगर पंचायत तर्फे शहरात डास प्रतिबंधात्मक फवारणी करण्या संदर्भात कुठलीच हालचाली करण्यात आलेली नाही. शिवाय डास प्रतिबंधात्मक फवारणी करण्यासाठी नगर पंचायतीला बोलले असता कधि मनुष्य बळ नसल्याचे कारण संगितले तर कधि फवारणीचे औषध उपलब्ध नसल्याचे सांगुन मागील दोन वर्षा पासुन प्रत्येक वेळी वेगवेगळे कारण देऊन केवळ वेळ मारून नेण्याचे काम नगर पंचायत कार्यालया तर्फे करण्यात येत आहे तेव्हा ६४.१० लक्ष रुपये निधि खर्च करून घेण्यात आलेली फाग मशिन ही केवळ पांढरा हत्ती बणून आहे.तेव्हा पुढील दोन दिवसात संपुर्ण अहेरी शहरात फाग मशिन द्वारे डास प्रतिबंधात्मक फवारणी करावी किंवा आम्हाला परवानगी द्यावी. अशी मागणी प्रशांत भाऊ नामनवार (सामाजिक कार्यकर्ते) तथा रवि नेलकुद्री (भाजप तालुका अध्यक्ष) यांनी निवेदांनातून केली असुन दोन दिवसात फवारणी न केल्यास किंवा परवानगी न दिल्यास नगर पंचायतीचे मौन म्हणजे परवानगी समजुन आम्ही भिक मागुण डास प्रतिबंधात्मक फवारणी करणार. आणि सदर फवारणी करतांना कुठलाही समस्या उदभवल्यास त्यास सर्वस्वी जबाबदारी अहेरी नगर पंचायतीची राहील असे त्यांनी निवेदांनातून म्हटले आहे तेव्हा आता अहेरीतील जनतेचे लक्ष नगर पंचायतीच्या पुढील हालचालीवर लागले आहे

कोट- नगर पंचायत प्रशासन केवळ भ्र्ष्टाचार मध्ये विलिन झाली असुन केवळ मलाईदार कामचेच नियोजन करीत असल्याने जनतेच्या आरोग्याचे कैवारी कोण ? म्हणून आम्ही भिक मागुण फवारणी करणार - श्री. रवि नेलकुद्री (भाजप तालुका अध्यक्ष अहेरी)

कोट-अहेरी नगर पंचायतीने निर्ल्लजपणाचा कळस गाठला असुन त्याचे परिणाम अहेरीतील निष्पाप जनता भोगत आहे आज अहेरीत डेंगुचे जे रुग्ण वाढले आहे त्यास अहेरी नगर पंचायतीच्या साफसफाई च्या कामात झालेला भ्र्ष्टाचार हा मोठा कारण असुन याची चौकशी त्वरित व्हावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल...

" श्री. प्रशांत नामनवार (माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते"

Updated : 28 Oct 2020 11:29 AM GMT
Next Story
Share it
Top