Home > विदर्भ > असोसिएशन ऑफ डिजिटल मीडिया अँड इंडिपेंडेंट न्यूज पोर्टलची जिल्हा कार्यकारिणी जाहिर

असोसिएशन ऑफ डिजिटल मीडिया अँड इंडिपेंडेंट न्यूज पोर्टलची जिल्हा कार्यकारिणी जाहिर

असोसिएशन ऑफ डिजिटल मीडिया अँड इंडिपेंडेंट न्यूज पोर्टलची जिल्हा कार्यकारिणी जाहिर
X

जिल्हाध्यक्षपदी सुकांत वंजारी तर कार्याध्यक्षपदी विष्णुपंत यादव यांची निवड

यवतमाळ-: डिजीटल मिडीयातील संपादक,प्रतिनिधी पत्रकारांच्या विवीध मागण्यासाठी झटणारी भारतातील एकमेव संघटना म्हणजे असोसिएशन ऑफ डिजिटल मिडीया अँड इंडिपेंन्डट न्युज पोर्टलच्या यवतमाळ जिल्ह्यातील विवीध न्युज पोर्टल,युट्युब चॅनलचे संपादक,प्रतिनिधींची यवतमाळ जिल्हा व आठ तालुका कार्यकारिणी दि.३० ऑगस्ट रोजी यवतमाळ येथील शासकिय विश्रामगृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात जाहिर करण्यात आली.

असोसिएशन ऑफ डिजिटल मिडीया अँड इंडिपेंन्डट न्युज पोर्टलचे संस्थापक अध्यक्ष ॲड अव्दैत चव्हाण यांच्या आदेशानुसार हि कार्यकारिणी गठीत करुन संपादक,प्रतिनिधींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असुन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी असोसिएशन कार्य करण्यासाठी यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी एस.एम.न्युजचे संपादक सुकांत प्रकाश वंजारी तर जिल्हा कार्याध्यक्षपदी नरकेशरी न्युज पोर्टलचे संपादक विष्णुपंत यादव यांची निवड करण्यात आली तसेच किशोर बबनराव कुळसंगे यवतमाळ जिल्हा सचिव,रुस्तम शेख यवतमाळ जिल्हा संघटक,मकसूद अली यवतमाळ तालुका अध्यक्ष,स्वप्निल वटाणे राळेगाव तालुका अध्यक्ष,मुस्तफा न्यामत खान पठाण बाबुळगाव तालुका अध्यक्ष,ईश्वर प्रफुल देऊळकर बाबुळगाव तालुका कार्याध्यक्ष,पवन गजानन चव्हाण पुसद तालुका अध्यक्ष,मो. मुब्बशिर अब्दुल हमीद शेख पुसद तालुका उपाध्यक्ष,अमोल सतीश गावंडे पुसद तालुका संघटक,सैय्यद फैजानोद्दीन सैय्यद मुजोबोद्दीन पुसद तालुका सचिव,संदिप रत्नपारखी दिग्रस तालुकाध्यक्ष,संकेत गजानन गझलवार झरी जामणी तालुका अध्यक्ष,संघर्ष राहुल भगत,झरी जामणी तालुका संघटक,पुरूषोत्तम खुशाल गेडाम,झरी जामणी तालुका कार्याध्यक्ष,गणेश रमेश मुद्दमवार झरी जामणी तालुका सचिव,सचिन पांडुरंग मेश्राम मारेगाव तालुका अध्यक्ष,संतोष पेंदोर वणी तालुका अध्यक्ष,अमोल सुर्यभान कुमरे वणी तालुका संघटक यांची निवड करण्यात आली.

Updated : 8 Sep 2020 6:58 PM GMT
Next Story
Share it
Top