- सहकार पॅनलचे राजुदास जाधव यांनी एकवीस वर्ष उपभोगली सत्ता यंदा मात्र मतदारांनी दिला रट्टा
- राजलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेने केला कर्मचाऱ्यावर अन्याय
- उमरची सुटका कराः नॉम चॉम्स्की, राजमोहन गांधींची मागणी
- गृह विलगीकरणातील रुग्णांवर विशेष लक्ष ठेवा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आता जिल्ह्यात घरोघरी लसीकरण मोहीम
- स्वप्नांना कष्ठाचे बळ द्या. - माजी नगरसेवक संजय कंचर्लावार भानापेठ प्रभाग क्र. ११ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप सोहळा संपन्न.
- उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उदि्दष्ट वाढविण्याचा राज्य शासनाचा निर्णय. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराचे फलीत. १५ जुलै पर्यंत धान खरेदी करण्याचे अभिकर्ता संस्थांना शासनाचे निर्देश.
- संभाव्य कोरोना लाटेचा धोका टाळण्यास करा लसीकरण - आयुक्त राजेश मोहिते १२ ते १७ वयोगटासाठी शाळांमध्ये केले जाणार लसीकरण
- शहरातील सायकल ट्रॅकच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशीच्या मागणीसाठी भाई अमन यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
- आपले घर डेंग्युमुक्त ठेवा आताच काळजी घेतली तर धोका टळेल मनपा प्रा.आरोग्य केंद्रात मिळणार गप्पी मासे
- राष्ट्रीय रँकिंग धनुर्विद्या स्पर्धेत मंजिरी अलोने ला सुवर्णपदक

असे पुढारी आमचे वैरी !
X
"असे पुढारी आमचे वैरी !"
लेखक. श्री तानाजी सखाराम कांबळे.
"पुढारी "म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो चटकन खादी खाली कपड्यांमध्ये पेहराव केलेल्या लोकप्रतिनिधीचा चेहरा डोक्यावर गांधीटोपी घालून पायातील कोल्हापुरी पायतानाचा साज चढवून लोकांचा आधारस्तंभ असा तो पुढारी !
फार पूर्वीचा काळ होता त्यावेळेस स्वातंत्र्य होते मात्र,
गावगाडा हाकणारा हाकेच्या अंतरावर चे शब्दाला अनेकांचा मानच पुढारी मंडळींचा फार देखणा होता.अंगावर सफेद कुर्ता अंगाखाली नेसलेले पंजी, डोक्यावर लहरी फेटा, तिरकसपणे नजर चोरणारा तो कटाक्ष ,बैठकीतील भेदक आवाज वाड्यातून निघताच माणसं हलत!असा पूर्वीचा पुढारी मंडळींचा रुतबा होता.वाड्यात अधिक राशीचे भरून असलेले धान्याचे भरलेले तट्टे या गावगाड्याचा प्रमुख असलेला पुढारी इतरांचे साठी नेहमी त्याची दारे सतार उघडे ठेवायचा इतका मोठ्या मनाचा त्यावेळचा वाड्याचा रुबाब होता!
खरंतर काळ फार गरिबीचा होता.गाव हाकणारा तो प्रमुख पाटील वाड्यावरून बाहेर पडला की जुन्या काळातील जीप ची गाडी सोबतीला चार-दोन सवंगडी घेऊनच बाहेर पडायचा. गावाचे टेहेळणी बरोबर गावात व गावकुसाबाहेर राहणाऱ्या यांच्यासाठी न्यायनिवाडा कमिटीचे प्रमुख न्यायाधीश असायचा.गावाचा मध्यभागी मुख्य मंदिराच्या चौकात वर्षानुवर्षे उभ्या असलेल्या वडाच्या झाडाखाली बांधलेल्या पारावरची चावडीत बैठक नेहमी ठरलेले असायचे .बैठक उरकून पाटील गावच्या शेतातील मळ्यात निघाल्यावर काही रिकामटेकडे यांच्यासाठी देवळासमोरील तो "पार "कायम चकाटी पीठणाऱ्यांचे साठी रिकामा असायचा.
गावात वर्षा पोटी अनेकांच्या मिशा दाढी केस कापायला न्हावी त्याकाळी अनेकांच्या घराचे उंबरी मोजायचा व अनेकांना माहीत नसलेली गुपिते तो सोबत घेऊन परत यायचा.
त्याकाळी कुंभारा चे घरातील तट्टे धान्याने भरलेले असायचे ते गणपतीची मूर्ती तयार करण्यापासून बेंदूर सनाला बैल,नागपंचमीला नाग करून देण्याच्या वर्षभराचे करारावर धान्याने तट्टे त्यांचे घरी वर्षाकाठी भरत होते !
गावातल्या देवळात गुरुवाचा दामू अण्णा कडे अनेकजण पहाटे व अमावस्या-पौर्णिमेला फक्त कौल लावायला येत असत पण,दामूअण्णा एकदा एकदा वैतागून गर्दी वाढता क्षणी कौलाचे वेळी देवीच्या एका पायात लावलेल्या भाताचा तुकडा मुद्दामून पेटलेला उदाचा धूपारा देवीच्या पायाच्या शेजारी जवळ फिरून फिरवून चाणाक्षपणे देवीने कौल "डावा ,उजवा " दिला म्हणून सांगून जायचा !
देवीच्या मूर्तीच्या गाभार्या पासून ते देवालयाच्या प्रवेशद्वाराच्या काही अंतरावर महाराचा भाऊमा लेकरं आजारी हाय म्हणून दामुअण्णा ला लांबूनच हाक द्यायचा कौला साठी!आजच्या लोकांसारखा" सोशल डिस्टन्स इन" चा प्रकार काहीसा त्यावेळी "अस्पृश्यता" या नावाने ओळखला जात होता.
मात्र हा लोक डाउन यावेळी कुणा पोलिसाचा फौजदाराचा वा कलेक्टर च्या आदेशावरून होत नव्हता.
63 खेड्यातील सतराशे गावापर्यंत देवीचा फार मोठा दबदबा होता.देवीला लांबून लांबून भक्तगण यायचे गावात आल्यावर एक बक्र जत्रा म्हणून कापल्यावर अर्ध बकरं त्यातील गावातील बारा बलुतेदारांची वाटेवर जायचे.यातील आतडे कोतळा धुण्याचे अटीवर एक वाटा न्हाव्याला तर बकऱ्याचे पायाचे खूर व मुंडीचे दोन कान मांगाच्या बापूमा चे वाट्याला यायचे ! गुरुवाचा दामू अण्णा हा लिंगायत तथा शाकाहारी असल्यामुळे त्याच्या वाट्याला येणारी मुंडी दामुअण्णा मागच्या दाराने जास्तीत जास्त दराने खाणाऱ्याला विकून पैशाला पैसा उभा करत होता.देवीच्या जत्रेला रात्रीचे पालखी नेते वेळी पालखीच्या मागे दिवटी धरणाऱ्या चांभाराच्या बाळूमा ला एक वाटा मटणाचा पक्का ठरलेला असायचा!
जत्रेच्या अर्ध्या बकऱ्या तील आरधी वाटणी ही ठरल्याप्रमाणे गावचा प्रमुख पाटील व पोलीस पाटील यांच्याकडे ठरल्याप्रमाणे असायचे गाव कसं अगदी गुण्यागोविंदाने शांततेने त्याकाळी नांदत असायचं.गावच्या पाटलाच्या वाड्याचा रुतबा एवढा असायचा त्याकाळी तालुक्याचा येणारा तहसीलदार तथा फौजदार या दोघांचाही खरमरीत होणारा तांबडा-पांढरा पाहुणचार कमीत कमी चार सा महीने तरी त्यांना बोट चाकावयास लावणारा असायचा.गावच्या पाटलाला त्यावेळी मिनी आमदार म्हणून सर्वजण हाक मारायचे.गावाच्या शाळेयाच्या माध्याळ कर मास्तरचा सर्व्या गावाला त्यावेळी फार लोभ असायचा.मास्तर राहायचा भाड्याच्या घरात मात्र,कोण कपडे धुऊन देई,कोण झाडलोट करून दे,अंगणात मास्तर चे सायंकाळचे तरी शाळा प्रवचन ऐकण्यासाठी गर्दी तोबा!पिंजरा चित्रपटातील "मास्तर "वगळता,माद्याळकर मास्तर ची सायकल आणि घरातील ब्लॅक अँड व्हाईट शटर बंद टीव्ही या दोन गोष्टी साठी मास्तर कडे लोक कौतुकाने बघत होते.गांडीला फाटलेलं ठिगळ चड्डीला लावून अनेक पोरं हसत-खेळत मजेत शिकत होती.
कुणाला भविष्यकाळातील तहसीलदार व्हायचं होतं,कुणाला फौजदार,कुणाला मोठाले ऑफिसला साहेब व्हायचं होत अनेकांचे स्वप्न त्या लाल मातीत रंगत होती.
गावकुसाबाहेरचमहारवाडा,मांगवाडा,जगण्यासाठी नेहमीच रोजंदारी साठी धडपडत होता.इत भर पोटाची,खळगी भरण्या साठी लाल मातीतल्या बागायतदारांच्या शेतामध्ये राबणारा तो एक शोषित पीडित कष्टकरी असा वर्ग होता.दिवसभर राब राब राबल्यावर सायंकाळी त्या बागायतदार घराकडून त्यांना दिवसाकाठी एक कप चहा आणि बटर कामाचे मोबदल्यात मिळायचे मात्र चहा प्यायला दिलेला कप जो असायचा त्या कपाचा दांडा फुटलेला असायचा व नियमित तोच कप त्यासाठी त्याला द्यायचे व चहा पिऊन झाल्यावर त्या माणसाने तो कप धुऊन त्याच ठिकाणी पुन्हा दाराच्या वरती ठेवायचा.इतका तो त्याकाळचा लॉक डाऊन चा प्रकार होता.वाड्यावरचा पाटील,गुरुवाचा दामू अण्णा, सरकारने नेमलेला गावातील पोलीस पाटील,महाराचा भाउमा,चांभाराचा बाळूमा, मांगाचा बापू,नाव्याचा रामा,कुंभाराचा त्रंबक पांड्या, व वाड्यावरचा मिनी आमदार पाटील,
हे सारे काही प्रातिनिधिक उदाहरण आहे.
त्याकाळातील वास्तवात जगणारी,जगण्यासाठी संघर्ष करणारी ही सारी मंडळी त्याकाळात संघर्ष करून पुढे आली.
काळ बदलला काळ कोणासाठी थांबत नसतो.
काळाबरोबर प्रत्येक माणूस व त्याच्या बरोबरची त्याची ही परिस्थिती हळूहळू बदलत जाते.बदलत्या काळाच्या ओघात पाटलाच्या वाड्याच्या जागी दमदार डोलदारअसा बंगला दिसून आला.वाड्यावर च्या पाटलाचा डोक्यावरचा फेटा गायब झाला.
ओठावरची मिशी गायब झाली,हातातली लांबसडक काठी गायब झाले,काळा रंगाचा कुर्ता व पांढऱ्या रंगाचे पंजे गायब झाले झाले.दारात उभी असलेली जीप गाडी केवळ हौसेखातर परसदाराला बांधलेल्या गोडावूनमध्ये गंजून पडत राहिली.आणि त्या जागी नव्याने टोयोटा इनोवा मर्सिडिज-बेंझ,बुलेट यासारख्या चारचाकी व दुचाकी दारात दिसु लागल्या. वाड्याचे पाटलाची पोरं आत्ताची नवीन पिढी ही विलायतेला परदेशामध्ये मोठाला असं शिक्षण घेऊन आपल्या मायदेशी परतू लागली.
राहणीमान झपाट्याने बदलू लागल.
तरुणांच्या ओठावरच्या मिशा गायब होऊ लागल्या.त्याकाळी बच्चनच्या 'डॉन 'चित्रपटातील काळा शर्ट व पांढरी रंगाची पॅन्ट बदलत्या काळात बरमुडा व टी शर्ट वर येऊन ठेपली.छोटेखानी असणारे देवाच्या गाभाऱ्याला तथा मंदिराला लाख मोलाचा सोन्याचा मनोरा दिसू लागला.
गुरुवाला अर्थात दामुअण्णा चा वारसा पुढे त्याचा पोरगा महादेव "गुरव "म्हणून ओळखू लागला.वर्षा पाठीमागे एक गुरव अशी नवीन प्रथा आणि परंपरा सामंजस्यपणे गावच्या वेशीत सुरू झाले.केंद्र सरकारने गौण खनिज कायदा सक्तीने लागू केल्यामुळे त्यामुळे माती उत्खनन बंद झाल्याने गावातल्या अनेक कुंभार यांचे भाताने व धान्याने भरलेली तट्टे आता रिकामी पडू लागली.चांभाराच्या बाळूमामाचा पोरग आता आयटीआयला गेल्याने कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्याने चाकरमाने म्हणून मुंबईची वाट धरली.काखला चामडी ब्याग घेऊन,ब्यागेत वस्तारा,छोटासा आरसा व दाढीचा ब्रश घेऊन फिरणाऱ्या नाव्याला पूर्वीसारखे प्रत्येकाचा उंबरा झीजवायची वेळ आता राहिली नाही,तर नहाव्याच्या दुकानाचा उंबरा झीजव्हायची वेळ त्या गावातील ग्रामस्थांना येऊन ठेपली.मांगाच्या बापूमाची हलगी आता "हाकाटी" म्हणून गाव बघू लागली आहे.गाव कुसाबाहेरच्या महारवाडा
बामनाच्या घरात लिहन,कुरवड्या च्या घरात "दाण "महाराच्या घरात गाण,या वाडा वडिलांच्या म्हणी मध्ये अडकून पडलेत.
गानारे लेकर बाळ उदंड झालीत!
म्हाताऱ्याने घरात पूर्वी आणलेला बाबासाहेबांचा,बुद्ध,बुद्धांचा फोटो सोबत छत्रपती शिवाजी महाराज,राजश्री छत्रपती शाहू महाराज,महात्मा ज्योतिबा फुले यांचे फोटोत भिंतीवरती वाढ झाली.कांबळेच्या भाऊमाच पोरगं नोकरी कामानिमित्त मुंबईला गेल्याने गावी आले की आलो ना,बोलू ना,सांगू ना,करुणा!
असा काही बाही नन्नाचा पाढा मोठ्या रुबाबात बोलल्याने ऐकनाराचे मन प्रसन्न करत होता.त्याने पेहराव केलेल्या मुंबईतील बरमुडा आणि टी-शर्ट सबंध महारुडाचे लक्ष वेधून घेत होता.कारण भविष्यातला समाजाला बरोबर घेऊन जाणारा तो या समाजाचा
"पुढारी "असावा कदाचित या अपेक्षेने!
क्रमशा :- भाग - 1
"लेखक"
श्री तानाजी सखाराम कांबळे.
मोबाईल नंबर : 80 80 53 29 37.
ई-मेल : tanajikamble33@gmail.com.