असे पुढारी आमचे वैरी !
लेखक श्री तानाजी सखाराम कांबळे.
भाग दहावा, एकूण भाग 17, पैकी भाग 10.
................................................................
कुणीतरी हाक का रे,माझ्या शेतातील,
गलोरी ने नेम धरून,पिकावर बसलेली
पक्षांची टोळधाड,वरती.नेम अचूक मारा रे,
गलोरीतून सुटलेल्या दगडाने,
होऊद्या एकदाचे गंभीर,जखमी!
त्यांचे गंभीर जखमी होणाऱ्या,वेदनेला" कलेक्टरचे 188 वा कलम,हिरव्यागार,भरलेल्या शेतवडीतील पिकावर,
बसलेल्या पक्ष्यांच्या या टोळ,धाडीला लागू पडत नाही.
जाऊ दे गलोरी तून एखादा, सुसाट वेगाने गेलेला,दगड,
फुठून जाऊदे कानाचा,चोबा!मग,कळेल त्यांना,हिरव्या झाडाखालून न्याय मागणाऱ्या,आक्रोशाच्या,
"वेदनेला" लावणाऱ्या,188 कलमाचे कारण.
येईल थोडीशी चक्कर आल्यागत,
सरकारी दवाखाने भरगच भरलेत,
म्हणून सांगू त्यांना,तरीपण, एखादा केस पेपर,
एखाद्याच्या ओळखीने हातावर ठेवून,
त्यांच्याच,औषध भांडारातील,
कुठल्याश्या कोपर्यात धूळ खात बसलेल्या त्या,
पांढऱ्या रंगाच्या डब्यातील काही गोळ्या देऊ,
त्यांना आपण वेदने वरती इलाज म्हणून.
एखाद्या सिजनेबल पक्षाच्या थव्याला,त्याच्या
पोटाच्या भुकेपोटी आम्ही काही काळ स्वीकारले.
पण तीन-तीन,"पक्ष्यांचे" थवे,
आणि तेही"तिन्ही शिजनला" म्हटल्यावर थोडं,
जास्तीच गणित झालं होतं.
सहनही होत नाही, आणि सांगताही येत नाही.
कधीकधी मिळालेल्या कमी दरांचे, अभावी!
तर कधी पुराच्या पाण्याने चोही बाजूने वेढलेल्या,
माझ्या पिकाला नेस्तनाबूत होताना,
मला आता पहावत नाही,
विकत घेणारा शेतमाल,
आण श्रीमंत झालेला व्यापारी,
मला आता पहावत नाही.
शेत वाडीच्या काढलेल्या कर्जापायी,
थकबाकी वसुली करण्यासाठी,
दारावरती घुटमळणार्या बँकेच्या साहेबाचा,
कासावीस झालेला जीव मला आता पाहवत नाही.
नोकरी वाचून,पोरग्याची होणारी तळमळ,
गुडघ्याला बाशिंग बांधायचे निघून गेलेली त्याची वेळ,
मला आता पाहवत नाही.
म्हणून मला नको आहे तुमचं नतद्रष्ट पण,
माझ्या शेत वडीतल्या त्या,
पिकावर ती तुमच्या पक्षांनी,पक्षांच्या थव्याचा टोळधाडनी
केलेला विध्वंस, मला आता पहावत नाही.
कोण पुन्हा पुन्हा येईल,तर कुणी तिने शिजण घेऊन येईल, पण दाने आमच्या शेतवडीतलेच तुम्ही खाणार,
हे मला आता पहावत नाही.
म्हणून मी येऊन बसलो आहे,
आता शेताच्या बांधावरती बुट्टीभर दगड घेऊन,
चार गलोरीचे खोचक घेऊन,
एकदा तुम्हाला जखमी करण्यासाठी
सारखे आम्हीच किती व्हायचं,
जखमी पैशानं,गरिबीन,
अस्मानी संकटाने अन, रोगाच्या भयान!
शेतवडी- तल्या त्या भरल्या,
पिकाची नुकसान पाहून ! - .........................
.................................................................... -
कवी. श्री. पिंटू. एस.कांबळे.
मुक्काम.पोस्ट.असंडोली.
तालुका.गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर.
मोबाईल नंबर 80 80 53 29 37.