Home > महाराष्ट्र राज्य > असे पुढारी आमचे वैरी.

असे पुढारी आमचे वैरी.

असे पुढारी आमचे वैरी.
X

भाग आठ.

........................................................

लेखक: श्री. तानाजी सखाराम कांबळे.

......................................................

मानवी आयुष्यामध्ये दोन प्रकारचे जीवन असते. या जीवनशैलीमध्ये प्रामुख्याने आनंदी जीवन आणि काल्पनिक जीवन असे दोन प्रकार असतात.मनुष्य हा काल्पनिक जीवनामध्ये अधिक प्रमाणात रमणारा असतो.

त्याचप्रमाणे तो आनंदी जीवनाचा शोध घेत असतो.मात्र वास्तवामध्ये जगत असताना माणसाला आनंदी जीवन फार कमी प्रमाणामध्ये मिळते. तो आनंदी जीवनासाठी संपूर्ण तह्यात जगत असतो,धडपडत असतो, तळमळत असतो.काल्पनिक जीवन हे समाजव्यवस्था सांभाळणाऱ्या पुढारी मंडळी ने तयार केलेले अ वास्तविक चित्रण असते.या देशातल्या अवास्तविक चित्रणाचा डोलारा इतका प्रचंड मोठा असतो की, आखाती जगातील अनेक देशांचे सौंदर्य, आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये, उभारण्याचा साकारण्याचा "माणस "या पुढारी मंडळीचा दांडगा असतो.आणि ते त्याच्या पलीकडे जाऊन करतात.आणि मग सुरू होते ती आर्थिक शोषणाचे सुरुवात! सामान्य माणसांच्या,शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसून मग शेत जमिनी खरेदी केल्या जातात, खाजगी इनामी व,अल्पदरात आपल्याला हव्या असलेल्या सरकारी जमिनी लाटल्या जातात.मग खरी सुरुवात होते ते आपापल्या आर्थिक श्रीमंतीच्या प्रदर्शनाने जोमात होते. आणि याला बळी पडला जातो तो सामान्य आणि मध्यमवर्गीय माणूस! मग सुरुवात होते ती हिरव्यागार जंगलाचे कतली मध्ये रूपांतर करण्याचे,एखाद्या मोक्याच्या ठिकाणी गरीब लोकांची वस्ती असेल तर त्यांना त्या ठिकाणाहून,साम-दाम,-दंड-भेद,अर्थ लावून अन्य ठिकाणी त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी नव्याने झोपडपट्टी उभा करून दिले जाते,आणि स्वतःच्या अर्थकारणाला गती दिली जाते,ही गती केवळ या आणि अशा जागेने पूर्ण होत नाही,तरी यासाठी त्यांना हवे असते अधिक शेतीचे साम्राज्य, शेतीच्या नावाखाली श्रीमंतीचे मळे फुलवणे करता, उद्योगधंद्याच्या नावाखाली मोक्याच्या जमिनी हडप करण्याकरता, काळा पैसा दडवून ठेवण्याकरता अधिक तो पांढरा करण्याकरता हजारो एकरांची शेती यांनी कब्जा करून ठेवलेले असते. काही कोटींच्या घरात अशा शेतवाडी मध्ये. आखाती देशांमधील जगाच्या बाजारातील,नाविन्यपूर्ण अशा "फार्म हाऊस"ची संकल्पना याठिकाणी उभारले जाते. यामध्ये राजकारणी लोकांच्या बरोबरच, व्यवसायाने नामांकित असलेले डॉक्टर कायदेतज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट, सरकारचे जावई असलेले कंत्राटदार, आणि पेशाने" सराईत "असलेला सेवा निवृत्त सरकारी अधिकारी वर्ग, या साऱ्यांना, या काल्पनिक उभारलेल्या जगामध्ये जगावयाचे भारी हौस असते.यासाठी यांनी कोटीच्या घरात माया उभी केलेली असते. अशा मायावी प्रस्थापित केल्या पुढारी मंडळींना सरकारी पाठबळ मिळाल्याने मग खरा खेळ सुरु होतो, तो म्हणजे रस्त्याच्या नावाने कब्जा केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी, लघुपाटबंधारे तलावाच्या नावाने, काढून घेतलेल्या गरीब व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांच्या जमिनी, ऊर्जा प्रकल्प, औद्योगिक प्रकल्प, पवनचक्कीसारख्या, कोळसा उद्योग सारख्या, गौण खनिज प्रकल्प, औद्योगिक विस्तारणाचे नावाखाली मोक्याच्या जमिनी प्रकल्पा पूर्वी हडप केल्या जातात सरकार नावाच्या गोंडस बाळाचे आदेशाने, मात्र या मागचा फार मोठा गैरव्यवहार, यापूर्वी ही कधी उघडकीस आला नाही किंवा येण्याची सुतराम शक्यता नाही. बापजाद्यांन पिढ्यानपिढ्या सांभाळून ठेवलेल्या शेतजमिनी, प्रकल्पग्रस्त म्हणून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या तोकडा मोबदला, मिळालीच तर सरकारी नोकरीचे आमिष, आणि प्रकल्पग्रस्तांना दाखवला जाणारा राखीव कोटांचा, प्रांजळ आशावाद!

खरोखर अशा अनेक प्रकल्पग्रस्तांना काल्पनिक जीवनामध्ये रंगून जाण्यास पुरेसा ठरतो. पूर्वी शहर व उपनगरांत सिमेंट विटा चे जंगले असे म्हणून नावे ठेवली जात होते!मात्र या सिमेंट विटा च्या जंगलात राहणाऱ्या या, करामती पुढारी मंडळींनी, खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांचा सातबारा देखील आपल्या नावावर करून घेण्यात काही कसर अथवा उनिव सोडली नाही.गेलेल्या शेत जमिनीचा तुकड्याचा मोबदला मिळावा म्हणून, गेल्या दीड पिढ्यांपासून, अनेक शेतकरी बांधवांचा समुदाय, सरकारी कलेक्टरचा उंबरा झिजवत आहे.आपल्या हक्काच्या शेतीला "उपरा झालेला" तो शेतकरी कधी तालुक्याच्या तहसीलदाराकडे( पूर्वीचा मामलेदार असा शब्द) तर आत्ताच्या कलेक्टरकडे, आपल्या देयक मागणी असलेल्या रकमेच्या न्यायासाठी,अक्षरशा तडफड तळमळत आहे. या पुढारी मंडळीपैकी असा येथे एक ही नाही की त्याच्या नावे हजारो एकराच्या वरती जमिनी आहेत, असा एक ही नामांकित डॉक्टर नाही जाने, वैद्यकीय व्यवसायातून कमावलेल्या दोन नंबरच्या हिशोबाने घेतलेल्या हजारो एकराच्या वरती जमिनी नाहीत,असे एकही वकील महोदय नाहीत की ज्यांनी आपल्या प्रलंबित न्यायातून, मिळवलेल्या बेकायदेशीर पैशातून घेतलेल्या हजारो एकर जमिनी त्यांच्या नावावर नाहीत असे!

यामध्ये सिनेअभिनेते, त्यापासून ते, उद्योग व्यवसाय करणारे धनिक मंडळी, साधुसंतांच्या नावाखाली देवाचे वारसदार म्हणून मिरवणारे दाढीवाले महाराज, असे अनेक टगे,टोणपे आणि यांना हातात सातबारा आठ अ आणून देणारे ठिकठिकाणच्या तिट्टा वरचे, एजंट कम डावा डोळा, अण्णा, बापू, तात्या, मामू.इत्यादी चे, लाड पुरवणारे, नेहमीच त्यांच्या खिशात तलाठी तहसीलदार कार्यालय पदाचा शिक्का असतो.

असा गाव कामगार तलाठी, व त्याचा विभागीय सर्कल साहेब, येतपरस साठा सफळ संपूर्ण उत्तराची कहाणी येऊन थांबते. हजारो एकरांचे मालक हे कधीच बागायतदार नसतात, तर ते आनंदी जीवनामध्ये जगणार यांच्यापैकी एक असतात! त्यांना शेतमालाच्या दराचा भाव पडला की जास्त आला, याच्याशी काहीही देणंघेणं नसतं, सोयाबीनच्या रास्त भावापासून ते उस् दरा पर्यंतचा, प्रतिवर्षी चा संघर्ष, केवळ आणि केवळ सोसत असतो तो फक्त अल्पभूधारक व मध्यमवर्गीय कष्ट करणाऱ्या शेतकरी वर्गासाठी! बापजाद्यांना टिकवून ठेवलेला थोडाफार शेतजमिनीचा तुकडा, व सरकारचा डावा डोळा चुकून अनेकांच्या कडे राहिलेल्या पारंपारिक शेतजमिनी, शेतमालाला मिळणाऱ्या कमी दरामुळे, बेरोजगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे, खाणारी दहातोंडे झाल्यामुळे, मूळ वही वाटीच्या हिशा मध्ये चार लेकरांनी करून घेतलेली खातेफोड तुकडे फोड,भविष्यातील आनंददायी जीवन तर सोडाच मात्र कल्पित जीवनामध्ये आयुष्य किती वाटणीला येईल हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

एकाबाजूला लाभाच्या वाटणीच्या रकमा मंत्रालयाच्या लाल फितीत बंद आहेत, तर दुसरीकडे, प्रकल्पग्रस्त असलेला शेतकरी, वा सावकारी नडलेला शेतकरी, बँकेच्या थकीत हप्त्याच्या, वसुली पथकाच्या धसक्याने, शेतजमीन विकावयास भाग पडलेला शेतकरी बांधव, व यांना शेतजमीन विकावयास भाग पाडावयास, लावणारे वरील महाभाग, व यांचे संरक्षण करणारे पुढारी मंडळी,आमचे नक्कीच वैरी आहेत!असे पुढारी आमचे वैरी तर आहेतच!

मात्र तेच आमचे पुन्हा पुन्हा पुढारी होतात, यापेक्षा दुर्दैवाचे दुसरी कोणतीही गोष्ट नाही!

..............................................................................

लेखक : श्री. तानाजी सखाराम कांबळे.

मोबाईल नंबर: 80 80 53 29 37.

.........,.....................................................

लेखमालेचा क्रमशा: वरील आठवा भाग आहे.

.................................................................

Updated : 16 July 2020 3:40 AM GMT
Next Story
Share it
Top