Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > असे पुढारी आमचे वैरी.

असे पुढारी आमचे वैरी.

असे पुढारी आमचे वैरी.
X

भाग नंबर : 7.

लेखक : श्री. तानाजी सखाराम कांबळे.

............................................................................

मानवी जीवन हे त्रिस्तरीय रचना वरती आधारलेले आहे. तर, या त्रिस्तरीय रचनेचा पाया अनेकांनी केवळ नुसता उध्वस्त केलेला नाही तर, त्या पायावर ती कुर्‍हाडीचे घाव घालून बेचिराख वाळवंटासारखा प्रदेशातल मानवी वस्ती सारखे "बेचिराख" करूनच सोडले आहेत.मुळातच "त्रिस्तरीय पाया" हा अन्न, वस्त्र,निवारा,या मुलभूत मानवी जीवनाच्या घटनेशी निगडीत असतो. या गरजा पुरवणे,त्या सांभाळणे,

त्या टिकवने, त्याच्यामध्ये वाढ करणे,याची खऱ्या अर्थाने प्रामुख्याने जबाबदारीही लोकशाहीमध्ये "नेतृत्व करणारे पुढारलेली जी मंडळी" आहेत,त्यांची आहे.मात्र बहुतांश वेळा असे होताना दिसून येत नाही.याची कारणमीमांसा आपण पाहिलेल्या आरशा मधल्या साभार प्रतिमेस सारखी असते. आणि मग निर्माण होते त्यातून वैरतव, आणि या वैरत वाला खतपाणी ठीक, ठिकाणी घातले जाते. आणि मग सुरू होतात "हिरव्या झाडाखालच्या चळवळी" न्याय देता येत नाही, मात्र अन्याय का झाला याचा जाब विचारणार्‍या सात रंगाच्या चळवळी ज्या नेहमी संघर्षांपुढे "वास्तवाला "झाकून पुढे जाणाऱ्या असतात. ज्याला समाजकारण असं गोंडस नावाने जन्म दिला जातो.आणि मग त्यातून निर्माण होतं ते राजकारणात नव्याने बाळसे घेतलेले पिल्लू!आणि मग सुरू होते, समाजकारणातून राजकारण आणि राजकारणातून समाजकारण!यामध्ये प्रगल्भ वैचारिकतेला खड्डा काढून

पुरून टाकून स्वतःची वैचारिक प्रगल्भता बसवली जाते.

जिला राजकारणामध्ये "सप्तरंगाची" त्रिसूत्री म्हणून

ओळखली जाते.आणि मग तिथून पुढे सुरुवात होते ती मग आत्मसन्मान टाळून सनमान टिकवण्याची नवी तयारी!

याची पहिली पायरी असते ती हिरव्या झाडाखाली पासूनची सुरुवात, आणि मग कलेक्टर कचेरी मध्ये बसणारे उपजिल्हाधिकारी यांच्यासोबत घडणाऱ्या चर्चेच्या फेऱ्या!

आणि सोबतीला,बोलवून घेतलेल्या माध्यमांच्या कडून काढला जाणारा फोटोचा प्रपंच.त्या मागण्या सर्वसाधारणपणे अशा असतात, अनेकांनी काहींची घर पेटवलीत,काहींचा खून जातिवाद द्वेषातून केला गेला, काहीजणांच्या वरती जाणून-बुजून प्रशासनाने अन्याय केला म्हणून,वा कायदेशीर कारवाई होत नसले बाबत अशा विविध प्रकारच्या नानातरे च्या

निवेदनाच्या अर्जाची खुंटी कलेक्टर कचेरी च्या दप्तरामध्ये टांगलेले असते.अशा न्यायिक मागणीला नाही म्हणता येत नाही म्हणून, सरकारी दरबारी कळवले असले बाबतचे, गुळमुळीत उत्तर देणारे सरकारी व्यवस्था, या दोन्ही बाबी एकमेकाशी लागेबांधे संबंध ठेवून झोपून वाढल्या सारखे भासवत असतात.

हा कार्यक्रम वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या सुरु असतो.यामध्ये डाव्या चळवळीच्या गरिबीवरची' रेखा' कलेक्टर कचेरीला दाखवण्यासाठी मोर्चाच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावरती पडलेला असतात.तर, हिरव्या झाडाखालील अनेक रंगाच्या चळवळी संख्येने "अल्पसंख्यांक"असूनदेखील आपल्या न्यायिक मागणीसाठी चा दरवाजा कलेक्टर कचेरी वरती थोपटततात.

या न्यायिक मागण्यांमध्ये व्यवस्थापन कौशल्याचा अभाव प्रामुख्याने आढळून येतो.विषयाशी संबंधित अज्ञान दिसून येते. अर्थकारणाची फिरणारी विकासाची वेगाने चक्रे याविषयी तर संबंधितांनी मोर्चा मधून "मौनच"बाळगलेले असते. गावागावात निर्माण होणारी अशांतता, बेरोजगारी मध्ये झालेली भरमसाठ वाढ, शेतीमालाला मिळत नसलेला स्थिर हमीभाव, शिक्षित तरुणांच्या पदवीला बाजारातून येणारी" लाखमोलाची "मागणी,

एका बाजूला शिकत चाललेले पदवीधर, तर दुसर्‍या बाजूला त्यांच्या वाट्याला आलेले बेरोजगारीचे सावट, घरच्या शेतजमिनी पेताड बापजाद्यांच्या मुळे,अनेक श्रीमंतांचे "मळे" त्या ठिकाणी फुलताना दिसून येत आहेत. तर अनेकांनी त्या ठिकाणी बळकावलेले आहेत, तर अनेकांचे न्यायालयामध्ये दावे प्रतिदावे चालू आहेत वर्षानुवर्षे! मागासवर्गीयांना मिळालेल्या इनामी चे जमिनी अनेक लोकांनी बँकेच्या कर्जाच्या बोजा दाखवून संस्थे ना मध्यस्थी खालून, थकबाकी व कर्जाची मागासवर्गीय सभासदांना भीती घालून, अक्षरशा कवडीमोल दराने विकल्या चे प्रकार उघडकीस आले आहेत. शिकलेल्यांना नोकऱ्या मिळत नाही तर कमी शिकलेल्यांना नोकऱ्या मुद्दामून दिल्या जातात.सहकारी बँका सहकारी संस्था सहकारी दूध सांग सहकारी साखर कारखानदारी, यामध्ये केवळ अनुसूचित जातीचे आरक्षण वगळता, मुद्दाम हून मागासवर्गीय शिक्षित कुशल-अकुशल पदवीधरांची भरती ही संबंधित संस्थेच्या ठिकाणी केली जात नाही. सावकारन काढून घेतलेल्या, धनिकांनी लुटलेल्या,एजंटांमार्फत फुकापाकारी वाया गेलेल्या शेतजमिनी, तरुणांना राष्ट्रीयीकृत वाढ निमसरकारी,सहकारी बँकेकडून मिळत नसलेले आयत्या वेळेला उद्योग व्यवसायासाठी कर्ज, घरात मुलग्याला नोकरी नसले पाई फिटत नसलेलं कर्ज, तसेच घरातील तरण्याताठ्या मुलीचे पैशाअभावी ताटकळत बसलेले लग्न,खादीचे चाराचे आठ झाल्याने काही शेती घाणवटीस पडले असल्यामुळे, अनेक समाजातील शोषितांचा सामाजिक समतोल हा घसुरू लागला आहे. याची जबाबदारी घेताना वा जबाबदारी निभावताना वा, जबाबदारीचा मायेचा हात फिरवताना कोणीही दिसून येत नाही.

दिसून येतात ते फक्त हिरव्या झाडाखालच्या चळवळीचे झेंडे हातात घेऊन सरकारने बांधलेल्या बागेतून, अन्यायाविरोधात ला एल्गार पुकारण्यासाठी, त्यांची ताकद जास्तीत जास्त कलेक्टर कचेरी पर्यंत असते तेही कलेक्टर च्या मनात आले भेटावयाचे तर, अन्यथा अनेक निवेदने कलेक्टर ऑफिस च्या परसदाराला चिकटवलेली असतात, तर काही निवेदने वर्तमानपत्रांमधून छोट्याशा कॉलममधून दुसऱ्यादिवशी वाचावयास मिळतात. वर्तमान काळाचा अभ्यास न करता भूतकाळाचा,परामर्श डोक्यात न ठेवता,भविष्यकाळाचा वेध न घेता, गाव गाड्या पासून शहर उपनगरा पर्यंत माणसाच्या जगण्याच्या या तीन गोष्टींचा अर्थकारणाचा अभ्यास न करता अशी "कडवट " पावसाळ्यामध्ये उगवणार्‍या" आळंबी" सारखे

सिजनेबल उगवली जातात व नंतर ती आपोआपच तूडवली देखील जातात.

Updated : 15 July 2020 3:15 PM GMT
Next Story
Share it
Top