Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > अवैध सावकारी प्रकरणात सहकार विभागाच्या परभणी जिल्ह्यातील दोन गावांत धाडी

अवैध सावकारी प्रकरणात सहकार विभागाच्या परभणी जिल्ह्यातील दोन गावांत धाडी

अवैध सावकारी प्रकरणात सहकार विभागाच्या परभणी जिल्ह्यातील दोन गावांत धाडी
X

परभणी शांतीलाल शर्मा

पाथरी तालुक्यातील देवेगाव व रेणाखळी येथील चार घरांची झडती ; दस्ताऐवज आढळले

सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधकांकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या पार्श्‍वभूमीवर सहकार विभागाच्या वतीने जिल्ह्यात शुक्रवारी (ता.४) व बुधवारी (ता.९) चार ठिकाणी घाडी टाकून अवैध सावकारांच्या घरांची झडत घेतली आहे.

दरम्यान, या घरझडतीत खरेदीखते व सावकारी संदर्भातची अनेक कागदपत्रे आढळून आली असून या धाडसत्राने अवैधरित्या सावकारी करणार्‍यांची धाबी दणाणली आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधकांकडे अवैध सावकारीसंदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार विभाग व पोलीस दलातील पथक तैनात करण्यात आली.या पथकाने शुक्रवारी (ता.४) पाथरी तालुक्यातील देवेगाव येथील ज्ञानेश्‍वर अण्णा मगर व तुकाराम अण्णा मगर यांच्या घरी धाडी टाकल्या. तर त्यानंतर बुधवारीही (ता.९) दुसरी धाड सुदाम अंबादासराव श्रावणे व मदन सिताराम श्रावणे या दोन अवैधरित्या सावकारी करणारांच्या घरावर धाडी टाकल्या.या दोन्ही धाडीत केलेल्या झडतीत खरेदीखते, सावकारी संदर्भातची इतर कागदपत्रे संबंधित पथकाने हस्तगत केली आहेत.

दरम्यान, सहकारविभागाच्या वतीने अवैध सावकारीबाबत चारही जणांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार असून संबंधितांची अवैध सावकारी सिद्ध झाल्यास महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अधील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहाय्यक उपनिबंधक उमेशचंद हुशे, कार्यालयीन अधीक्षक बी.एस. नांदापूरकर, भाऊसाहेब कुरूडे व सहाय्यक निबंधक एम.यु. यादव यांच्या नियोजनाखाली पी.बी. राठोड, सौ. ए.जी. निकम, एस.एम.कनसटवाड, बी.टी. लिंगायत, व्हि.एम. सरवदे, एम.डी. सईद,ए.के.कदम, सौ. एस.व्ही.देशपांडे, यु.एन. कोल्हे,पोलीस कर्मचारी एन.डी. शितळे,आर.आर.अहिरे आदींनी ही कारवाई पार पाडली.

Updated : 9 Sep 2020 5:32 PM GMT
Next Story
Share it
Top