Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान...!

अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान...!

अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान...!
X

म मराठी न्यूज टीम

प्रतिनिधी/विठ्ठल खाडे

अहमदनगर/(अकोले),दि.१७ : तालुक्यातील आदिवासी पट्यातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या भात पिकाचे अचानक अवकाळी पाऊस पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. आधिच पाऊस उशिरा आलाने पिके वाळून गेली होती यातुन सावर असताना भात पिकावर मावा, कर्पा व तांबेरा रोगाने मोठे नुकसान केले यातच आता अवकाळी पावसाने पिके भुईसपाट केल्याने मुळा व प्रवरा खोय्रातील शेतकरी मेटाखुटीला आला असुन शासनाने आता तरी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत. तसेच सक्तीचा पीकविमा कापलेल्या विमा कंपनीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी. शासनाने अकोले तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अचानक कोसळल्या मुळे आदिवासी भागातील शिवारात उभे असलेले पण कापणीला आलेल्या लोंब्याचे भात पडले. कापून ठेवल्यालेल्या भाताचे अधिक नुकसान झाले आहे पावसाचा जोर इतका होता की, ऊभे असलेले पिक भुईसपाट झाल्याने वैरणिची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या पावसामुळे अकोले तालुक्यातील गंगाराम धिंदळे यांच्या निल्या भाताचे देखिल नुकसान झाले आहे. गंगाराम धिंदळे म्हणाले की गरजेला पाऊस पडला नाही, आणि आता गरज नसताना पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे. लवलव कर नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मदत करावी .

भंडारादरा येथील शेतकरी प्रल्लाद खाडे म्हणाले, कापलेल्या भाताच्या लोंब्या पावसाने झडून गेल्या, वैरण हाताला येणार नाही. जेवढा खर्च झाला त्यापेक्षा कमी उत्पन्न मिळेळ शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करावा. उपसरपंच गणपत खाडे म्हणाले, या पावसाच्या तडाख्याने भाताचे नुकसान झाले, भाताची कापणी, झोडपणी ही पुढील कामे पूर्ण करायला मजुरांची संख्या वाढले. भात पिकाचे इतके नुकसान झाले की मजुरी द्यायला देखील परवडणार नाही. अचानक पाऊस पडल्याने भाताच्या वावरात असे पाणी साचले होते, त्यातून भातपिक बाहेर काढून कसे वाळवायचे या चिंतेत असल्याचे किसन आंबवने यांनी सांगितले. एकीकडे भात कापणी सुरू असतानाच, दुसरीकडे भात झोडपून धान्याची रास लावली पण भाताची रास पाण्यात गेली आता वर्षभर खायचे काय असा प्रश्न मुळा व प्रवरा खोय्रातील शेतकऱ्यांना पडला आहे. वर्षभर काबाडकष्ट केले, पण हे कष्ट व्यर्थ जाते की काय? आता पुढे काय या प्रश्नाने भात पिकवणारा हवालदिल झाला आहे.

भातरोपे पेरण्यापूर्वी पासूनची मशागत ते भात कापणी झोडपून घरी आणण्यासाठी झालेले कष्ट, त्यावरील खर्च मजुरांची मजुरी पाहता भात पिक कधीच किफायतशीर ठरत नाही. पण यंदा पावसाने बळीरामावर आस्मानी संकट धाडले आहे.

भंडारदरा गावाचे सरपंच पांडुरंग खाडे म्हणाले, काल पडलेल्या अवकाळी पावसाचा जोर इतका होता की, त्यात भात खाचरे पाण्याने भरून गेली. झोडपणी केलेले भात पावसाने भिजले. भात भिजून काळपट पडण्याची आणि भात भरडताना तांदूळ मोडण्याची शक्यता वाढली आहे.

Updated : 17 Oct 2020 4:17 PM GMT
Next Story
Share it
Top